सोमवार, १५ जून, २०२६

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल गायकवाड यांच्या कडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनिल गायकवाड यांच्या कडून  विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

अहिल्यानगर : 
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोकळे वस्ती येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.
साहेबांच्या आदेशा नुसार  पुष्पगुच्छ  शाल हार याचा खर्च न करता  शालेय विद्यार्थ्यांना  शालेय वस्ती द्या त्या पद्धतीने

भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ गायकवाड यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिली तसेच इतर शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी अनिलभाऊ गायकवाड म्हणाले की, “मा.  विखे पाटील साहेब हे जनतेच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले लोकनेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू भेट देऊन  उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे हीच आमची भावना आहे.”

मा. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व शिक्षकांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही शालेय साहित्य मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
 या वेळी  जनसेवा परिवर्तन मंडळाचे संदीप लावरे पाटील साईबाबा दूध संकलन केंद्राचे चेअरमन शरद मुरादे  जि. प .प्रा. शाळेचे व्यवस्थापन समितीचे  उपाध्यक्ष कैलास मुरादे यांनी याचे मनोगत व्यक्त केले या वेळी  संदेश गायकवाड राजेंद्र मुरादे ऋषी गायकवाड रामभाऊ मुरादे अक्षय गायकवाड सागर मुरादे कैलास मुरादे  व  तसेच शाळेच मुख्याध्यापक संदीप वाघमारे सर  दिनेश राठोड सर सदगीर सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमारे सर यांनी केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा; नेवासा न्यायालयाचा निकाल

महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा; नेवासा न्यायालयाचा निकाल  नेवासा (तालुका प्रतिनिध...