संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४
जागतिक स्तरावरील ज्ञान पावर आणि मॅन पावर भारताकडेडॉक्टर सुधीरजी तांबे
रविवार, २९ सप्टेंबर, २०२४
सोने पॉलिश करून देण्याचा बाहणा करत राहात्यातील पंधरा चारी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील ४ तोळे सोने दोन भामट्या चोरट्यांनी लुटले
शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४
लोहगाव सोसायटीची सभा खेळीमेळी संपन्न
भटकंती कास पठारची
भटकंती कास पठारची
राहता
बऱ्याच दिवसापासून इच्छा होती की महाराष्ट्रातील सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य असलेले व २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश असलेले कास पठार हे एक पर्यटन स्थळ पाहण्याचा योग दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी आला. ऑनलाईन प्रत्येकी 150 रुपयाचे तिकीट रविवारी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतचां कास पठार भ्रमंतीचा आमचा स्लॉट असल्याने भल्या पहाटे आमची फॅमिली पुणे येथील आमच्या लोहगांव येथील घरून मार्गस्थ झालो. वाटेत खंबाटकी घाटातच धुके आणि ढगाच्या गराड्यातच आणि पावसाच्या बारीक सरी अंधारातच आमच्या स्वागताला हजर होत्या. साताऱ्यात सूर्यदेवाने आम्हाला मुखदर्शन दिले. साताऱ्यातून घाट रस्त्यात नाश्ता करून आम्ही जमिनीपासून 1200 मिटर उंचीवरील कास पठार पार्किंगमध्ये गाडी लावून वनविभागाने पर्यटकांसाठीच्या गाडीमध्ये पावसातच बसलो. गार वारा, थंडीची चाहूल, पावसाची रिमझिम आणि निसर्गातील रंगीबेरंगी फुले पाहण्याचा मोह आम्हाला पुढे जाण्यास खुणावत होता. पाच मिनिटातच आम्ही चार नंबर पॉइंटला आलो. आमचा नातू अदविक खाली उतरताच जाकीट घालूनही पावसात कुडकुडत होता. परंतु त्याचा उत्साह आमच्यासारखाच ही सृष्टी नजरेत सामावण्यासाठी आतुर झाली होती. येथे आकाशातील ढग आम्हाला स्पर्शून आणि आम्ही ढगात लपेटून पुढे चालत होतो. लाल दगडाची चिऱ्याची पायवाट आम्हाला रंगीबेरंगी फुलांच्या दुनियेत घेवून जात होती. प्रत्येक 15-20 फुटावर ओळीत गार्ड पर्यटकांना लांबून फोटो काढा फुलझाडे तुडवू नका म्हणून सूचना करत होते. परंतु या मोहक विविध रंगी रानफुलातील जवळीक पर्यटकांना आकर्षित करत सूचनेकडे दुर्लक्ष करीत फोटोसेशन करत होती. काही ठिकाणी गर्द फुलांच्या ताटव्यात मुद्दामहुन मोकळी जागा ठेवून तिथे फोटो पॉइंट बनविले होते. चार तासात आम्हाला 10 चौरस मैलाचे कास पठार पादाक्रांत करायचे होते. परंतु वाटेतील गार्ड यांनी सांगितलेली मोठी सोनकी,वायतुरा, पांढरा सापकांदा,सोमाडा,कंदील पुष्प/कंदील खर्चुडी, मुसळी ,आभाळी, भारंगी, डुक्कर कंद, दीपकडी, दवबिंदू, गवती दवबिंदू, कासा,टूथब्रश ऑर्किड,छावर,उंद्री, अंजनी,कुमुदिनी, काळी निसुर्डी,पिंड,पानेर,छोटीसोनकीसोनकी,कवळा,कोंडल,सीतेची आसवें,हालुंडा,काटे रिंगणी हे विविधरंगी फुले आम्हाला रस्ता काटूच देत नव्हती. पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. त्याचबरोबर येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची प्रामुख्याने २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती येथे आढळतात. तसेच येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात. असे गार्ड आम्हाला माहिती पुरवीत होते. हे चालू असतांना आमचे लेक जावई एकीकडे, तर इकडे आमची जोडी मोठा मुलगा आमचे दोन्ही जोड्यांचे फोटो काढण्यात व्यस्त होता. तर नातू कधी आमच्यात तर कधी त्याच्या पप्पा मम्मीसोबत फोटो काढण्यात दंग होता. वातावरण कधी धुक्याचे, कधी ढग स्पर्शून जाणारे, क्षणात पावसाची बुरबूर तर लगेच उन असे बहुरंगी होते. त्यामुळे फोटोसेशनही अगदी बहुरंगी झाले. दोन तासात फक्त चार नंबर पॉइंट पाहून झाला. त्यानंतर एक नंबर पॉईंटच्या गेटवर वाफाळलेला चहा पिवून आम्ही दोन्ही बाजूने कुंपण घातलेल्या रस्त्यातून फुलांचे दृश्य पाहू लागलो. इथे अथांग रंगीबेरंगी फुलांनी कास पठार बहरून गेले होते. इथे एखादा अरसिक ही या फुलांच्या प्रेमात सहजच पडेल असे दृश्य होते. पुढे तलावाच्या काठावर सुरक्षेची तटबंदी हटल्याने येथे फोटोसेशन सुरू झाले. स्थानिक गावकरी महिला ठिकठिकाणी नाचणीची भाकरी, वेगवेगळ्या चटण्या, पिठले घेवून पर्यटकांना हा पठारी मेन्यू खाण्यासाठी आग्रह करत होती. प्रत्येकाला हा पठारी आहार खाण्याचे आकर्षण झाले. चार तास फिरल्यावर पोटात कावळे कोकावणारच ना. आम्ही सर्वांनी या मेव्यावर मस्त ताव मारला. खाता खाता आम्हाला दिसले की काही फुले मुरझायला लागली. गार्डला विचारले तर त्याने सांगितले की काही फुले सकाळी 6 वाजता उमलतात आणि दुपारी 12 वाजता परत मिटतात. त्यामुळे आम्हाला सकाळी 7 ते 11 ची वेळ फायदेशीर वाटली. या पठारावर सगळीकडे खडक असल्याने पावसाने चिखल फारसा दिसला नाही. परंतु आता खडक ही काही ठिकाणी निसरडे झाले आहेत. अनेक जण घसरतांना आम्ही पाहिलेत. त्यामुळे निसर्ग सौंदर्य पाहताना प्रत्येक पाऊल जपून टाकण्याच्या सूचना आपोआप मिळत होत्या. एकंदर एका चार तासाच्या भटकंतीत पूर्ण कास पठार पाहून होत नाही तर सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतचा वेळ तरी सर्व पॉइंट पहायला हवाच.
कास पठार जरी हेरिटेज असेल तरी येथून जवळच 3 किलोमिटर अंतरावर जगातले सर्वात मोठे भाबवली पुष्प पठार आहे. पहावे तिकडे फुलेच फुले. हा पठार पर्यटक यांचे वावरपासून दूर असल्याने निसर्गाची मुक्त रंग उधळण आहे. परंतु हा अतिशय निसरडा , अतिशय थंडगार,आणि जंगली श्वापदांचा वावर असलेला भाग असल्याने इकडे कुणी जावयास धजत नाही.
सातारा परिसरात अनेक तलाव, अनेक धबधब्यांच्या रांगा, वासोटा किल्ल्याच्या परिसर, कोयना धरण, नद्यांचे त्रिवेणी संगम, सज्जनगड आणि जावळीचे खोरे, मोठमोठाले कडे, सुळके, छोटा काश्मीर आणि सर्वात महत्त्वाचे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित आणि निसर्गाचा परिपूर्ण आनंद देणारे कास पठार असा हा सातारा परिसरातील निसर्गरम्य परिसर पर्यटकांना सतत येण्यास खुणवीत असतो.
ला .राजेंद्र फंड, राहाता,
मो. 9881085671.
शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी -डॉ,राजेंद्र पिपाडा
शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी अशी मागणी डॉ,राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिर्डी विमानतळावर केली.
शिर्डी -
शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी अशी मागणी डॉ,राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिर्डी विमानतळावर केली.
शिर्डी विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन त्यांना शिर्डी विमानतळावर नाईट लँडींग सुरु कऱणेसंदर्भात विनंती कऱणेत आली यावेळी त्यांनी CISF चे अधिकारी व टर्मिनल मॅनेजर यांना बोलावुन अडचणींबाबत विचारला केली असता त्यांनी 30 गार्डची आवश्यकता असल्याचे सांगितले याबाबत CISF च्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलुन आपल्यास मॅन पॉवर पुरविण्यास सांगतो असे आश्वासन दिले.
शिर्डी विमानतळावरील 600 कोटी रु.चे मंजुर असलेल्या कामाच्या निविदा झालेल्या असल्याने लवकर काम सुरु करण्यासंदर्भात डॉ.पिपाडांनी मागणी केली असता त्यांनी MADC चे कार्यकारी अधिकारी यांना फोन लावुन त्यांना याबाबत विचारणा करुन
तात्काळ काम सुरु करणेसंदर्भात सुचना केल्या.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असल्यामुळे परराष्ट्रातुन व परदेशातुन याठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भक्तांची गैरसोय होवु नये यासाठी त्यांना नाईट लँडींगची सुविधा देणे गरजेचे आहे. शिर्डी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत परंतु येथे नाईट लँडींगची सुविधा नसल्यामुळे फ्लाईटची संख्याही कमी आहे. या विषयावर चर्चा झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत तात्काळ अधिका-यांशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला.
यावेळी बजरंगबलीची शाल देवुन त्यांचा सत्कारही करण्यात आला.
सन 2023-24 वर्षात राहाता नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानात राज्यात पाचवी तर नाशिक विभागात प्रथम..
शिर्डी : चातुर्मासानिमित्त जैन स्थानकात अवतरले भक्तीपर्व
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४
वृद्धांना व लाडक्या बहिणींना घरपोच मानधन
सेवापूर्ती समारंभाचे आयोजन
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील एकाही भगिनीला भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिर्डी येथे महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला मेळावा संपन्न
शिर्डी, - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील १ कोटी ९० लाख बहीणींच्या बॅंक खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहेत. उर्वरित ६० लाख महिलांना लवकरच लाभ दिला जाईल. एकाही भगिनींला दिवाळीत भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
शिर्डी येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला महामेळाव्याप्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाला महसूल, पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, महिला विकासाच्या योजना केल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न साकार होणार नाही. त्यादृष्टीने केंद्र शासनाने लाडली बहीण, लखपती दीदी योजना आणली. राज्यातील १ कोटी महिलांना लखपती दिदी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लेक लाडकी योजना आणण्यात आली. यात मुलींना वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यावर एक लाख रूपये मिळणार आहेत.
मुलींना शिकविले पाहिजे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री.फडणवीस पुढे म्हणाले, रात्रंदिवस काबाडकष्ट करणाऱ्या लाडकी बहीणींना दिलेल्या महिलांसाठी योजनेतून मिळालेली रक्कम मोलाची आहे. यापुढे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील. या योजनेच्या मासिक लाभात ही वेळोवेळी वाढ करण्यात येईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी भगिनींना आश्वस्त केले.
राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असल्याचे नमूद करून ते म्हणाले, शेतकऱ्यांना वर्षभर वीज देण्यासाठी शासन काम करीत आहे. शेतकऱ्यांच्या एक रूपयात पीक विमा योजनेच्या माध्यमातून ८ हजार कोटींचा विमा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. पन्नास वर्षापासून प्रलंबित निळवंडे प्रकल्पास शासनाने चालना दिली आहे. पश्चिम वाहिनींचे ५५ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाडा पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचे काम शासन करणार आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यावेळी सांगितले.
शिर्डी संस्थानामधीन ५८४ कर्मचाऱ्यांना कायम करण्यात आले. शिर्डी नवीन विमानतळांच्या टर्मिनल इमारतीचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.
विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन आणि उद्घाटन
यावेळी मान्यवरांच्या हस्ते आभासी पद्धतीने निमगाव कोऱ्हाळे येथील श्री साईबाबा संस्थानाचे शैक्षणिक संकूल, सावळीविहिर खुर्द येथे नवीन पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, मौजे लोणी बु. येथील भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, शिर्डी येथील थीमपार्क, महसूल भवन इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. अकोले येथील तालुकास्तरीय मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण, जिल्ह्यातील २६ तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन व ३५ तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे भूमीपूजनही यावेळी करण्यात आले.
गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाच्या १९१ कोटी ५८ लक्ष रुपयांच्या प्रकल्प अहवालास मान्यता प्रदान, मदर डेअरी व राहाता तालुका दूध संघ यांच्यामध्ये प्रतिदिन एक लाख लीटर दूध संकलनाचा करार करण्यात आला.
गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४
सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना पीएचडी पदवी प्राप्त
सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना दंतशाखेमधील ऑर्थोडॉन्टिक्स या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त
शिर्डी प्रतिनिधी
सिंहगड दंत महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापक डॉ शिल्पा फरांदे यांना दंतशाखेमधील ऑर्थोडॉन्टिक्स या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज येथे पार पडलेल्या १८ व्या पदवी दीक्षांत समारंभामध्ये महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल सन्माननीय सी पी राधाकृष्णण यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय राधाकृष्णजी विखे तसेच सन्माननीय राजेंद्र विखे हे उपस्थित होते.निंबा मालजी नंदन ताराबादकर यांची नात गोविंदराव शिरवाडकर व देवका शिरवाडकर यांची कन्या म्हणून नावलौकिक केले आहे खानदेश भागातून अभिनंदन नाचा वर्षाव
होत आहे
बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची 63 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न
अकोले तालुक्यातील कळस येथील विक्रांत प्रकाश अल्हाट यांची पोलीस उपनिरीक्षक ( पी.एस.आय.) पदी निवड
लोहगाव सोसायटीची सर्वसाधारण सभा २८ सप्टेंबर रोजी.
सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४
शिर्डीत संघटनात्मक बैठकचे आयोजन
ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदी तुषार महाजन यांची नियुक्ती
श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान साई भक्त*श्री अरुणराव शिंदे - गायकवाड यांना नवराष्ट्र रत्न 2024 पुरस्कार प्रदान
रविवार, २२ सप्टेंबर, २०२४
रयत शिक्षण संस्थेचे नाव राज्यात, देशातच नव्हे तर परदेशातही झाले आहे.- व्हा. चेअरमन दिलीपराव डहाळे
विद्यार्थ्यांना व्यापक दृष्टीने शिक्षण देणारी रयत शिक्षण संस्था ही देशात सर्वोच्च शिक्षण संस्था असून रयत शिक्षण संस्थेचे नाव राज्यात, देशातच नव्हे तर परदेशातही झाले आहे. असे प्रतिपादन रयत बँक साताराचे व्हा. चेअरमन दिलीपराव डहाळे यांनी केले.
राहाता तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बु.येथे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे होते.या कार्यक्रमाला सरपंच परिषदेचे राज्यअध्यक्ष दत्तात्रय पा. शेटे उद्योजक विजयराव कडू ,सरपंच ओमेश जपे ,उपसरपंच विकास जपे, कृ. उ. बा. समितीचे संचालक शांताराम जपे , राजेंद्र आगलावे, गणेश कापसे, मुख्याध्यापक तुपे एस एम, संगीताताई वाघमारे , राजकुमार गडकरी, कैलास सदाफळ, गणेश आगलावे, नवनाथ जपे, सतीश जपे, पद्माताई कापसे, रावसाहेब आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम डॉ. कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची गावातून सवाद्य भव्य मिरवणूक काढली. नंतर प्रतिमापूजन व मान्यवरांचा सत्कार झाला.या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी व विविध मैदानी स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेल्या विजयी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तात्रय पा. शेटे यांनी या विद्यालय परिसरात प्लेविन ब्लॉक बसवण्यासाठी एक लाख रुपये देणगी जाहीर केली. सतीश जपे यांनी विद्यार्थ्यांना बक्षीसे जाहीर केली.
यावेळी डहाळे पुढे म्हणाले की, डॉ.कर्मवीर अण्णांनी यांनी मोठ्या प्रतिकूल परिस्थितीत शाळा काढल्या. त्यांच्या योगदानामुळेच आज 750 शाळा, १४००० शिक्षक,साडेचार लाख विद्यार्थी या संस्थेत शिक्षण घेत आहेत. या संस्थेत कोणतेही डोनेशन नाही. प्रतिकूल ठिकाणीही शाळा आहेत. शाळा हाय फाय म्हणजे शिक्षण हाय फाय असे नाही.असे सांगत शिक्षणामध्ये परिस्थिती आड येता कामा नये. परिस्थितीमुळे शिक्षण होतेच असे नाही. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. अण्णांनी शिक्षणाबरोबरच संस्कृती जपण्याचे ही काम केले. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद तसेच कमवा व शिका या योजना आपल्या शाळांमध्ये चालू केल्या. हे कर्मवीरांचं स्वप्न होतं. त्यामुळेच आज रयत शिक्षण संस्थेत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेरिंग अशा आर्थिक कमाई करून देणारे 15 कोर्स येत आहेत. लिखाण ,वाचन याप्रमाणेच कृतीतून शिक्षण हे अण्णांचे स्वप्न होते. ते या शिक्षण संस्थेमार्फत पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे विद्यार्थी येथे कृतीतून शिक्षण घेत आर्थिक कमाई करू शकतील. व त्यावरच शिक्षण होऊ शकेल. असा या शिक्षण संस्थेचा प्रयत्न आहे. असे सांगत रयत शिक्षण संस्था एक विद्यापीठ झाली आहे. व यापुढे या रयतेच्या विद्यापीठातूनच विद्यार्थी पदवीधर होणार आहे. असे म्हटले. या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाला वॉल कंपाउंड साठी रयत बँकेकडून आपण प्रस्ताव द्या त्यासाठी पाच लाख रुपये देऊ, असे आश्वासनही यावेळी दिलीपराव डहाळे सर यांनी दिले.
यावेळी श्रीराम इंडस्ट्रीजचे उद्योजक विजयराव कडू पा. यांनी नवीन डायस देण्याचे यावेळी जाहीर केले. बाळासाहेब जपे, कु. भक्ती तुरकणे, आदींची भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डुंबरे आभार भारत खेडकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला एकनाथ आरणे, रफिक शेख, कारभारी पाचोरे, दिग्विजय कापसे, आदींसह मुख्याध्यापक तुपे एस एम ,ज्येष्ठ शिक्षक डुंबरे, म्हस्के , काळेगोरे, खेडकर,सौ कानडे मॅडम, श्री खान ,वाकचौरे, शिंदे मॅडम व सर्व शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री गणेश विद्यालयात कर्मवीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४
राहाता न्यायालयात लोकअदालतचे आयोजन
राहाता न्यायालयात लोकअदालतचे आयोजन
गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४
रयतचा गुणात्मक विकास वाखाणण्याजोगा : आमदार रोहित पवार
बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४
जैन स्थानकात महिला तपस्वींच्याउपवासाचे सांगता.......
मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४
आमदार बबनदादा पाचपुते विधानसभा सदस्य श्रीगोंदा मतदार संघ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा वाढदिवस निमित्त सत्कार
मंदिर सुरक्षा चे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हवालदार योगेश पाटोळे यांचा प्रामाणिकपणा
साईयोग गणेशाला पर्यावरणपूरक निरोप.
महाराष्ट्रातील इतर गणेश मंडळे त्यांच्या उपक्रमाचे आदर्श घेतील - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
रविवार, १५ सप्टेंबर, २०२४
दत्त नगरातील स्वस्त धान्य दुकानात गणेश चतुर्थी निमित्त आनंदाचा शिधा वाटप
विश्वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धा 2024 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन :- गंगाधर मुटे
शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४
साई सद्गुरु गंगागिरीजी गुरुकुल येथे साईबाबा मंदिराची प्राण प्रतिष्ठा१५ सप्टेंबर रोजी.
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४
रयत शिक्षण संस्थेचे श्री गणेश विद्यालय गणेशनगरचे जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश
गोदावरी कालव्यांना मंजूर असलेले पाणी पूर्ववत देऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी एरिगेशनद्वारे ठोस उपाययोजना कराव्यात. ......विवेक कोल्हे
गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४
बिहार राज्य येथील मा. ना.श्री.मंगल पांढेजी आरोग्यमंत्री शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते,त्यांचा सत्कार इंडिया लॅबोरेटरी ऑफिसर असोसिएशन चे राज्याध्यक्ष डॉ.संजय उबाळे व टीम यांनी केला
बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४
लेख खंडोबाचा
Featured post
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील
आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील दाढ बुद्रुक आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...
-
राहाता तालुक्यातील एकरुखे येथील ॲड ऋषिकेश किसन आभाळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( JMFC) पदी नियुक्ती राहाता तालु...
-
साई महिमा ट्रस्ट व गोपुरम टीव्ही भक्ती महिमा यांच्या वतीने गणेशनगर विद्यालयामध्ये अन्नदान व शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत श...
-
राहता अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी कॉंक्रीटीकरण होवुन राहाता शिर्डी शहरातुन जाणा-या रस्त्यावर उड्डाणप...






