मंगळवार, ३० जून, २०२६

नासिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे प्रश्नाच्या संदर्भात नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवार दिनांक १ जुलै रोजीच भेट घेवून त्यांच्याकडे चर्चा करणार आहे.


अहील्यानगर  

नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग आणि  राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे प्रश्नाच्या संदर्भात नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील संबंधित लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवार  दिनांक १ जुलै रोजीच भेट घेवून  त्यांच्याकडे  चर्चा करणार आहे.   केंद्र शासनाच्या स्तरावर पाठपुरावा करून याबाबत यशस्वी तोडगा काढण्यासाठी निश्चित  प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानभवनात आयोजित बैठकीत सांगितले. 

नाशिक - पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.  या बैठकीस आमदार सर्वश्री माणिकराव कोकाटे, शरद सोनवणे, बाबाजी काळे, विठ्ठल लंघे, शिवाजी आढळराव पाटील, सत्यजित तांबे, प्राजक्ता तनपुरे, अमोल खताळ, अक्षय कर्डिले उपस्थित होते. तर माजी मंत्री  आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे बैठकीत सहभाग घेतला. 
मंत्री श्री विखे पाटील म्हणाले, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सोबतही या रेल्वे मार्गाबाबत चर्चा करण्यात येईल. त्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळही दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेईल. हा रेल्वे मर्ग नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.  या रेल्वे मार्गामुळे एक वेगवान संपर्क जोडणी पुणे ते नाशिक या दोन महानगरा दरम्यान निर्माण होईल. त्यामुळे राज्याचाही गतीने विकास होईल. पुणे नासिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या बाबतीत जनतेच्या भावना विचारात घेवून या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाच्या संदर्भात असलेल्या या रेल्वे मार्गाच्या बाबतीत बैठकीत चर्चा झाली.या प्रश्नाबाबत शेतकर्याच्या असलेल्या भावना मुख्यमंत्र्याच्या निदर्शानास आणून देणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

माजी मंत्री आ.दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीत सहभाग घेताना सांगितले की,पुणे नासिक रेल्वे प्रकल्पाच्या संददर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असून जीएमआरटीच्या अडचणी दूर होवू शकतात ही बाब त्यांच्या निदर्शानास आणून दिली आहे.काही देशांमध्ये आशा पध्दतीच्या अडचणी असताना रेल्वे मार्गाची काम झाली असल्याचा दाखला देवून यासाठी  केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा लागेल.मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ नेण्याची सूचना त्यांनी केली.

सोमवार, २९ जून, २०२६

श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट २०२६ सत्राकरीता प्रवेश सुरू श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डा संचालित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शिर्डी या संस्‍थेमध्‍ये ऑगस्‍ट - २०२६ सत्राकरीता प्रवेश देणे सुरू आहे. या संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ११ व्‍यवसायांच्‍या २१ व्‍यवसाय तुकडयामध्‍ये प्रशिक्षण दिले जाते. ऑगस्‍ट - २०२६ सत्राकरीता प्रवेश क्षमता २८० इतकी आहे. सन १९८४ साली संस्‍थेची स्‍थापना झालेली आहे. या संस्‍थेमधील सर्व व्‍यवसायांना डीजीटी, नवी दिल्‍ल‍ी यांचे कायमस्‍वरूपी संलग्‍नता आहे. सर्व व्‍यवसायांमध्‍ये अत्‍याधुनिक मशिनरीवर अभ्‍यास क्रमानुसार १००% प्रशिक्षण दिले जाते. याकामी असणारे सर्व प्रशिक्षक हे अनुभवी व उच्‍च विद्याविभूषित आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया ही संस्‍थेतील १००% प्रवेश क्षमतेच्‍या जागांवार महाराष्‍ट्र शासनाच्‍या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेने Online गुणवत्‍तेनूसार भरल्‍या जातात याकामी शासनाच्‍या नियमानुसार अत्‍यंत माफक प्रशिक्षण शुल्‍क आकारले जाते. सन २०२६ मध्‍ये या संस्‍थेत इलेक्‍ट्रीशियन, मेकॅनिक मोटर व्‍हेईकल, टूल अॅण्‍ड डायमेकर, मशिनिस्‍ट ग्राईंडर, टर्नर, फिटर, रेफ्रीजरेशन अॅण्‍ड एसी मेकॅनिक, इन्‍फॉर्मेशन अॅण्‍ड कम्‍युनिकेशन टेक्‍नॉलॉजी सिस्टिम मेन्‍टेंनन्‍स, वेल्‍डर, मेकॅनिक ट्रॅक्‍टर, कॉम्‍प्‍युटर ऑपरेटर अॅण्‍ड प्रोग्रामिंग असिस्‍टंट या व्‍यवसायासाठी प्रवेश चालू आहेत. या संस्‍थेची उत्‍कृष्‍ठ निकालाची परंपरा असुन संस्‍थेमधील सात प्रशिक्षणार्थी आजपर्यंत देशात प्रथम आलेले आहेत व २३ प्रशिक्षणार्थी राज्‍यात प्रथम आलेले आहेत. संस्‍थेला केंद्र शासनाच्‍या सात वेळा वेगवेगळया ट्रेडमध्‍ये सर्वोत्‍कृष्‍ट संस्‍था पुरस्‍कार मिळालेले आहेत. प्रशिक्षण पुर्ण होण्‍याच्‍या अगोदरच संस्‍थेतील प्रशिक्षणार्थ्‍याची वेगवेगळया नामांकित कंपन्‍यामध्‍ये Campus Interview चे आयोजन करून शिकाऊ ऊमेदवारी / नोकरीसाठी निवड केली जाते. यावर्षी सर्व व्‍यवसायातील ३८ प्रशिक्षणार्थींची लॉरीट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अॅण्‍ड ऑटोमेशन , अहिल्‍यानगर या कंपनीत व ४० प्रशिक्षणार्थी मॅशिओ गॅस पारडो इं.प्रा.लि.रांजणगाव या कंपनीत तसेच ८९ प्रशिक्षणार्थी टाटा मोटर्स, पुणे या कंपनीत शिकाऊ उमेदवारीसाठी निवड झालेली आहे तसेच काही प्रशिक्षणार्थी प्रतीक्षा यादीत आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या तसेच केंद्र शासनाच्‍या वेगवेगळया शिष्‍यवृत्‍ती याजेनांचा लाभ संस्‍थेतील प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्‍यांना मिळण्‍यासाठी संस्‍थेकडुन मार्गदर्शन केले जाते. यांचा लाभ संस्‍थेतील बहुतांश प्रशिक्षणार्थ्‍यांना होतो. श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रशिक्षण घेणारे बरेचसे प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील असल्‍यामुळे संस्‍थानने विनामुल्‍य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग संस्‍थेत सुरु केलेला आहे व याकामी जर्मन भाषा प्रशिक्षकाची नियुक्‍ती करणेत आलेली आहे. या सत्राकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍याची प्रक्रिया सुरू झालेली असुन दि. २१ मे२०२६ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍यासाठी मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू करणेत आलेले आहे. सर्व व्‍यवसायांसाठी १० वी उत्‍त‍ीर्ण व Welder या व्‍यवसायासाठी १० वी उत्‍त‍ीर्ण / अनुत्‍तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे. तरी जास्‍तीत जास्‍त विदयार्थ्‍यानी प्रवेश अर्ज भरून ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्‍यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से., यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य, श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, शिर्डी ( फोन नं. ०२४२३ - २५८८५८) यांचेशी संपर्क साधावा.

श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले,


मा. श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, यावेळी खा. संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, आ. आदित्य ठाकरे, सुनील शिंदे, माजी खासदार विनायक राऊत, चंद्रकांत खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते, दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला.

शनिवार, २७ जून, २०२६

युवा शक्ती जागर यात्रेतून भाजयुमोने राज्य नशामुक्त करण्याचा संदेश युवकांमध्ये पोहोचविण्याच आवाहन. पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी
 अमली पदार्थ मुक्त देश करण्यासाठी सुरू झालेल्या मोहीमेत भाजयुमोने सुध्दा पुढाकार घ्यावा.केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देशभर यासाठी  मोहीम सुरू केली आहे.राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कडक धोरण घेतले असून,,"युवा शक्ती जागर" यात्रेतून भाजयुमोने राज्य नशामुक्त करण्याचा संदेश युवकांमध्ये पोहचविण्याचे   आवाहन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या युवा शक्ती जागर यात्रेचे शुक्रवारी शिर्डीत आगमन झाले.यानिमित्ताने आयोजित केलेल्या युवा मोर्चाच्या मेळाव्यात मंत्री विखे पाटील यांनी युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,सरचिटणीस अशोक पवार भाजपयुमोचे उतर जिल्ह्याचे अध्यक्ष रोहीत चौधरी,नगराध्यक्षा सौ.जयश्री थोरात,उपनगराध्यक्ष अभय शेळके,भाजपाचे शहर अध्यक्ष रविंद्र गोंदकर,यांच्यासह उतर अहील्यानगर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देश नक्षलमुक्त करून दाखवला.आता अंमली पदार्थ मुक्त देश करण्यासाठी त्यांनी धडक मोहीम सुरू केली आहे. देशाच्या सामाजिक व्यवस्थेला  अमली पदार्थांचे रॅकेट उध्वस्त करीत आहेत. याविरोधातील   मोहीम यशस्वी करायची असेल तर, सर्वाच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,युवकांमध्ये जावून यासाठी प्रबोधन करावे लागेल.युवा मोर्चाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न व्हावेत आशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज देश एक परीवर्तनाच्या काळातून जात आहे. तरुणांचा देश म्हणून जगात भारताची ओळख आहे. त्यामुळेच देशातील युवा शक्तीला पुढे घेवून जाण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असून,देशाची युवा शक्ती म्हणजे बौध्दीक आणि उर्जासंपन्न शक्ती असल्याचे सांगून,मागील बारा वर्षात सर्वाधिक स्टार्ट अप,मेक इन इंडीया आणि डिजिटल इंडियाच्या प्रक्रीयेत युवा शक्तीला मोठे स्थान मिळाले असल्याकडे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

आज राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योगाची गुंतवणुक येत आहे.याचा उपयोग युवकांनाच होणार आहे.अहील्यानगर जिल्हा सुध्दा डिफेन्स उद्योगाचे मोठे केंद्र बनत आहेत.आत्मनिर्भर भारत योजनेतून सुरू असलेली उद्योगाची उभारणी ही देशातील युवाशक्तीचे बलस्थान असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय जनतेपर्यत घेवून जाण्याची मोठी जबाबदारी भाजयुमोवर आहे.सरकारचे काम समाजात सांगण्यास आपण कमी पडतो म्हणूनच काही शक्ती डोके वर काढून युवकांमध्ये  वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करतात.पण  आशा प्रवृतीना जनाधार नसतो.

भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांनी आपल्या भाषणात यात्रेमागील उद्देश विषद करताना सांगितले की,तरुणांना राष्ट्रीय  विचारांच्या प्रवाहात आणताना राज्याच्या सांस्कृतिक  अध्यात्मिक परंपरांची माहीती करून देण्याचा प्रयत्न आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास प्रक्रीयेची माहीती युवकांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष रोहीत चौधरी यांनी केले.

मुळा कारखान्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे निर्विवाद वर्चस्व अगोदरच १८ जागा बिनविरोध. - -चार उमेदवार प्रचंड मतांनी विजयी आमदार विठ्ठलराव लंघे उद्योगपती प्रभाकर शिंदे यांचे उमेदवाराचे डिपाॅझिट जप्त

मुळा कारखान्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे  उमेदवार प्रचंड मतांनी विजयी आमदार विठ्ठलराव लंघे उद्योगपती प्रभाकर शिंदे यांचे उमेदवाराचे डिपाॅझिट जप्त 
नेवासा
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या सहकार पॅनलने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विरोधी आमदार विठ्ठलराव लंघे उद्योगपती प्रभाकर शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे डिपाॅझिट जप्त झाले.शुक्रवार (दि. २६) रोजी सभासद मतदार संख्या १६९४१ पैकी ८३९५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला एकुण मतदान टक्केवारी ४९.५५ झाले. होते.मतमोजणी शनिवार दि.२७ रोजी नेवासा येथे पार पडली उमेदवारी अर्ज माघारीनंतर गडाख गटाच्या १८जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या, करजगाव गटातील दोन जागा आणि महिला प्रतिनिधीची दोन जागा यासाठीच निवडणूक पार पडली.
करजगांव गटातुन  मंत्री गडाख यांच्या सहकार पॅनलचे१) चंद्रकांत भानुदास टेमक (६८९४) २) डॉ ज्ञानेश्वर रामराव दरंदले (६७२५) महिला राखीव कमल चांगदेव दहिफळे (७४०१) विमल नारायण सोनवणे (७१९१) अपक्ष दिवटे मिराबाई भाऊसाहेब (१०००)
पराभूत करजगांव गट आमदार विठ्ठलराव लंघे, उद्योगपती प्रभाकर शिंदे यांच्या स्वाभिमानी शेतकरी पॅनलचे १) किरण लक्ष्मण जाधव (१०४१) २) नारायण दत्तात्रय डौले (८४७) अपक्ष गोरक्षनाथ मोहन जाधव (२०४) बाद मतं (३२५)

 विरोधी आमदार लंघे शिंदे गटाकडून सर्व जागांवर लढत दिली जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात विरोधकांना सर्व जागांसाठी उमेदवार उभे करता आले नाहीत. परिणामी २१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड झाल्याने विरोधी पॅनलवर केवळ तीन जागांसाठी निवडणूक लढविण्याची नामुष्की ओढवली होती.
माजी मंत्री शंकरराव गडाख सहकार पॅनलचे बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये सोनई गटातून वसंत चिमा कुसळकर, छाया भास्कर भुसारी व दिनकर अंबादास घावटे यांचा समावेश आहे. घोडेगाव गटातून लक्ष्मण तुळशीराम पांढरे, एकनाथ मारुती जगताप व दत्तात्रय भानुदास बऱ्हाटे, तर खरवंडी गटातून बापूसाहेब शंकर शेटे, भाऊसाहेब निवृत्ती मोटे व सोपान विठ्ठल विरकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
नेवासा गटातून बाळासाहेब पुंजाजी भणगे व त्रिंबक काशिनाथ सुकाळकर, तर प्रवरासंगम गटातून बाळासाहेब दादा पाटील व पांडुरंग श्रीरंग निपुंगे यांची निवड झाली आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून शंकरराव यशवंतराव गडाख, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शंकर पंढरीनाथ कदम, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भाऊसाहेब हरिभाऊ भालके आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून बाळासाहेब भाऊलाल परदेशी हे बिनविरोध संचालक झाले होते. 
गुलालाची उधळण करत नुतन संचालक तसेच कार्यकर्त्यांनी आनंद लुटला.नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांची मजबूत पकड पुन्हा एकदा दिसून आली. 
निवडणूक निर्णय अधिकारी प्रांतधिकारी सुधीर पाटील यांनी अप्रतिम असं नियोजन करून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली.

गुरुवार, २५ जून, २०२६

मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न

मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न
शिर्डी, 
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी आणि श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई (जयपूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचा उद्घाटन समारंभ आज श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम ), शिर्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या शिबिराचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष शिवाजी कचरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.), भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे  नारायण व्यास, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले,  वैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ मैथिली  पितांबरे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री कचरे यांनी बोलताना, हे शिबिर दि. २५ जून ते २७ जून २०२६ दरम्यान श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी येथे आयोजित करण्यात येणार असून श्रवणदोष असलेल्या नागरिकांच्या जीवनात या शिबिरामुळे सकारात्मक बदल घडून येणार असल्याने जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन  केले. 
शिबिरामध्ये तज्ज्ञ 
डॉक्टर व तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली श्रवण तपासणी करून पात्र लाभार्थींना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

मंगळवार, २३ जून, २०२६

ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती देण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा-ना.विखे पाटील

ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजाला शैक्षणिक सवलती देण्याच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करा-ना.विखे पाटील

 मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक

अहील्यानगर 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक व इतर सवलती देण्याबाबत दिनांक ५ जून २०२६ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे  संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदा  मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. 


विधान भवनात मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षतेखाली  मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली.या बैठकीत मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला आणि झालेल्या निर्णयाप्रमाणे अमंलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले.

या बैठकीस मंत्री मंडळातील
जलसंपदा मंत्री श्री. गिरीष महाजन,शालेय शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे,सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई,माहीती तंत्रज्ञान मंत्री श्री. आशिष शेलार,मदत व पुनर्वसन  श्री. मकरंद जाधव,सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील,वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ,रोजगार व उद्योजकता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या अडचणी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरावर तातडीने हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात यावी,तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त होणारी निवेदने व मागण्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या थेट देखरेखी खाली वर्गीकरण करण्याची प्रक्रीया सुरू करावी.  स्थानिक पातळीवरील मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, तसेच ज्या मागण्या/निवेदने राज्य शासनाशी संबंधित आहेत, ती आवश्यकते नुसार तात्काळ शासनाकडे सादर करावीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत  घेण्यात आला.

 जिल्हा व तालुकास्तरीय तक्रार निवारण प्रक्रियेचा प्रत्येक आठवड्याला सविस्तर आढावा घेऊन कार्यवाही करावी आणि त्याबाबतचा प्रगती अहवाल दर आठवड्याला राज्य शासनास सादर करावा, असे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीने प्रशासनाला दिले आहेत.

राज्य सरकारने ५ जून २०२६ रोजीच्या काढलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील किती विद्यार्थ्यांना आतापर्यंत या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे, याची सविस्तर आकडेवारी संबंधित विभागाने पुढील बैठकीत अनिवार्यपणे सादर करावी, असे निर्देश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीत अधिकार्यांना दिले असून,
मराठा आरक्षणाच्या उपसमितीची बैठक आता नियमितपणे घेतली जाणार आहे. चालू अधिवेशन कालावधी संपल्यानंतर, राज्य मंत्रिमंडळाच्या (कॅबिनेट) बैठकीनंतर या उपसमितीची बैठक घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.


मराठा समाजाच्या विविध योजना आणि आरक्षणाशी संबंधित बाबींचा पाठपुरावा करण्यासाठी एक स्वतंत्र 'मराठा कक्ष' तात्काळ कार्यरत करण्यात यावा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
न्यायमुर्ती शिंदे समितीच्या कामकाजाला गती देण्यासाठी त्यांना स्वतंत्र कार्यालयीन जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय तात्काळ घेण्यात यावा, अशा सूचनाही संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.@⁨all⁩

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर वकिली परीक्षेत घवघवीत यश"


जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर वकिली परीक्षेत घवघवीत यश
"
न्यायासाठी प्रामाणिकपणे लढणारा, सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करणारा आणि कायद्याचे सखोल ज्ञान असणारा वकीलच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो," असे प्रतिपादन भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले.
राहाता येथील अँड. संदीप पुंडलीक पुंड यांनी वकिलीच्या परीक्षेत 70.39 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा आणि भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पिपाडा म्हणाले की, ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. *जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अँड. संदीप पुंड आहे.* त्यांनी अथक परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि कायद्याचा सखोल अभ्यास यांच्या बळावर हे यश मिळविले आहे. त्यांच्या यशामुळे राहाता शहरासह गणेश परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
*अँड. संदीप पुंड यांनी साईसन कॉम्प्युटर क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देत समाजात शैक्षणिक योगदान दिले आहे.* आता कायद्याच्या क्षेत्रातही त्यांनी यशस्वी पाऊल टाकले असून राहाता न्यायालयाला एक प्रामाणिक, अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि जनसामान्यांच्या न्यायासाठी झटणारा युवा वकील मिळाला आहे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अँड. संदीप पुंड यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण, लूट व खंडणी प्रकरणात कारवाई

निलेश लंके प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष सतीश भालेकर एलसीबीच्या ताब्यात; मारहाण, लूट व खंडणी प्रकरणात कारवाई


पारनेर 
मारहाण, लूटमार आणि खंडणीशी संबंधित गुन्ह्यातील प्रमुख आरोपी म्हणून शोध घेत असलेल्या निलेश लंके प्रतिष्ठानचे पारनेर तालुकाध्यक्ष सतीश भालेकर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अटक केली आहे. या कारवाईमुळे पारनेर तालुक्यासह सुपा एमआयडीसी परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसणेफाटा एमआयडीसी परिसरातील सिलॉन बेव्हरेज कॅन प्रा. लि. कंपनीच्या मानव संसाधन (एचआर) विभागप्रमुखांवर हल्ला करून त्यांची सोन्याची चैन हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुपा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या वैभव रामदास रिकामे (रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) याला संबंधित कॉन्ट्रॅक्ट न मिळाल्याने नाराजी होती. त्यानंतर सतीश भालेकर यांच्या सांगण्यावरून कट रचण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

रुई छत्रपती फाटा परिसरात एचआर हेड महाडीक यांची दुचाकी अडवून आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच, सुपा एमआयडीसी परिसरात काम करण्यास मज्जाव करण्याच्या उद्देशाने धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेदरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही हिसकावून नेण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मात्र सतीश भालेकर फरार असल्याने त्यांचा शोध सुरू होता. अखेर एलसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतल्याने तपासाला गती मिळाली आहे.

दरम्यान, सुपा व म्हसणेफाटा एमआयडीसी परिसरातील उद्योग व्यवस्थापक आणि व्यावसायिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे. कॉन्ट्रॅक्टच्या नावाखाली दमदाटी, दबाव, खंडणीची मागणी किंवा अन्य प्रकारचा त्रास होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवार, २२ जून, २०२६

मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशनच्या ‘साई युग परिवर्तन’ उपक्रमातून नादब्रह्म संस्थेत संस्कारांची बीजं; साईचरित्र ग्रंथांनी उजळली विद्यार्थ्यांची मनं

"मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशनच्या ‘साई युग परिवर्तन’ उपक्रमातून नादब्रह्म संस्थेत संस्कारांची बीजं; साईचरित्र ग्रंथांनी उजळली विद्यार्थ्यांची मनं 

राहाता 
आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात केवळ शालेय शिक्षण पुरेसे नाही, तर मुलांच्या मनात संस्कार, श्रद्धा आणि सकारात्मक विचारांची पेरणी होणे तितकेच महत्त्वाचे आहे. याच भावनेतून "मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशन"च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या साई युग परिवर्तन अभियानांतर्गत पिंपळस (ता. राहाता) येथील नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेत "साई चरित्र ग्रंथ भेट सोहळा" उत्साहात पार पडला.
डॉ. पंकज येलम यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता — लहान वयातच मुलांच्या मनात श्रद्धा, सदाचार आणि आत्मविश्वासाची बीजे पेरणे. सध्या या संस्थेत १४० विद्यार्थी शालेय शिक्षणासोबत वारकरी परंपरेचेही शिक्षण घेत आहेत. त्यांना साईचरित्र, स्तवन मंजिरी आणि आरती पुस्तके भेट देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे होते. त्यांनी आपल्या जीवनातील संघर्षमय प्रवास सांगत विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा संदेश दिला — "परिस्थिती कशीही असली तरी मेहनत आणि जिद्द असेल तर यश निश्चित मिळते." त्यांच्या अनुभवांनी विद्यार्थ्यांच्या मनात नवी ऊर्जा निर्माण केली.
साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष श्री विजुभाऊ कोते यांनी सांगितले की, "साई चरित्र वाचणारा माणूस चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही." त्यांनी साईचरित्र पारायणाच्या माध्यमातून समाजात होत असलेल्या सकारात्मक बदलांची उदाहरणे देत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात श्री संजय शिंदे, श्री धनंजय सोनवणे, मेजर देशमुख सर, श्री निलेश जाधव, श्री दत्ता गायकवाड, डॉक्टर परमेश चव्हाण, सौ. सुश्मिता चव्हाण, सौ. ज्योती पिपाडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मनोमय फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाचा खरा परिणाम केवळ पुस्तक वितरणात नाही, तर त्या पुस्तकातून घडणाऱ्या विचारांमध्ये आहे. कारण जेव्हा एखाद्या मुलाच्या हातात साईचरित्र येते, तेव्हा त्याच्या मनात केवळ श्रद्धाच नव्हे, तर संयम, सेवा आणि सकारात्मकतेची नवीन दिशा निर्माण होते.
आजच्या डिजिटल युगात मन विचलित करणाऱ्या गोष्टी सहज उपलब्ध असताना, अशा उपक्रमांमुळे मुलांच्या मनाला योग्य दिशा मिळते — आणि कदाचित हाच खरा "युग परिवर्तन" आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव कुदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय सोनवणे यांनी केले.

शुक्रवार, १९ जून, २०२६

आमदार व्हायचे असते तर दोन महिन्यांपूर्वीच झालो असतो"; डॉ. सुजय विखेंचा थेट इशारा

आमदार व्हायचे असते तर दोन महिन्यांपूर्वीच झालो असतो"; डॉ. सुजय विखेंचा थेट इशारा

पदाचा माज, अहंकार आणि मगरुरी चालणार नाही" डॉ. सुजय विखे पाटील यांचा घणाघात

मेंदूचा डॉक्टर परत येतोय, मनोरुग्णांवर उपचार करणार डॉ. सुजय विखे पाटील यांचा निशाणा

लोणी, प्रतिनिधी : 

आज काही जण ज्या पदांचा आनंद घेत आहेत, ती पदे आम्ही स्वेच्छेने सोडून दिलेली आहेत. पद मिळाल्यानंतर त्याचा आनंद घ्यावा, परंतु त्यातून माज, अहंकार किंवा मगरुरी निर्माण होता कामा नये. लोकांनी दिलेल्या सन्मानाची जाणीव ठेवून काम करणे आवश्यक आहे. पद हे लोकांची कामे करण्यासाठी असते. समाजाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले, लोणी येथे प्रवरा बँकेच्या यूपीआय बँकिंग सेवेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, काही लोकांना कारखान्याचे चेअरमन व्हायचे असते, काहींना आमदार व्हायचे असते, तर काही जण विविध पदांसाठी धडपड करत असतात. मात्र आम्हाला आमदार व्हायचे असते, तर दोन महिन्यांपूर्वीच झालो असतो. पद मिळवणे हा आमचा उद्देश नाही. लोकांमध्ये जाण्यासाठी, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी आणि समाजकारण करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नसते. जनतेचा विश्वास आणि प्रेम हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.

राजकारणातील चढ-उतारांचा उल्लेख करताना त्यांनी आपल्या अनुभवांचाही संदर्भ दिला. पद यायला आणि जायला वेळ लागत नाही. मी स्वतः त्याचा जिवंत अनुभव घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही पदाचा गर्व न करता जमिनीवर राहून काम केले पाहिजे. पद कायमस्वरूपी नसते, मात्र लोकांशी असलेले नाते कायम राहते. म्हणूनच जनतेचा विश्वास जपणे हे कोणत्याही पदापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले विखे पाटील परिवाराच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना ते म्हणाले की, गेल्या अनेक दशकांपासून जनतेने आमच्या परिवारावर प्रेम केले आहे. आजही आम्ही गावात गेलो की लोक आपुलकीने भेटतात, स्वागत करतात. हे प्रेम आणि विश्वास कोणत्याही पदापेक्षा मोठे आहे. त्यामुळे पद मिळाले म्हणून लोकांपासून दूर जाणे किंवा सत्तेच्या बळावर वागणे योग्य नाही.

राजकीय विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी सूचक शब्दांत टोला लगावला. गेल्या सहा महिन्यांत आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता जास्त बोलण्याची गरज नाही. मेंदूचा डॉक्टर काही काळ बाहेर राहिल्यामुळे काही मनोरुग्ण बाहेर पडायला लागले आहेत. आता डॉक्टर परत येणार असून सर्वांवर उपचार करणार आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला.

समाजकारण, विकास आणि जनतेच्या प्रश्नांबाबत आपण पूर्वीप्रमाणेच सक्रिय राहणार असल्याचे सांगताना त्यांनी कार्यकर्त्यांनाही जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे आवाहन केले. लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याची आणि विकासाच्या कामांसाठी पाठपुरावा करण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील आगामी सहकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या परखड आणि आक्रमक वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पदापेक्षा लोकांचा विश्वास मोठा असून जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर कायम ठाम भूमिका घेत राहू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार भीमराज दराडे साहेब विठ्ठल पवार यांच्या हस्ते करण्यात आला

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करताना साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे साहेब व श्री साई संस्थान सोसायटी  चेअरमन श्री विठ्ठल पवार संचालक श्री राम गागरेआदी उपस्थित होते

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार श्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करताना साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे साहेब व श्री साई संस्थान सोसायटी चेअरमन श्री विठ्ठल पवार संचालक श्री राम गागरेआदी उपस्थित होते

मुळा कारखान्यात माजी मंत्री शंकरराव गडाख गटाच्या १८ जागा बिनविरोध. तीन जागांसाठी मतदानाची वेळ

मुळा कारखान्यात माजी मंत्री शंकरराव गडाख गटाच्या १८ जागा बिनविरोध.
 तीन जागांसाठी मतदानाची वेळ 

नेवासा 

मुळा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. गुरुवार (दि. १८) रोजी उमेदवारी अर्ज माघारीनंतर गडाख गटाच्या १८ जागा बिनविरोध निवडून आल्या असून, आता केवळ करजगाव गटातील दोन जागा आणि महिला प्रतिनिधीची एक जागा यासाठीच निवडणूक होणार आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर गडाख विरोधी गटाकडून सर्व जागांवर लढत दिली जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात विरोधकांना सर्व जागांसाठी उमेदवार उभे करता आले नाहीत. परिणामी २१ पैकी १८ जागांवर बिनविरोध निवड झाल्याने विरोधी पॅनलवर केवळ तीन जागांसाठी निवडणूक लढविण्याची नामुष्की ओढवली आहे.
बिनविरोध निवड झालेल्या उमेदवारांमध्ये सोनई गटातून वसंत चिमा कुसळकर, छाया भास्कर भुसारी व दिनकर अंबादास घावटे यांचा समावेश आहे. घोडेगाव गटातून लक्ष्मण तुळशीराम पांढरे, एकनाथ मारुती जगताप व दत्तात्रय भानुदास बऱ्हाटे, तर खरवंडी गटातून बापूसाहेब शंकर शेटे, भाऊसाहेब निवृत्ती मोटे व सोपान विठ्ठल विरकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.
नेवासा गटातून बाळासाहेब पुंजाजी भणगे व त्रिंबक काशिनाथ सुकाळकर, तर प्रवरासंगम गटातून बाळासाहेब दादा पाटील व पांडुरंग श्रीरंग निपुंगे यांची निवड झाली आहे. सहकारी संस्था मतदारसंघातून शंकरराव यशवंतराव गडाख, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून शंकर पंढरीनाथ कदम, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून भाऊसाहेब हरिभाऊ भालके आणि विमुक्त जाती-भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातून बाळासाहेब भाऊलाल परदेशी हे बिनविरोध संचालक झाले आहेत.
दरम्यान, करजगाव गटात गडाख गटाचे ज्ञानेश्वर रामराव दरंदले व चंद्रकांत भानुदास टेमक यांच्याविरोधात किरण जाधव, नारायण डौले तसेच अपक्ष उमेदवार गोरक्षनाथ जाधव रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधी मतदारसंघात गडाख गटाच्या कमल चांगदेव दहिफळे व विमल नारायण सोनवणे यांच्याविरोधात मीरा दिवटे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.
१८ जागांवर बिनविरोध निवड झाल्यामुळे नेवासा तालुक्यातील सहकार क्षेत्रावर माजी मंत्री शंकरराव गडाख यांची मजबूत पकड पुन्हा एकदा दिसून आली.

गुरुवार, १८ जून, २०२६

गणेशनगर शाळेला राजेंद्र जाधव यांचे कडून चार्जिंग साऊंड सिस्टिम भेट

गणेशनगर शाळेला राजेंद्र जाधव यांचे कडून चार्जिंग साऊंड सिस्टिम भेट

गणेशनगर जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आणि एसटी महामंडळाचे आदर्श कर्मचारी राजेंद्र जाधव यांनी आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेत आपल्याला संस्काराचे धडे मिळाले ,त्या गणेशनगर शाळेला चार्जिंग साऊंड सिस्टिम अकरा हजार रुपयांची भेट दिली. यावेळी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे आणि राहता बस स्थानक प्रमुख किरण राऊत यांच्या हस्ते मुख्याध्यापकांच्याकडे सुपूर्त केली. या अगोदरही राजेंद्र जाधव यांनी आपल्या वर्ग मित्रांच्या मदतीने परिसरामध्ये सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग घेतलेला आहे. परिसरात एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. याप्रसंगी अनिल काका गाढवे म्हणाले की गणेशनगर शाळेची दिवसेंदिवस प्रगती होत आहे, शिक्षक वर्ग चांगला मिळाला आहे, विद्यार्थ्यांना शिस्त आहे, तालुक्यात आणि जिल्ह्यात शाळेचा नावलौकिक वाढलेला आहे. गणेश कारखान्याच्या वतीने शक्य तेवढी मदत शाळेला केली जात आहे. सत्कार प्रसंगी राजेंद्र जाधव म्हणाले की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे , घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे  हातही घ्यावे, तसेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या माध्यमातून माझी फार आर्थिक परिस्थिती भक्कम नसताना देखील मी शाळेने केलेल्या संस्कारातून उतराई होण्यासाठी साऊंड सिस्टिम भेट दिली. यापुढेही मला शक्य तेवढी मदत शाळेला करत राहील. या शाळेने माझ्यावर अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केल्यामुळे मी घडलो आहे. सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संहत घोलप यांनी शाळेची पार्श्वभूमी सांगितली. पदवीधर शिक्षक कैलास चिंधे यांनी शाळेतील विविध उपक्रम आणि शाळेचा गरजा याविषयी सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड यांनी केले तर आभार सुनिता गागरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनील गायकवाड, भाऊसाहेब सहाने ,रोशन धनवटे, व्हेरोनिका गायकवाड, सोनल भावसार, मनीषा निर्मळ यांनी विशेष प्रयत्न केले .शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत कार्यालय रांजणगाव यांनी देखील राजेंद्र जाधव यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचे आयोजन; गरजवंतांनी लाभ घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे आवाहन

मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचे आयोजन; गरजवंतांनी लाभ घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे आवाहन

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती, मुंबई (जयपूर) व एनएससी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ ते २७ जून २०२६ दरम्यान श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम), शिर्डी येथे मोफत श्रवणयंत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी राहणार आहे.
शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर व श्रवणतज्ज्ञांकडून ऑडिओमेट्री तपासणी करण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार मोफत श्रवणयंत्रे देण्यात येतील.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी श्रवणदोषग्रस्त गरजू नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
लाभार्थ्यांनी आधार कार्ड अथवा शासकीय ओळखपत्र, रेशनकार्ड, अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास) व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत. बाहेरगावाहून येणाऱ्यांसाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी श्री साईनाथ रुग्णालय, शिर्डी (०२४२३-२५८५५५) येथे संपर्क साधावा, असे संस्थान प्रशासनाने कळविले आहे.

डॉ. सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द केला पूर्ण; विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर

डॉ. सुजय विखे पाटलांनी दिलेला शब्द केला पूर्ण; विनयभंग प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर

राहाता, 
राहाता शहरात अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी कठोर कारवाईची भूमिका घेतलेल्या भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिलेला शब्द अखेर पूर्ण झाला आहे. प्रशासनाने संबंधित आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवत कारवाई केली.

घटना घडल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर पोलीस, महसूल आणि नगरपालिकेच्या प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला.

या कारवाईमुळे राहाता शहरासह संपूर्ण तालुक्यात कायद्याचा धाक निर्माण झाला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. गुन्हेगार कोणताही असो, त्याला कायद्यापुढे झुकावेच लागेल, ही भूमिका या कारवाईतून अधोरेखित झाली आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी याप्रसंगी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पीडितेला न्याय मिळवून देणे आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. कायद्याच्या चौकटीत राहून अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.”

दरम्यान, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून पीडित कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

बुधवार, १७ जून, २०२६

मोदींच्या विकासदृष्टीला नवी गती; पुणे–शिर्डी रेल्वेसेवेचे सुजय विखे पाटलांकडून स्वागत.. पुणे शिर्डी थेट रेल्वे म्हणजे विकासाचा नवा ट्रॅक; सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया

मोदींच्या विकासदृष्टीला नवी गती; पुणे–शिर्डी रेल्वेसेवेचे सुजय विखे पाटलांकडून  स्वागत..

पुणे शिर्डी थेट रेल्वे म्हणजे विकासाचा नवा ट्रॅक; सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया

अहिल्यानगर 
पुणे ते शिर्डी दरम्यान पहिल्यांदाच थेट रेल्वेसेवा सुरू होत असून, यामुळे साईभक्तांसह हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत या नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन आज बुधवारी (१७ जून) करण्यात आले.

भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले, शिर्डी हे देशातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. पुण्याहून मिळालेल्या या पहिल्या थेट रेल्वे सुविधेमुळे लाखो भाविकांची मोठी सोय होणार असून धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुणे–शिर्डी थेट रेल्वेसेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा विकासाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आले असून नवीन रेल्वेमार्ग, आधुनिक स्थानके, वंदे भारतसारख्या अत्याधुनिक गाड्या आणि प्रवाशांसाठी वाढलेल्या सुविधा यामुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलत आहे.पुणे–शिर्डीसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर थेट रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यामागे केंद्र सरकारची विकासाभिमुख भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील धार्मिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यावर विशेष भर दिला जात आहे. पुणे–अहिल्यानगर–शिर्डी रेल्वेसेवा ही त्याच दृष्टीकोनाचा भाग असून यामुळे भाविक, विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिक यांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे नेटवर्कच्या विस्तारामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून विकसित भारताच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

दररोज धावणारी ही रेल्वे पुणे, अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर मार्गे शिर्डीपर्यंत धावणार आहे. त्यामुळे केवळ भाविकांच्याच नव्हे तर विद्यार्थी, रुग्ण आणि व्यावसायिकांच्याही प्रवासाचा वेळ व खर्च कमी होणार आहे. पुण्यातील शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांपर्यंत पोहोचणे ता अहिल्यानगर आणि शिर्डी परिसरातील नागरिकांसाठी अधिक सुलभ होणार आहे.

यापूर्वी पुण्यातून शिर्डीसाठी थेट आणि नियमित रेल्वे उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांना बस किंवा खासगी वाहनांचा पर्याय निवडावा लागत होता. नव्या रेल्वेसेवेमुळे प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि किफायतशीर होणार आहे.

दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अशा परिस्थितीत पुणे–शिर्डी थेट रेल्वेसेवा सुरू झाल्याने धार्मिक पर्यटन, व्यापार, दळणवळण आणि प्रादेशिक विकासाला मोठी गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

मंगळवार, १६ जून, २०२६

महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा; नेवासा न्यायालयाचा निकाल

महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा; नेवासा न्यायालयाचा निकाल 

नेवासा (तालुका प्रतिनिधी):-
               जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावून महिलेवर अत्याचार करणे, तिच्यावर चाकूने वार करून जबर जखमी करणे आणि सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या नराधम आरोपीला नेवासा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. माननीय जिल्हा व अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांनी आरोपी बाबासाहेब किसन क्षीरसागर (वय ४५, मूळ रा. राहाटणी फाटा, (ता. हवेली) जि. पुणे, सध्या रा. धामणगाव, ता. जामखेड) याला आयपीसी (IPC) कलम ३०७ अन्वये ५ वर्षांचा तुरुंगवास आणि १०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 
               या खटल्यातील २८ वर्षीय पीडित महिला (फिर्यादी) आणि आरोपी बाबासाहेब क्षीरसागर हे दोघे एकत्र जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत असल्याने त्यांची ओळख होती. २४ जून २०२४ रोजी सकाळी, फिर्यादी तिच्या आई-वडिलांच्या घरी फत्तेपूर येथे असताना आरोपीने तिला फोन केला. कुकाणा व वडाळा येथे जागरण गोंधळाचे कार्यक्रम आहेत, तू लवकर ये, मी फत्तेपूर बस स्टॉपवर थांबलो आहे.असे त्याने सांगितले. त्यानुसार फिर्यादी बस स्टॉपवर आली. तेथून आरोपीने तिला घोडेगाव रस्त्याने पायी चालत फिरण्याच्या बहाण्याने नेले. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाजवळील कठड्यावर दोघे बसले असताना, आरोपीने फिर्यादीच्या खांद्यावर हात ठेवला. फिर्यादीने त्याचा हात झटकून तीव्र विरोध केला.
त्यानंतर आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने ओढत नेऊन रस्त्याशेजारील शेतात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. फिर्यादीने प्रतिकार केला असता, आरोपीने चाकूची भीती दाखवून तिच्या मानेवर वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच तिच्या शरीरावर इतरही जखमा केल्या. त्यानंतर तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटून,कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. पीडित महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहमदनगर येथे दाखल केले. ती शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांसमोर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यावरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १६७/२०२४, भादवि (IPC) कलम ३७६, ३२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर   यांनी तपासाचे चक्र तातडीने फिरवत आरोपीला अटक केली. पीडिता व आरोपीची वैद्यकीय तपासणी करून साक्षीदारांचे जबाब नोंदवून सबळ पुराव्यांसह नेवासा जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. मा. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित महिला, वैद्यकीय अधिकारी (डॉक्टर) आणि तपास अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला आयपीसी कलम ३०७ खाली दोषी ठरवत ५ वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली.
         सदर गुन्ह्याचा  तपास शनिशिंगणापूर तत्कालीन पोलीस निरीक्षक  खगेन्द्र टेंभेकर  यांनी व पोलीस पथक  ASI माळवे, ASI कारखेले, HC मोकाटे, घोडके, लबडे, , PC ठुबे, हिवाळे, पोंधे झिने, LPC गर्जे व गोरे यांनी कामकाज केले असून या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विष्णुदास के. भोर्डे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना महिला पोलीस कर्मचारी स्वाती तडूलकर यांनी न्यायालयात मोलाचे सहकार्य केले.

पुन्हा नेवासा तालुक्यात बनावट खत कारखाना उघडकीस

पुन्हा नेवासा तालुक्यात बनावट खत कारखाना उघडकीस 

कृषी, पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई 
नेवासा (तालुका प्रतिनिधी):-पांढरीपुल येथील शिंगवे तुकाई (ता. नेवासा) हद्दीतील एम.आय.डी.सी. येथे एका खत कंपनीवर कृषी विभागाने कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने बनावट पद्धतीने रासायनिक खतांचे पॅकिंग व साठवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत 2,034 गोण्या रासायनिक खतांचा सुमारे 21 लाख 80 हजार 486 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कंपनीचे मालक किरण चंद्रकांत दौंडकर (रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी अधिकारी वाल्मिक एकनाथ सुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 15 जून रोजी रात्री 9 ते पहाटे  रोजी पहाटे 2.30 वाजेपर्यंत शिंगवे तुकाई येथील कृषी गौरव फर्टिलायझर्स प्रा. लि. येथे करण्यात आली.

तपासणीदरम्यान संबंधित कंपनीकडे स्वतःच्या नावाने खत उत्पादन व विक्रीचा परवाना असतानाही इतर विविध कंपन्यांच्या नावाने खतांचे उत्पादन, पॅकिंग व अनधिकृत साठवणूक केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. कृषी विभागाने पंचांसमक्ष खतांचे नमुने घेऊन काही खतांच्या गोण्या जागेवरच सीलबंद केल्या, तर उर्वरित साठा जप्त करण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या खतांमध्ये विविध कंपन्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एकूण 2,034 गोण्या असून त्यांची अंदाजे किंमत ₹21,80,486 इतकी आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट खत व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणी बी.एन.एस. कलम 318 (4) तसेच रासायनिक खत (नियंत्रण) आदेश 1985 मधील संबंधित तरतुदी आणि आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या पथकाने सोनई पोलिसांच्या मदतीने केली. पुढील तपास पोलीस सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करीत आहेत. या कारवाईमुळे बनावट किंवा अनधिकृत खत उत्पादन व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सदर यशस्वी कामगिरी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे प्र.कृषी विकास अधिकारी विकास काळे, निलेश अभंग, कृषी अधिकारी (पं.स. नेवासा) वाल्मीक सुडके, तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेवासाचे कृषी अधिकारी सुहास धस, पंचायत समिती पारनेरचे कृषी अधिकारी राहुल कदम यांच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी पार पाडली.

या धडक मोहिमेसाठी कृषी विभागाचे माननीय संचालक (गुण नियंत्रण) सुनील बोरकर साहेब, माननीय कृषी सहसंचालक बाळासाहेब जेजुरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक देशमुख, अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सुधीर शिंदे कृषि विकास अधिकारी अहिल्यानगर यांचे मार्गदर्शन लाभले.
----दहा महिन्यापुर्वी नेवासा बु. येथे बनावट खत कारखाना उघडकीस आला होता. पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हि झालेली कारवाई कायद्याला हि जुमानत नाही.आजहि जिल्ह्यात ठराविक कृषी सेवा केंद्र चालकाकडून सर्राश बनावट खत विकलं जातं आहे. 

प्रतिक्रिया - ज्या पद्धतीने जिल्ह्यातील  अवैध धंदे, गर्भलिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केला असून त्याच पद्धतीने जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन, नगर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मै पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, एलसीबीचे जिल्हाप्रमुख संतोष मुटकुळे यांनी बनावट खत कारखाने शोध मोहिम राबवून गंभीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धनंजय पाटील तसेच शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.

सोमवार, १५ जून, २०२६

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल गायकवाड यांच्या कडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल गायकवाड यांच्या कडून  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अहिल्यानगर : 
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोकळे वस्ती येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
साहेबांच्या आदेशा नुसार  पुष्पगुच्छ  शाल हार याचा खर्च न करता  शालेय विद्यार्थ्यांना  शालेय वस्ती द्या त्या पद्धतीने

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ गायकवाड यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिली तसेच इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी अनिलभाऊ गायकवाड म्हणाले की, “मा.  विखे पाटील साहेब हे जनतेच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले लोकनेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू भेट देऊन  उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे हीच आमची भावना आहे.”

मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही शालेय साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
 या वेळी  जनसेवा परिवर्तन मंडळाचे संदीप लावरे पाटील साईबाबा दूध संकलन केंद्राचे चेअरमन शरद मुरादे  जि. प .प्रा. शाळेचे व्यवस्थापन समितीचे  उपाध्यक्ष कैलास मुरादे यांनी याचे मनोगत व्यक्त केले या वेळी  संदेश गायकवाड राजेंद्र मुरादे ऋषी गायकवाड रामभाऊ मुरादे अक्षय गायकवाड सागर मुरादे कैलास मुरादे  व  तसेच शाळेच मुख्याध्यापक संदीप वाघमारे सर  दिनेश राठोड सर सदगीर सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले

गणेशनगर जिल्हा परिषद शाळेत शाळेचा पहिला दिवसजल्लोषात साजरा झाला.

गणेशनगर जिल्हा परिषद शाळेत शाळेचा पहिला दिवसजल्लोषात साजरा झाला.

नवीन शैक्षणिक वर्ष पंधरा जून रोजी सुरु झाले. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तके वाटप करण्यात आली, तसेच अहिल्यनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमिताने रांजणगाव खुर्द तालुका राहाता येथील सरपंच सौ सुनीताताई सोपानराव कासार व दत्तगुरु पतसंस्था गणेशनगर पतसंस्था चे आद्य प्रवर्तक श्री सोपानराव कासार यांच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच सर्व नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि चॉकलेट, कार्टून टोप्या, खेळणी देऊन स्वागत केले. पहिल्याच दिवशी प्रभात फेरी, मिष्ठान्न भोजन, विविध प्रकारचे मनोरंजक खेळ घेण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रोहिणी ताई घोगळ , सदस्य जयंतराव गिरमे, दानशूर व्यक्ती व एस टी महामंडळ आदर्श कर्मचारी राजेंद्र जाधव,तसेच सर्व सदस्य, पालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. शाळेचे वतीने श्री व सौ कासार यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रम सूत्रसंचालन  कैलास चिंधे आणि आभार दत्ता गायकवाड यांनी मानले.

रविवार, १४ जून, २०२६

पुणे येथील सिंचन भवनांमध्ये जल संपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा व गोदावरी लाभ क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणामधील पाणीसाठा या संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली

अहील्यानगर  

      राज्‍यातील अपु-या पर्जन्‍यमानाच्‍या पार्श्‍वभूमीवर तसेच धरणातील उपलब्‍ध पाणीसाठा विचारात घेवून ३१ ऑगस्‍ट २०२६ पर्यंत नागरीकांना पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा सुनिश्चित करण्‍यास सर्वौच्‍च प्राधान्‍य देण्‍याचे निर्देश जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिले आहे. बेकायदेशिर पाणी उपश्‍यावरही तातडीने कडक कारवाई करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या.

      पुणे येथील सिंचन भवनामध्‍ये जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत कृष्‍णा व गोदावरी लाभक्षेत्राच्‍या अंतर्गत येणा-या धरणांमधील पाणीसाठा, अगामी मान्‍सुनची परिस्थिती या संदर्भात महत्‍वपूर्ण बैठक संपन्‍न झाली. या बैठकीला कृष्‍णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयवंत गवळी यांच्‍यासह मुख्‍य अभियंता, अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

      सद्य परिस्थितीत राज्‍यातील धरणांमधील एकुण उपयुक्त जलसाठा ३५७.५ टिएमसी (२५ टक्के) असून, तो गतवर्षीच्‍या तुलणेत कमी असल्‍याचे निदर्शनास आले. यावर्षीचे पर्जन्‍यमान अत्‍यल्‍प झाल्‍यामुळे धरणात पाणी आले नाही हे त्‍यामागील प्रमुख कारण आहे. विशेषत: पुणे विभागातील उपयुक्‍त जलसाठा गतवर्षीच्‍या तुलनेक कमी असल्‍याने परिस्थिती गांभिर्याने हाताळावी असे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले.

      पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील सुमारे ८५ लाख नागरीकांना ३१ ऑगस्‍टपर्यंत पिण्‍याचे पाणी उपलब्‍ध राहण्‍यासाठी आवश्‍यक असलेले पाणी राखीव ठेवण्‍याच्‍या सुचना या बैठकीत मंत्र्यांनी प्राधान्‍याने दिल्‍या आहेत. मराठावाडा आणि कृष्‍णा महामंडळाच्‍या  अंतर्गत येणारे सर्व धरणं, जलाशय व प्रमुख जलस्‍त्रोतांमधील उपलब्‍ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्‍यावा, त्‍यावर अवलंबून असलेल्‍या लोकसंख्‍येचा विचार करुन पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी आवश्‍यक राखीव कोटा निश्चित करण्‍याबाबतही बैठकीत जलसंपदा मंत्र्यानी सुचित केले. जलसंपदा विभाग, जिल्‍हाधिकारी, महानगरपालिका, जिल्‍हा परिषद आणि पाणीपुरवठा यंत्रणा यांच्‍यात प्रभावी समन्‍वय ठेवून पाणी व्‍यवस्‍थापनाचा कृती आराखडा तातडीने तयार करण्‍याचे निश्चित करण्‍यात आले.

      नाशिक, अहिल्‍यानगर व मराठवाडा विभागातील जलसाठ्याचा आढावा घेताना नाशिक विभागात सध्‍या २६ टक्‍के तर मराठवाडा विभागात २८ टक्‍के उपयुक्‍त जलसाठा उपलब्‍ध असून, दोन्‍हीही विभागातील प्रकल्‍पांमध्‍ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही. विशेषत: मराठवाडा आणि अहिल्‍यानगर विभागातपिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या गरजांना प्राधान्‍य देवून उपलब्‍ध जलसाठ्याचे काटेकारपणे नियोजन करण्‍याबातही गांभिर्याने कार्यवाही करण्‍यास आधिका-यांना सांगण्‍यात आले आहे.

      नाशिक, अहिल्‍यानगर, पुणे, मराठवाडा विभागातील जलशयांमध्‍ये मोठ्या प्रमाणावर पाण्‍याची नवीन आवक सुरु होईपर्यंत असलेल्‍या पाण्‍याचा वापर अत्‍यंत जपून करावा. अगामी मान्‍सुनच्‍या अनिश्चिततेच्‍या पार्श्‍वभूमीवर प्रत्‍येक जिल्‍ह्यासाठी स्‍वतंत्र कृती आराखडा तयार करतानाच पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा, ग्रामीण व शहरी भागातील टंचाई निवारण आणि जलस्‍त्रोतांचे संरक्षण करण्‍यावर भर देण्‍याबातही बैठकीत ठरविण्‍यात आले.

      अहिल्‍यानगर जिल्‍ह्यासह गोदावरी खो-यातील विविध प्रकल्‍पांची स्थिती लक्षात घेता स्‍थानिक प्रशासन, जलसंपदा विभाग व पाणीपुरवठा यंत्रणांनी समन्‍वयाने काम करुन पाण्‍याचे नियोजन करावे, उपलब्‍ध जलसाठ्याचा वापर अत्‍यावश्‍यक गरजांसाठी करण्‍याबाबत जनजागृती करण्‍याचे आवाहनही मंत्री विखे पाटील यांनी या बैठकीत आधिका-यांना केले आहे.

 *कोट –*

      उपलब्‍ध पाण्‍याचा वापर सर्वप्रथम पिण्‍यासाठी करण्‍यात यावा, बेकायदेशिर पाणी उपसा रोखण्‍यासाठी विशेष माहीम राबवण्‍यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभाग यांच्‍या  संयुक्‍त पथकांमार्फत कठोर करावाई करण्‍याबाबतही स्‍पष्‍ट आदेश मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिले आहेत.@all

संवादातून आत्मविश्वास, सेवेतून सन्मान– मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशनकडून श्री साईबाबा संस्थानात ७,५०० सॅनिटरी पॅड डोनेट

संवादातून आत्मविश्वास, सेवेतून सन्मान– मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशनकडून श्री साईबाबा संस्थानात ७,५०० सॅनिटरी पॅड डोनेट

मासिक पाळी जीवनाची सातत्यता जपणारी एक अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया… पण समाजाच्या मानसिक रचनेत ती आजही ‘लपवण्याची’, ‘सहन करण्याची’ आणि ‘बोलू न देण्याची’ गोष्ट म्हणूनच रुजलेली आहे. ही केवळ शरीराशी संबंधित बाब नाही; ती अनेक महिलांच्या मनात वर्षानुवर्षे साचलेल्या संकोच, अपराधीपणा आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेची न बोललेली कथा आहे. अशा या खोल मानसिकतेला बदलण्याचा धाडसी आणि संवेदनशील प्रयत्न मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशन, राहाता (शिर्डी) यांनी ‘रक्त संवाद’ या उपक्रमातून करत समाजासमोर एक नवा दृष्टिकोन ठेवला.
श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात पार पडलेल्या या उपक्रमात तब्बल ७,५०० सॅनिटरी पॅडचे वितरण करण्यात आले. मात्र, हा कार्यक्रम केवळ आकड्यांचा नव्हता—तो विचारांचा, भावनांचा आणि मानसिकतेचा प्रवास होता. प्रत्येक सॅनिटरी पॅडसोबत महिलांच्या मनात दडलेल्या एका प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न होता—“मी चुकीची आहे का?” आणि त्या प्रत्येक प्रश्नाला मिळालेलं उत्तर होतं—“नाही… तू नैसर्गिक आहेस, तू सक्षम आहेस, तू शक्ती आहेस.”
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री गोरक्ष गाडेलकर, उपकार्यकारी अधिकारी मा. श्री दराडे सर, प्रशासकीय अधिकारी मा. श्री अतुल वाघ तसेच प्रसादालय विभाग प्रमुख मा. श्री संजय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे या उपक्रमाला केवळ प्रशासनिक पाठबळ मिळाले नाही, तर एक सकारात्मक सामाजिक दिशा मिळाली.
‘रक्त संवाद’ या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे — मौनातून संवादाकडे, आणि संवादातून स्वीकृतीकडे प्रवास. समाजाने वर्षानुवर्षे महिलांच्या मनात रुजवलेले ‘हे बोलायचं नाही’, ‘हे लपवायचं’, ‘हे चुकीचं आहे’ असे विचार त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात. मानसशास्त्र सांगते की, जेव्हा एखादी नैसर्गिक प्रक्रिया ‘लाज’ आणि ‘अपराधीपणा’शी जोडली जाते, तेव्हा व्यक्तीचा आत्मसन्मान कमी होतो, ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागते आणि नकळत स्वतःपासून दूर जाऊ लागते.
याच ठिकाणी ‘रक्त संवाद’ हा उपक्रम एक मानसिक उपचार (psychological healing) म्हणून पुढे येतो. संवादाच्या माध्यमातून महिलांना स्वतःला व्यक्त करण्याची, ऐकले जाण्याची आणि स्वीकारले जाण्याची संधी मिळाली. अनेक महिलांनी पहिल्यांदाच आपल्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसल्या—हा क्षण केवळ संवादाचा नव्हता, तर तो आत्ममुक्तीचा आणि आत्मस्वीकाराचा टर्निंग पॉईंट होता.
या उपक्रमातून एक व्यापक आणि दूरदृष्टी असलेला संदेश स्पष्टपणे समोर आला—
समाज बदलायचा असेल, तर केवळ सुविधा देऊन चालत नाही, तर विचार बदलावे लागतात… आणि विचार बदलायचे असतील, तर संवाद निर्माण करावा लागतो.
मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशनने नेमकं हेच साध्य केलं. त्यांनी केवळ सॅनिटरी पॅड वाटले नाहीत, तर त्यांनी महिलांच्या मनात दडलेल्या अंधाराला उजेड दिला. त्यांनी लाजेच्या जागी आत्मविश्वास, भीतीच्या जागी समज आणि मौनाच्या जागी संवाद निर्माण केला.
या उपक्रमाच्या यशामागे फाउंडेशनच्या टीम मेंबर्सचे समर्पण, संवेदनशीलता आणि समाजाबद्दलची बांधिलकी ठळकपणे दिसून आली. डॉ. येलम, पल्लवी नरारे, डॉ. संकेत येलम, किरण वाणी, डॉ. मीनाक्षी राठोड, रोहित राठोड, पोपट गायकवाड, सागर जाधव, तुषार पगार (संभाजीनगर), अथर्व शेळके, खुशी गमे, आकांक्षा खुसपरे, वैष्णवी सांबारे आणि इतर सदस्यांनी केवळ जबाबदारी पार पाडली नाही, तर प्रत्येक महिलेशी भावनिक नातं जोडत हा उपक्रम एक जिवंत अनुभव बनवला.
आज राहाता येथे घडलेली ही घटना केवळ एक कार्यक्रम नाही…
ती एक सामाजिक चळवळीची सुरुवात आहे.
ती एक मानसिक क्रांतीची बीजं आहेत.
आणि ती एक भविष्यातील सशक्त, आत्मविश्वासी आणि जागरूक समाजाची दिशा आहे.
कारण शेवटी —
बदल बाहेर घडत नाही… तो आधी मनात घडतो.
आणि ‘रक्त संवाद’ने आज हजारो मनांमध्ये तो बदल सुरू केला आहे.

शनिवार, १३ जून, २०२६

डॉ. संजय उबाळे यांचा नगरपालिकेत सन्मान

डॉ. संजय उबाळे यांचा नगरपालिकेत सन्मान

राहाता : 
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय सदस्य तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या राहाता तालुका सह संपर्क समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संजय उबाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री (जलसंपदा) तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "नामदार मॅरेथॉन स्पर्धा" नियोजन बैठकीदरम्यान हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष विजय सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

डॉ. संजय उबाळे यांनी लायन्स क्लब राहाता व लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरीय व विभागीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच समाजरत्न पुरस्कार, वर्ल्ड लंडन बुक ऑफ रेकॉर्ड सन्मान आणि लायन्स क्लबचे विविध पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या राष्ट्रीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर यांच्या हस्ते त्यांची राहाता तालुका सह संपर्क समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल नुकतेच अभिनंदन करण्यात आले.

सन्मान सोहळ्यावेळी चौधरी साहेब, नायब तहसीलदार हेमंत पाटील, नगरसेवक प्रवीण रूणवाल, दशरथ तुपे, राहुल सदाफळ, नितीन गाडेकर, सुयोग शेळके, ॲड. मयूर पाळंदे, अजय आग्रे, प्रदीप बनकर, अक्षय बोठे, योगेश डांगे, अजय डांगे, अरुण मोकळ, गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा व रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकारी, लायन्स क्लब ऑफ राहता चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, साईश्रध्दा परिसरातील विविध पदाधिकारी सर्वच स्तरांमधून अभिनंदन करण्यात येत आहे 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नगरसेवक दशरथ तुपे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व दूरदर्शी नेतृत्वामुळे देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे

अहिल्यानगर, 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्षे ठरली असून, भारत देशाने नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे. 'सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास' हा मंत्र केवळ कागदावर न राहता देशातील विकासात्मक वाटचालीतून प्रत्यक्षात उतरला असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकीर्दीस १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री विखे पाटील यांनी मागील १२ वर्षांत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.याप्रसंगी भाजपाचे  जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग उतरेचे नितीन दिनकर प्रदेश पदाधिकारी प्रा.कोरडे उपमहापौर धनंजय जाधव नगरसेवक निखिल वारे याप्रसंगी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व दूरदर्शी नेतृत्वामुळे देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. २५ कोटी लोक प्रत्यक्षात गरिबीच्या बाहेर आले असून, देशातील ८१ कोटी लोकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले असून, ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ४.२७ लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून १०.२ लाख कोटी रुपयांचे वितरण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील १२ कोटी कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला असून, ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांचा यामध्ये समावेश आहे. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, प्रधानमंत्री आवास योजनेतून आतापर्यंत ४ कोटी कुटुंबांना घरांची उपलब्धता करून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले असून, ३ कोटी 'लखपती दीदी' देशामध्ये निर्माण झाल्या आहेत. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १ कोटी लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात ७० टक्के ही ऐतिहासिक वाढ झाली असून, अन्नदाता सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत. दूध उत्पादनातही मागील १० वर्षांत ६९.४ टक्के वाढ झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार 'प्रत्येक थेंबातून अधिक पीक' यासाठी १०९ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले असून, पाण्याच्या बचतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. देशात आणि राज्यात नदीजोड प्रकल्पांना दिलेले प्राधान्य आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अपूर्ण कामांना मिळालेली गती याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

देशात १.४६ लाख कि.मी. पर्यंतच्या महामार्गांची कामे, रेल्वेचे आधुनिकीकरण आणि देशातील १,३३७ रेल्वे स्थानकांना आधुनिक दर्जा मिळवून देण्यासाठी काम सुरू झाले आहे. १६४ हून अधिक वंदे भारत ट्रेन सध्या नागरिकांना सुविधा देत आहेत. देशामध्ये डिजिटल क्रांतीची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली झाली असून, यामुळे सामान्य माणसाच्या राहणीमानातील सुलभता वाढून जीवन अधिक सुकर झाले आहे. ६ कोटींहून अधिक लोक डिजिटल साक्षर झाले असून, युपीआय (UPI) व्यवहारांमध्ये १२ हजार पटींची वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत भारत देश आज जगात आघाडीवर आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून उत्पादन क्षेत्राला मोठे पाठबळ मिळाले असून, भारत देश आता सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र बनला आहे. मोबाईल निर्मितीमध्येही भारत दुसऱ्या स्थानी आला आहे. संरक्षण उत्पादनांमध्ये देशाने मोठी प्रगती केली असून, या उत्पादनांचा निर्यातदार म्हणून आता भारत देशाची ओळख झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही संरक्षण उत्पादनाचा कार्यान्वित झालेला प्रकल्प हा स्टार्टअपला मिळालेल्या पाठबळाचे यश असल्याचे सांगून, देशातील स्टार्टअपची संख्या आता २.२३ लाखांच्या पुढे गेली आहे.

वारसा आणि विकास यांची सांगड घालून मागील १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १,७०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैनचे महाकाल लोक यांद्वारे केंद्र सरकारने लाखो भारतीयांच्या श्रद्धेचा सन्मान केला असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्याची शक्यता असून पर्जन्यमानात घट होण्याची शक्यताही वर्तविली आहे

अहील्यानगर 


       भारतीय हवामान विभागाने व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार यावर्षी एल निनो परिस्थितीचा प्रभाव राहण्‍याची शक्‍यता असून, पर्जन्‍यमानात घट होण्‍याची शक्‍यताही वर्तविली आहे. यासर्व पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्‍त्रोतांमध्‍ये उपलब्‍ध  असलेला पाणीसाठा संरक्षित करुन, सुरु असलेली पाण्‍याची आवर्तन तात्‍काळ बंद करण्‍याचे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डौले यांनी सर्व विभागीय आयुक्‍त आणि जिल्‍हाधिका-यांना दिले आहेत.

      या संदर्भात शासनाने काढलेल्‍या परिपत्रकात सर्व जिल्‍हाधिकारी व संबधित जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यांनी आपल्‍या कार्यक्षेत्रातील धरणं व जलाशयांमधील उपलब्‍ध पाणीसाठ्याचा तातडीने आढावा घ्‍यावा. अत्‍यावश्‍यक परिस्थिती वगळता पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी राखीव ठेवण्‍यात आलेल्‍या पाण्‍याचा वापर इतर कोणत्‍याही कारणांसाठी करु नये. दिनांक ३१ ऑगस्‍ट पर्यंत सर्व शहरी व ग्रामीण भागात अखंडीत पिण्‍याच्‍या पाण्‍याचा पुरवठा होईल यासाठी धरणांमध्‍ये आरक्षित करण्‍यात आलेला पाणीसाठा जपून वापरण्‍याबाबतही जिल्‍हास्‍तरावर कृती आराखडा तयार करण्‍याच्‍या सुचना प्रधान सचिवांनी दिल्‍या आहेत.

      स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, पाणी पुरवठा विभाग यांच्‍यात प्रभावी समन्‍वय ठेवून परिस्थितीचा नियमित आढावा घेण्‍याबाबत तसेच धरणं, कालवे, नद्या, तलाव व इतर जलस्‍त्रोतांमधून होणारा अनाधिकृत व बेकायदेशिर पाणी उपसा तात्‍काळ थांबविण्‍यासाठी विशेष मोहीम राबविण्‍याचे निर्देशही शासनाने काढलेल्‍या परिपत्रात देण्‍यात आले आहेत. यासाठी महसूल, पोलिस व जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यांच्‍या संयुक्‍त पथकांमार्फत अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप व इतर सामुग्रींची तपासणी करण्‍याकरीता गस्‍त आयोजित करावी व वेळप्रसंगी दिनांक १२ डिसेंबर २०१८ रोजी काढण्‍यात आलेल्‍या शासन निर्णयाप्रमाणे कारवाईच्‍या कडक सुचनाही शासनाने परिपत्राकत दिल्‍या आहेत.

      पाणीसाठा, पिण्‍याच्‍या पाण्‍याची उपलब्‍धता, सिंचन आवर्तने स्‍थगित करण्‍याबाबतची कार्यवाही व बेकायदेशिर पाणी उपसा रोखण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या कार्यवाहीचा सविस्‍तर अहवाल प्रत्‍येक आठवड्याला सादर करण्‍याच्‍या सुचना विभागीय आयुक्त, सर्व पाटबंधारे विकास महामंडळ, जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या आधिका-यांना देण्‍यात आल्‍या आहेत.

शुक्रवार, १२ जून, २०२६

भिकाजी गंगाधर म्हस्के यांचे निधन

प्रवरानगर कोंडीराम नेहे 
राहाता तालुक्यातील
बाभळेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते व बाभळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मा. सदस्य भिकाजी गंगाधर म्हस्के  (८५)यांचे नुकतेच   हृदयविकाराने झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी. तीन मुले.दोन मुली .तीन बंधू सुना नातू नातवंडे भाऊजायी .जावई असा मोठा परिवार आहे. 
रामनाथ .सिताराम . राहुल म्हस्के. शोभा निर्मळ.जया गारूळे यांचे ते वडील होत तसेच लहानु ज्ञानदेव नामदेव म्हस्के यांचे ते बंधू  व  गणेश म्हस्के यांचे चुलते होत 
होत त्यांच्यावर बाभळेश्वर येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक. राजकीय सांस्कृतिक 
अध्यात्मिक क्षेत्राबरोबर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता‌.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले

भोंदू अशोक खरात खटल्यात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी ॲड. परिमल फळे यांची नेमणूक

भोंदू अशोक खरात खटल्यात सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी ॲड. परिमल फळे यांची नेमणूक
 
                
अहिल्यानगर -
देशभर गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात संदर्भातील न्यायालयीन खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी येथील नामवंत फौजदारी वकील ॲड. परिमल फळे यांची सरकारने सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे. 

या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे. त्यांना साह्य करण्यासाठी ॲड. परिमल फळे यांची नियुक्ती झाली आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांची खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील व ॲड. परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याबाबतचे नोटिफिकेशन राज्य सरकारच्या विधी व न्याय खात्याने गुरुवारी ( ता. ११ जून २०२६) रोजी जारी केले. राज्य सरकारच्या वतीने विधी व न्याय खात्याचे कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांनी सदरचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे. 

राज्यभर गाजलेले राहुरी येथील आढाव वकील दामप्त्य हत्या प्रकरण तसेच नेवासे येथील ॲड. रियाज पठाण हत्या प्रकरण या दोन्ही गाजलेल्या खटल्यात सरकारतर्फे ॲड. उज्ज्वल निकम व ॲड. परिमल फळे ही जोडीच काम पहात आहे. आता बहुचर्चित खरात प्रकरणातही याच जोडीची नेमणूक सरकारने केली आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे खून प्रकरणासह गाजलेल्या विविध खटल्यात ॲड. परिमल फळे हे आरोपींतर्फे बाजू मांडीत आहेत.

गुरुवार, ११ जून, २०२६

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान



श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या श्री साईनाथ रुग्णालयातील नेत्रपेढीच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व नेत्रदाता कुटुंबीयांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) होते. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. अजित पाटील, डॉ. सौदामिनी निघुते, डॉ. अनघा विखे, अधिसेविका नजमा सय्यद यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, नेत्रदात्यांचे नातेवाईक व कुटुंबीय उपस्थित होते. आय बँक मॅनेजर डॉ. अशोक गावित्रे यांनी नेत्रदानाचे महत्त्व व जनजागृतीची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गेल्या वर्षभरात नेत्रदान केलेल्या २६ नेत्रदात्यांच्या कुटुंबीयांचा श्रीसाईंची शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात गोरक्ष गाडीलकर यांनी नेत्रदान हे श्रेष्ठ दान असून प्रत्येक नागरिकाने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच नेत्रदानासाठी पुढाकार घेणाऱ्या कुटुंबीयांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले.

बुधवार, १० जून, २०२६

विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिर्डी मतदारसंघ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी

विखे पाटील यांच्या नेतृत्वामुळे शिर्डी मतदारसंघ राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी

मराठा आरक्षण, औद्योगिक वसाहत आणि जलयात्रेमुळे विकासाचा वेग वाढला : अभय शेळके

शिर्डी :-
 राज्यातील विविध राजकीय, सामाजिक आणि विकासात्मक घडामोडींमध्ये प्रभावी नेतृत्व करत पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाला राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांच्यासोबत यशस्वी चर्चा, राहुरी विधानसभा व विधानपरिषद निवडणुकीतील महत्वाची भूमिका, तसेच शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभा राहिलेला देशातील खासगी क्षेत्रातील पहिला तोफगोळे निर्मिती प्रकल्प यामुळे विखे पाटील यांचे नेतृत्व अधिक ठळकपणे समोर आले असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी केले.

पत्रकारांशी बोलताना शेळके म्हणाले की, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यासोबत विखे पाटील यांनी अनेकवेळा सकारात्मक चर्चा करत तोडगा काढण्याची भूमिका निभावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सुविधा व सवलती लागू करण्याचा घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुरी विधानसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतानाही विखे पाटील यांनी प्रभावी समन्वय साधत मार्ग काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. त्यामुळे राहुरी मतदारसंघात भाजपचे एक नव्हे तर दोन आमदार निवडून आले. विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे आणि आमदार अक्षय कर्डिले यांनीही सार्वजनिकरित्या विखे पाटील यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असल्याचे शेळके म्हणाले.

शिर्डी औद्योगिक वसाहतीसाठी शेती महामंडळाची तब्बल ५०० एकर जमीन हस्तांतरित करून विकासाचा नवा अध्याय सुरू करण्यात आला. या ठिकाणी देशातील खासगी क्षेत्रातील पहिला तोफगोळे निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. त्यामुळे शिर्डी मतदारसंघ राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला.

याच औद्योगिक वसाहतीत टाटा उद्योगसमूहाने कौशल्य विकास प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. आगामी काळात या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून तब्बल दहा हजार युवकांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला.

अभय शेळके (उपनगराध्यक्ष, शिर्डी) म्हणाले :

“जलसंपदा विभागाला लोकाभिमुख करण्याचे काम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. गोदावरी कालवे व वितरिकांच्या नूतनीकरणाची कामे हाती घेतली. गोदा ते नर्मदा जलयात्रा यशस्वी करत पश्चिमेचे पाणी पूर्वेला आणण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला त्यांनी गती दिली आहे.”

सोमवार, ८ जून, २०२६

विखे फॅक्टर मुळे अवघ्या चार दिवसांत आमदारकी! आ. प्राजक्त तनपुरेंकडून प्रांजळ कबुली

विखे फॅक्टर मुळे अवघ्या चार दिवसांत आमदारकी! आ. प्राजक्त तनपुरेंकडून प्रांजळ कबुली

आम्ही दुरून ऐकून होतो, आता अनुभवले"; ४ दिवसांत आमदार झाल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी मानले विखे पाटलांचे आभार

राहुरी : 
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार प्राजक्त तनपुरे यांचा नागरी सत्कार सोहळा उत्साहात राहुरी येथे पार पडला. या कार्यक्रमात बोलताना तनपुरे यांनी आपल्या विधानपरिषदेपर्यंतच्या प्रवासामागे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे योगदान असल्याची जाहीर कबुली दिली.

यावेळी बोलताना आ.प्राजक्त तनपुरे म्हणाले "मी शनिवारी पक्षात प्रवेश केला, रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरुवारी आमदार झालो. या संपूर्ण प्रक्रियेत आदरणीय विखे पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे," असे वक्तव्य करत त्यांनी विखे पाटील यांच्या झटपट आणि परिणामकारक कार्यशैलीचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला.

तनपुरे यांनी सांगितले की, उमेदवारी मिळण्यापासून अर्ज भरण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विखे पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. त्यांनी दिलेल्या संधीचे सार्थक करण्यासाठी विधान परिषदेच्या सभागृहात राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. तनपुरे यांच्या निवडीमुळे राहुरी तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मुळा धरणातील गाळ काढून अतिरिक्त जलसाठा निर्माण करणे, साकळाई योजनेच्या कामाला गती देणे आणि वांबोरी चारी टप्पा क्रमांक २ चे अपूर्ण काम पूर्ण करणे यावर भर दिला जाईल, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

तसेच कृषी विद्यापीठाच्या उपलब्ध जमिनीचा औद्योगिक विकासासाठी वापर करून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.पाणी, शेती, उद्योग आणि रोजगार या चार प्रमुख क्षेत्रांमध्ये समन्वय साधत अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

रविवार, ७ जून, २०२६

श्री साईबाबा हॉस्पिटलला १२.८० लाख रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देणगी

श्री साईबाबा हॉस्पिटलला १२.८० लाख रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देणगी

श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलला हैदराबाद येथील साईभक्त साईदीप अन्नदाता यांनी सुमारे १२ लाख ८० हजार रुपये किमतीची सेंट्रल व्हॅक्यूम पंप (Central Vacuum Pump) व एअर ड्रायर (Air Dryer) ही अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देणगी स्वरूपात प्रदान केली.
रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग (ICU) तसेच विविध वॉर्डमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली ही उपकरणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सेंट्रल व्हॅक्यूम पंपद्वारे सक्शनसाठी आवश्यक व्हॅक्यूम निर्माण केला जातो, तर एअर ड्रायरद्वारे कॉम्प्रेस्ड एअरमधील ओलावा काढून स्वच्छ व कोरडी हवा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांची कार्यक्षमता वाढून रुग्णसेवा अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्‍या हस्‍ते साईदीप अन्नदाता यांचे रुग्णसेवेसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, आधीसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, बायोमेडिकल इंजिनियर श्रद्धा कोते, प्रणाली कांबळे, कार्तिक पांगारकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शनिवार, ६ जून, २०२६

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री विखे पाटील यांचे आभार

मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री विखे पाटील यांचे आभार

मराठा समाजासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर मनोजदादा जरांगे-पाटील यांचे मोठे वक्तव्य


लोणी : 
मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच आमदार प्रसाद लाड यांचे मनापासून आभार मानले आहेत.

जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या विविध मागण्यांची अंमलबजावणी करून समाजाला न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाजालाही विविध शासकीय सवलती, सारथी संस्थेअंतर्गत योजना तसेच महामंडळाच्या काही बंद पडलेल्या योजना आणि अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

आंदोलनादरम्यान बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या प्रश्नालाही सरकारने गांभीर्याने हाताळल्याचे सांगत, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले.

"मराठा समाजाच्या मागण्यांना प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत नेण्यासाठी सरकारच्या वतीने विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, विखे पाटील, प्रसाद लाड आणि संपूर्ण सरकारचे मी मनापासून आभार मानतो," असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

शुक्रवार, ५ जून, २०२६

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; जिल्ह्यात भाजपची सह महायुतीची ताकद पुन्हा अधोरेखित सुजय संग्राम जय वीरूच्या जोडीने केली कमाल

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध; जिल्ह्यात भाजपची सह महायुतीची ताकद पुन्हा अधोरेखित
 सुजय संग्राम जय वीरूच्या जोडीने केली कमाल

अहिल्यानगर 
  विधानपरिषद निवडणुक जागा बिनविरोध करून दाखवत भारतीय जनता पक्षा सह महायुतीने राजकीय पातळीवर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले असून, या घडामोडीमुळे जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणि राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे सुरुवातीला सांगितले जात होते. मात्र काँग्रेसकडून कोणत्याही अधिकृत उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून राणी लंके यांचे नाव चर्चेत आले होते. त्या अर्ज दाखल करतील, अशी चर्चा होती. मात्र अखेर महाविकास आघाडीकडून एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही.

अर्ज मागे घेण्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत भाजपचे प्राजक्त तनपुरे, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दत्तात्रय पानसरे, तसेच कमलेश गांधी आणि मच्छिंद्र धुमाळ यांचे अर्ज शिल्लक होते. गुरुवारी दुपारपर्यंत मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी यांनी आपले अर्ज मागे घेतले.

दरम्यान, काही काळासाठी करण ससाणे हे संपर्काबाहेर गेल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र त्यांनीही अचानक समोर येत आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधातील एकमेव अर्जदार राहिलेले दत्तात्रय पानसरे यांची मनधरणी करण्यात महायुतीला यश आले. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीच्या अखेरच्या काही मिनिटांत त्यांनीही माघार घेतल्याने प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. विशेष म्हणजे, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे हे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील १८ वे आमदार ठरले आहेत.

संग्राम - सुजय जय वीरूच्या जोडीने केली कमाल
विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय घडामोडीत डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या समन्वयाचीही मोठी चर्चा रंगली. उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात दत्तात्रेय पानसरे यांनी अर्ज बळजबरीने किंवा खोट्या सहीने मागे घेतल्याचा आरोप केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर आमदार संग्राम जगताप आणि दत्तात्रेय पानसरे यांच्यात बंद दाराआड सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर दोघेही एकाच वाहनातून बाहेर पडल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. अखेर पानसरे यांची समजूत काढण्यात यश आले आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत माघारीची भूमिका कायम ठेवली. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण प्रक्रियेत डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच शेवटच्या क्षणी निर्माण झालेला पेच सुटल्याची चर्चा सुरू असून, राजकीय वर्तुळात या जोडीची तुलना "जय-वीरू" जोडीशी केली जात आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या भूमिकेची चर्चा
या बिनविरोध विजयामागे गेल्या चार दिवसांपासून डॉ. सुजय विखे पाटील यांनी घेतलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी प्रभावीपणे पार पाडल्याचे मानले जात आहे.यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही प्राजक्त तनपुरे यांना निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करत अक्षय कर्डिले यांचा मार्ग मोकळा करण्यात डॉ. सुजय विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा झाली होती. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणूक बिनविरोध घडवून आणण्यातही त्यांचे योगदान निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या संघटनशक्तीचे प्रदर्शन
अहिल्यानगर महानगरपालिका आणि जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची वाढती संघटनात्मक ताकद या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. सर्वपक्षीय समन्वय, संवादकौशल्य आणि संघटन व्यवस्थापनाचेही दर्शन घडविल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांकडून व्यक्त होत आहे. या घडामोडींमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपचे राजकीय वर्चस्व आणखी बळकट झाल्याची चर्चा सुरू असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विजयाकडे महत्त्वपूर्ण राजकीय संदेश म्हणून पाहिले जात आहे.

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...