बुधवार, २६ मार्च, २०२५

धनगरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू

राहता तालुक्यातील दिघी रोड धनगरवाडी दत्त मंदिर येथे बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी मृत्यू झाली असून या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले या परिसरात लवकरात पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करण्यात यावा अशी मागणी धनगरवाडी येथील नागरिकांनी केली आहे धनगरवाडी येथे संतोष राशिनकर यांच्या वस्तीजवळ रात्री नऊच्या सुमारास दबा धरून बसलेला बिबट्याने संतोष राशिनकर यांची मुलगी स्नेहल संतोष राशिनकर वय सात वर्ष तिला घरासमोरून पकडून शंभर फूट फरफटत नेले त्यानंतर त्या परिसरात आरडाओरड  झाल्याने मुलीला सोडून बिबट्या पळून गेला त्यानंतर त्या मुलीला घेऊन प्रवरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले तसेच धनगरवाडी चे उपसरपंच साहेबराव आदमाने यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता रात्री अधिकारी संतोष राशिनकर यांच्या वस्तीवर येऊन वन विभागाचे अधिकारी श्री सानप साहेब साखरे साहेब बर्डे साहेब व सुराशे यांनी घटनास्थळी पंचनामा केला तरी या परिसरात लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा व वन खात्याने दक्षता घ्यावी असे सरपंच उपसरपंच यांनी व नागरिकांनी म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...