गुरुवार, २० जून, २०२४

आदिवासी कोकणी भाषेतील चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकाच्या भेटीला लवकरच

आदिवासी कोकणी भाषेतील चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकाच्या भेटीला लवकरच

शिर्डी प्रतिनिधी : 
 

साक्री तालुक्यातील पिंपळनेर या पश्चिम पट्टयात आदिवासी कोकणी या स्थानिक लोकांची बोलीभाषा, त्यांच्यातील जुन्या चालीरीती, चांगल्या परंपरा, दुर्मिळ होत चाललेली लोककला प्रकार, संगीत, जीवनशैली व संस्कृती या गोष्टीचे संवर्धन करण्यासाठी एका शिक्षकाने दिग्दर्शित केलेला आदिवासी कोकणी बोली भाषेतील कुटुंब व भाऊबंद यांच्यातील संघर्ष या विषयावर कथानक असलेला पहिला आदिवासी कोकणी भाषेतील चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे.
रविंद्र माणिक जाधव लिखित दिग्दर्शित, व उषा रविंद्र जाधव निर्मित ' जीव' (The Creature)" या आदिवासी कोकणी भाषेतील महाराष्ट्रातील पहिल्याच मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पिंपळनेरच्या पश्चिम पट्ट्यातील लव्हारीपाडा शिवाऱ्यामाळ, मस्टयाचा पाडा, रोहड तसेच काब-याखडक या चौपाळे पंचक्रोशीत संपन्न झाले आहे. शिक्षक रवींद्र जाधव हे मूळचे नगर जिल्ह्यातील आहेत, ते साक्री पं समिती शिक्षण विभागात जि प शाळेत शिक्षक म्हणून आहेत. 
या चित्रपटाचे संकलनाचे काम डिजी पिक्चर स्टुडिओ पुणे येथे नुकतेच पूर्ण झाले आहे.या चित्रपटाचे संकलन अक्षय कदम व अभय पोते यांनी केले असुन चित्रपटाचे चित्रीकरण आकाश बनकर तर साऊंड रेकॉर्डिंग चे काम विकास खंदारे, कलादिग्दर्शन प्रसाद भिल . चित्रपटास दिग्दर्शन साह्य अभय पोते, विशाल शिरसाठ तसेच वेशभूषेचे काम प्रथमेश तांबे व रेश्मा सुनिल जाधव यांनी तर चित्रपटाचे इंग्रजी सब टायटल्स प्राध्यापक रोहिदास घरटे व प्राध्यापक नूतन घरटे (परफेक्ट क्लासेस पिंपळनेर) यांनी केले आहे. हा चित्रपट लवकरच पिंपळनेर परिसरात तसेच महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाबद्दल रविंद्र माणिक जाधव यांनी सांगितले की, या भागात प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना आजूबाजूच्या स्थानिक लोकांची बोलीभाषा, जुन्या चालीरिती-परंपरा दुर्मिळ लोककला प्रकार, संगीत वाद्ये, जीवनशैली तसेच संस्कृती या सर्व गोष्टींचे संवर्धन करण्यासाठी जीव,निर्माण केला आहे. दुर्मिळ होत चाललेली आदिवासी कोकणी बोलीभाषा कानाला गोड- मधुर, लय असणारी व आपल्या आदिवासी संस्कृतीतील आपल्या मातीच्या जवळ जाणारी ही भाषा आजूबाजूच्या स्थानिक लोकांच्या बोलण्यातून आत्मसात करून या भाषेतूनच ह्या चित्रपटाची कथा लिहिली. या चित्रपटाची कथा २०१८ साली त्यांना एका प्रसंगावरून सुचली व चार ते पाच वर्ष या कथा रचनेवर काम करत जीव हा चित्रपट या परिसरातील आदिवासी बांधवांच्या सहकार्याने आकाराला आला. या भाषेतूनच रविंद्र जाधव यांनी २०१३ पासून शाळाबाह्य, निरोध, थाळसर-बांगसर, गोल यासारख्या लघुपटांचे स्वतः लेखन-दिग्दर्शन व निर्मिती केलेली आहे.यातील थाळसर-बांगसर या लघुपटास राष्ट्रीय मानवाधिकार आयोग नवी दिल्ली यांचे २०२० चे प्रथम पारितोषिक मिळालेले आहे. लघुपट-चित्रपट निर्माण करण्यामागे आदिवासी बांधवांची दुर्मिळ होत चाललेल्या संस्कृतीचे संवर्धन करणे तसेच या भागातील स्थानिक कलाकारांच्या कलेला व्यापक पातळीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचा त्यांनी सांगितले. " जीव ! " चित्रपटात पाड्यावरील कुटुंब व भाऊबंद यांच्यातील संघर्ष असून चित्रपटाचा कथा विषय पूर्णतः वेगळ्या पातळीवरचा आहे. जीव हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार असून प्रेक्षकांच्या प्रतिसादाब‌द्दल रविंद्र जाधव यांना उत्सुकता लागली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत शिवाजी आप्पा शेवाळे (चिकसे), किरण वडसकर (पिंपळनेर), दीक्षा उजागरे (पुणे), बेबीताई लक्ष्मण सुर्यवंशी (नागझिरी), आदर्श सुनील जाधव (पुणे), मकडीबाई सुर्यवंशी (नागझिरी), समीर रामटेके (नागपूर), उषा निंबाळकर (पेनूर), रविंद्र माणिक जाधव, नितीन नगरकर (पिंपळनेर), दोधाभाऊ गायकवाड, गुलारामभाऊ चौरे, सौ. मालतीबाई छोटीराम चौरे, छोटीराम गजमल चौरे (सावरपाडा चौ.), बबन माळचे, दया अहिरे, साईराम सोनवणे (लाव्हरीपाडा) मनीषा साबळे मॅडम (नागझिरी) तसेच लाव्हरीपाडा व सावरपाडा चौ. येथील स्थानिक कलाकार ह्या चित्रपटात भूमिका साकारत आहे.
" जीव " चित्रपट निर्माण करण्यासाठी डॉ. प्रतिभा चौरे , हिंमतभाऊ साबळे, धनराज उंबरे, प्रशांत साबळे , शशिकांत साबळे , शंकर चौरे , सतीश खैरनार , वासुदेव राजाराम सोनवणे , कैलास बहिरम , चेतन बहिरम, ईश्वर ठाकरे , संभाजी आंधळे , श्रीकांत अहिरे , विक्रम पोते, जयवंत कापडे, सतीश पेंढारकर तसेच स्थानिक पोलीस स्टेशन पिंपळनेर येथील मान्यवर, प्रशांत जगताप (स्वामी इलेक्ट्रिकल्स), निलेश सोनवणे (बालाजी इलेक्ट्रिकल्स जनरेटर साह्य) साक्री पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी वृंद, त्याचबरोबर सावरपाडा शिवाऱ्यामाळ, लाव्हरीपाडा, मस्टयाचापाडा, चौपाळे पंचक्रोशीतील स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ तसेच अनेक व्यक्तिंनी सहकार्य करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...