सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

अ. भा. मराठी शेतकरी ऑनलाईन साहित्य संमेलनाच्या समारोपीय अध्यक्षपदी राजेंद्र फंड यांची निवड:

अ. भा. मराठी शेतकरी ऑनलाईन साहित्य संमेलनाच्या समारोपीय अध्यक्षपदी राजेंद्र फंड यांची निवड:

           शेतीसाहित्याशी निगडित बहुचर्चित असलेले अखिल भारतीय मराठी  साहित्य संमेलन दरवर्षी  खुले आणि ऑनलाईन पद्धतीने साजरे होते. या साहित्य संमेलनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होते. यंदाचे हे 15 वे या अखिल भारतीय  मराठी शेतकरी ऑनलाईन साहित्य संमेलन दिनांक 3 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर रोजी होणार असून या संमेलनाच्या निमित्ताने दररोज रात्री 9  वाजता कवी संमेलन, गझल मुशायरा असे विविध शेती साहित्याशी निगडीत  साहित्यिक उपक्रम घेण्यात येणार आहे. या    संमेलनात समारोपीय सत्राचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक राजेंद्र फंड यांच्या निवडीची घोषणा या संमेलनाचे आयोजक तथा शेतकरी संघटनेचे नेते साही. गंगाधर मुटे यांनी केली आहे.
              या संमेलनाचा उद्देश हा  शेतकऱ्यांच्या मूलभूत  प्रश्नावर चर्चा , नवीन नवीन संशोधन, त्यांचे शेतकऱ्यांना फायदे तोटे  या शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण साहित्यिकांना व्हावी तसेच अधिकाधिक खरे शेती साहित्य तळागाळातील साहित्यिकांकडून निर्माण व्हावे म्हणून तसेच  आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे युगात्मा शरद जोशी यांचे साहित्य सर्व साहित्यिक , साहित्यरसिक व शेतकऱ्यांना माहीत व्हावे म्हणून विदर्भातील छोटी आर्वी येथील शेतकरी संघटनेचे नेते साही. गंगाधरजी मुटे यांनी मान. शरद जोशी यांच्याच  हस्तेच पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्यानंतर कवी विठ्ठल वाघ, रावसाहेब बोराडे, मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर,  सरोजताई काशीकर व इतर मान्यवरांनी  महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात  आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात हजेरी लावली आहे. कोरोना कालावधीमध्ये सुद्धा ऑनलाइन साहित्य संमेलन घेण्याची परंपरा चालू ठेवण्यात आली आहे. आजच्या 15 या अखिल भारतीय मराठी शेतकरी ऑनलाईन साहित्य संमेलनापर्यंत हे संमेलन महाराष्ट्रातील सर्वात जास्त शेती प्रबोधन करणारे महत्वाचे साहित्य संमेलन ओळखले जात आहे. या संमेलनाची महत्वाची देणगी म्हणजे  साहित्याला आणखी  बळकटी देणारे  शेतकरी गझल  मुशायरा व विश्वस्तरीय लेखनस्पर्धा हे  साहित्यिक उपक्रम होय. या ऑनलाईन साहित्य संमेलनास उपस्थित राहण्यासाठी Live https://www.youtube.com/@chawdi 
              आवाहन आयोजक गंगाधर मुटे यांनी केले आहे.

रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

एकरूखे येथील शर्वरी डोखे चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राहाता तालुक्यात दुसरी

 एकरूखे येथील शर्वरी डोखे चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राहाता तालुक्यात दुसरी 
 


एकरूखे 

राहता तालुक्यातील एकरूखे जिल्हा परिषद शाळेतील शर्वरी अविनाश डोखे या विद्यार्थीनीने इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २७० गुण मिळवत राहाता तालुक्यात दुसरा तर अहिल्यानगर जिल्हा ग्रामीण भागात नववा क्रमांक पटकवला आहे या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक राधाकिसन दळवी तसेच वर्ग शिक्षिका अलका गाडेकर यांचे तीला विशेष मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल एकरूखे ग्रामपंचायतचे सरपंच जितेंद्र गाढवे कृषीउत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र भवर राहाता तालुका प्रेस क्लबचे उपाध्यक्ष दिलीप खरात तसेच ग्रामीण पत्रकार संघांचे जिल्हा उपाध्यक्ष किरण शिंदे राहाता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जोरे सर्वमतचे जेष्ठ पत्रकार चंद्रकांत आग्रे पत्रकार दिनेश सपिके पत्रकार प्रवीण ताटू चंद्रकांत अमोलिक धनंजय सोनवणे राजेंद्र जाधव वसंत थोरात साहेबराव यादव बाळासाहेब पवार ग्रामविकास अधिकारी संजय बारसे रजनीकांत शिंदे तसेच एकरूखे ग्रामस्थांनी अभिनंदन केले

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

मनातील सकारात्मक विचारांची पेरणी; साईचरित्रातून ‘मनपरिवर्तन ते समाजपरिवर्तन’चा संदेश मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशन कडून...

मनातील सकारात्मक विचारांची पेरणी; साईचरित्रातून ‘मनपरिवर्तन ते समाजपरिवर्तन’चा संदेश  मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशन कडून...
एकरुखेत ‘साई युग परिवर्तन’ अभियानाचा अभिनव उपक्रम; भाविकांना साईचरित्र ग्रंथासह आवळा रोपांची भेट

राहाता : मन बदलले की विचार बदलतात, विचार बदलले की वर्तन बदलते आणि वर्तन बदलले की जीवनाला नवी दिशा मिळते, या मानसशास्त्रीय संकल्पनेला अध्यात्म, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाची जोड देत  मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशन राहाता यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘साई युग परिवर्तन अभियान’ अंतर्गत एकरुखे येथे प्रेरणादायी आणि समाजप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात आला.

एकरुखे येथे आयोजित करण्यात आलेल्या साई चरित्र पारायणात सहभागी सर्व बंधू-भगिनींना फाउंडेशनच्या वतीने साई चरित्र ग्रंथ, स्तवन मंजिरी, आरती पुस्तिका तसेच आवळा वृक्षाचे रोप भेट देण्यात आले. श्रद्धा, सकारात्मक मानसिकता, संस्कार आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर समन्वय साधणाऱ्या या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. साईचरित्राचे वाचन करताना त्यातील विचार आचरणात आणावेत आणि त्याचबरोबर निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, व्यक्तीच्या मनात वारंवार सकारात्मक विचारांचे चिंतन झाल्यास तिच्या विचारसरणीवर, भावनिक स्थितीवर आणि वर्तनावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होतो. मनात निर्माण होणारे विचारच पुढे कृतीचे रूप घेतात आणि त्या कृतीतून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व तसेच सामाजिक वातावरण घडत जाते. साईचरित्रातील श्रद्धा, सबुरी, यू, संयम, करुणा, समता आणि सकारात्मकतेचे विचार दैनंदिन जीवनात रुजविणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा संदेश आहे.

धार्मिक ग्रंथ केवळ वाचनापुरता किंवा पारायणापुरता मर्यादित न राहता तो मनाची सकारात्मक जडणघडण करणारा, आत्मविश्वास वाढविणारा आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारा स्रोत ठरावा, अशी भूमिका अभियानातून मांडण्यात आली. साईचरित्रातील शिकवण आचरणात आणल्यास व्यक्तीच्या मनातील नकारात्मकता, भीती, अस्वस्थता आणि निराशा कमी होऊन त्याजागी आशावाद, संयम आणि सेवाभाव निर्माण होऊ शकतो, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमाचा आणखी एक विशेष पैलू म्हणजे, भाविकांना साईचरित्र ग्रंथ देतानाच आवळा वृक्षाचे रोप भेट देऊन ‘मनात विचारांची आणि मातीत वृक्षांची पेरणी’ करण्याचा सुंदर संदेश देण्यात आला. मनात चांगले विचार रुजविणे आणि मातीत हिरवाई निर्माण करणे, या दोन्ही गोष्टी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक आहेत. आवळा वृक्षाचे औषधी, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, या रोपांचे संगोपन करण्याचे आवाहनही भाविकांना करण्यात आले.

अध्यात्मिक विचारांमधून अंतर्मनाची शुद्धी, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सकारात्मक विचारांची निर्मिती आणि वृक्षारोपणातून पर्यावरणाचे संरक्षण, असा त्रिवेणी संगम या उपक्रमातून साधण्यात आला. प्रत्येक कुटुंबाने एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, तसेच घराघरांत साईचरित्रातील सकारात्मक विचारांची चर्चा व्हावी, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. अशा छोट्या-छोट्या उपक्रमांतून व्यक्ती, कुटुंब आणि समाज या तिन्ही स्तरांवर परिवर्तन घडवून आणता येते, असा संदेशही देण्यात आला.
या उपक्रमासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. येलम, श्री. किरण वाणी, डॉ. संकेत येलम, पल्लवी नरारे, श्री. नेमीचंदजी लोढा, श्री. पोपट गायकवाड, गीता येलम, श्री. पृथ्वीराज दिवटे, श्री. तुषार पगार तसेच इतर सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. नियोजन, भाविकांचे स्वागत, ग्रंथ व पुस्तिकांचे वितरण, रोपांची व्यवस्था आणि जनजागृती यासाठी कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. यावेळी पद्मश्री ग्रीन्स फाउंडेशनचे सदस्य श्री. धनंजय सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.

उपस्थित भाविकांनी या उपक्रमाचे कौतुक करत, धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांची जोड मिळाल्यास त्याचा प्रभाव अधिक व्यापक होतो, असे मत व्यक्त केले. साईचरित्राचा संदेश केवळ मंदिर किंवा पारायणस्थळापुरता मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या आचरणातून समाजात पोहोचावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सकारात्मक विचारांची पेरणी, संस्कारांची जोपासना, पर्यावरणाची काळजी आणि कृतीतून परिवर्तन या चतुःसूत्रीच्या माध्यमातून ‘साई युग परिवर्तन अभियान’ने एकरुखे येथे मनपरिवर्तनाच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल टाकले. व्यक्तीच्या मनातu घडणारे परिवर्तन पुढे कुटुंबात, कुटुंबातून समाजात आणि समाजातून राष्ट्राच्या प्रगतीत प्रतिबिंबित होते, या विश्वासाला या उपक्रमाने बळ दिले.

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी.

महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड नाही; डॉ. सुजय विखे पाटील यांची ठाम भूमिका
या

राहाता नगर परिषदेत रक्षाबंधन सोहळा उत्साहात; महिला कर्मचाऱ्यांनी बांधली राखी.

राहाता, 
 महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. महिलांविरोधात गैरप्रकार करणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याच्या चौकटीत कठोरपणे सामोरे जाऊ, अशी ठाम भूमिका माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

राहाता नगर परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन सोहळ्यात डॉ. सुजय विखे पाटील सहभागी झाले. यावेळी नगरसेविका, नगर परिषदेमधील महिला अधिकारी कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच शहरातील भगिनींनी डॉ. विखे पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

या वेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना डॉ. विखे पाटील यांनी महिलांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा उल्लेख केला. नगरसेविकेपासून रस्त्यावर स्वच्छता करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांपर्यंत प्रत्येक भगिनीला माझ्यात तिचा भाऊ किंवा कुटुंबातील व्यक्ती दिसते, ही माझ्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. सर्वसामान्य महिलांच्या मनात ‘आपण हक्काने दादांकडे जाऊ शकतो’ हा विश्वास निर्माण होणे, हीच माझ्या कार्याची खरी उपलब्धी आहे,असे ते म्हणाले.

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, महिलांना सुरक्षित वातावरण मिळणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे. महिलांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पाठीशी घातले जाणार नाही. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, अतिक्रमण हटविणे अथवा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईबाबत काहींकडून टीका करण्यात आली. मात्र, महिलांच्या सुरक्षेचा आणि सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, तर दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. विखे पाटील यांना राखी बांधली. यावेळी महिलांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. त्यामुळे राहाता नगर परिषदेत पार पडलेल्या या सोहळ्याला भाऊ-बहिणीच्या नात्याचा जिव्हाळा लाभला. महिलांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या सन्मानासाठी आणि अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२६

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 126 व्या जयंतीदिनानिमित्त राज्यस्तरीय कला गौरव आणि प्रबोधन पुरस्काराचे वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले


लोणी, 

भविष्यकाळ अंधकारमय होण्यापूर्वीच मराठी शाळांच्या सुधारणेचा आग्रह धरावा लागेल. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालयं ही मराठीची खरी वस्त्र आहेत. खरा महाराष्ट्र कळायचा असेल तर, मराठीसाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल, असा आशावाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केला.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंती दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव आणि प्रबोधन पुरस्कारांचे वितरण राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ९९ व्‍या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्‍यक्ष विश्वास पाटील हे होते. या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. आशुतोष काळे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. संग्राम जगताप, आ. अमोल खताळ, आ. प्राजक्त तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे-पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील, सौ. शालिनीताई विखे-पाटील, ध्रुव विखे-पाटील, अविनाश आदिक, सौ. अनुराधा नागवडे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, भाजपाचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यंदाच्या वर्षी पुरस्कार निवड समितीने 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार' उत्तम कांबळे (नाशिक) यांना जाहीर केला आहे. याशिवाय 'राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार' संहिता राजन (पुणे), 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार' सुरेंद्र दरेकर (पुणे), 'डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार' तमाशा कलेतील सेवेबद्दल मालती इनामदार (नारायणगाव), 'डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार' सचिन शिंदे (नाशिक), 'डॉ. विखे-पाटील राज्यस्तरीय समाजप्रबोधन पुरस्कार' मराठी अभ्यास परिषद (पुणे) या संस्थेस, 'पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार' निवृत्ती जोरी (संगमनेर) आणि 'डॉ. विखे-पाटील प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार' संजय गोर्डे (संगमनेर) यांना सन्‍मानित करण्‍यात आले. पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी पुरस्‍कारची घोषणा केली.

आपल्या भाषणात विश्वास पाटील यांनी विखे-पाटील साहित्य पुरस्काराचा गौरवपूर्ण उल्लेख करून सांगितले की, सहकाराच्या भूमीतील मातीने हा परिसर ऐतिहासिक केला आहे. तसाही या जिल्ह्याचा इतिहास महाभारतापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिकच आहे. शिवाजी महाराजांचे साडेतीन वर्षांपर्यंतचे बालपण हे याच जिल्ह्यामध्ये गेले. नाशिकच्या गोदेपासून ते पुण्याच्या भीमेच्या तिरापर्यंतचा अभिमान हा संपूर्ण राज्याला आहे. येथील मातीशी खूप जुनं नातं आहे. साहित्यिकांचा हा सन्मान सोहळा गुणग्राहकतेचा सोहळा असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्राला समृद्ध आणि सुजलाम करायचे असेल तर, मायमराठीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल. यासाठी मराठी शाळा महत्त्वाच्या आहेत. भाषा शिकणे म्हणजे तंत्र आहे, कारण भारतामधील ९८ शास्त्रज्ञ हे मराठीतून शिकले आहेत. इंग्रजी शाळा या सोन्याच्या पिंजऱ्यात वाढलेले पोपट आहेत; मात्र जिल्हा परिषदेच्या शाळा या गरुडासारखी झेप घेऊन उंच भरारी घेत आहेत. कधीतरी या मराठी शाळांना भेट द्या, कारण ही आपली खरी मंदिरे आहेत. मराठी शाळा आणि पुस्तके पुरवणारी ग्रंथालये ही मायमराठीची खरी वस्त्रे आहेत. मराठी शाळा अजूनही सुधारू शकतात, मात्र यासाठी धाडसाने काहीतरी करावे लागेल. तुमच्या खांद्याववर झेंडा कोणताही असू द्या, दांडा मात्र मराठीचाच ठेवा, असे आग्रहपूर्ण आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या भाषणात म्हणाल्या की, सहकार पंढरीचे दर्शन घेण्याचे भाग्य आज मला मिळाले. स्व. आप्पासाहेब पवार यांचा उल्लेख करून, येथील वटवृक्षाशी आमचे भावनिक, जुने आणि जिव्हाळ्याचे नाते आहे, असे त्यांनी सांगितले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील आणि डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या कार्याची प्रेरणा महाराष्ट्राला सदैव मिळत आहे. विखे-पाटील परिवाराची चौथी पिढी सक्रियपणे यासाठी काम करते, ही आनंदाची बाब आहे. आयुष्यभर साहित्य क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या लेखक आणि कलाकारांचा पुरस्काराने होत असलेल्या सन्मानाने पुरस्काराची प्रतिष्ठासुद्धा उंचावली आहे. लेखकांमधील संवेदनशील शक्ती आणि माणुसकीची जाणीव साहित्य समृद्ध करत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित झालेले ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, या साहित्य पुरस्कारामुळे साहित्यिकांना बळ मिळाले आहे. समाज अक्षरांच्या मागे उभा राहतो, हे या पुरस्काराने दाखवून दिले आहे. डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्याकडून काय शिकलो असेल तर त्यांच्याकडून मी स्नेह शिकलो. राजकारणामध्ये सर्वांना मास्तर म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. या भागातील राजकारण हे नैतिकतेच्या आधारावर चांगल्या पद्धतीने सुरू आहे. जे समाजासाठी लिहितात, बोलतात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे अभिवचन या पुरस्कारामध्ये आहे. उद्याचा समाज गतिरोधक वाटू नये म्हणून मार्गदर्शनाचा कंदील निर्माण करावा लागेल, यासाठी पद्मश्रींवरील चित्रपट काढण्याची सूचना त्यांनी आपल्या भाषणातून केली.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मंत्री विखे-पाटील यांनी प्रवरा परिवाराच्या ३६ वर्षांच्या साहित्य पुरस्कारांच्या वाटचालीचा आढावा घेऊन, या पुरस्काराने सन्मानित झालेल्या साहित्यिकांना साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, हा खरा आमचा अभिमान आहे, असे सांगितले. यंदाच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचाही गौरव विखे-पाटील पुरस्काराने झाला, ही आमच्यासाठी आनंदाची घटना आहे. प्रवराकाठी मराठी सारस्वतांचा होणारा सन्मान हा मराठी साहित्य, कला आणि संस्कृतीची अभिरुची जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांची उपस्थिती ही दोन्ही परिवारांचा ऋणानुबंध अधिक दृढ करणारी आहे. स्व. अजितदादांशी असलेले नाते आपल्या माध्यमातून भविष्यातही कायम राहील; आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका ही आमची सदैव असेल, असे मंत्री विखे-पाटील म्हणाले.

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२६

श्री साई पारायण तीर्थयात्रा २०२६; काशी-अयोध्या, नेपाळ पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी

श्री साई पारायण तीर्थयात्रा २०२६; काशी-अयोध्या, नेपाळ पशुपतीनाथ दर्शनाची सुवर्णसंधी

शिर्डी : 

‘ॐ साई राम’च्या जयघोषात साईभक्तांना काशी-अयोध्या, नेपाळ पशुपतीनाथ व मनोकामना मंदिर दर्शनाची अनोखी संधी उपलब्ध झाली आहे. मार्गदर्शक मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. खा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिर्डी ग्रामस्थांच्या आयोजनातून ‘श्री साई पारायण तीर्थयात्रा-२०२६ (संकल्पपूर्ती)’ या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेत श्री क्षेत्र काशी, अयोध्या, नेपाळमधील श्री पशुपतीनाथ, गोरखपुर आणि मनोकामना मंदिर आदी प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत तब्बल २५ हजार साईभक्तांनी १२ ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेत सहभाग घेतला असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
स्पेशल रेल्वेने होणार धार्मिक प्रवास
यात्रेसाठी शिर्डी साईनगर रेल्वे स्थानकावरून विशेष रेल्वेने प्रवास होणार आहे. वाराणसी येथे आगमनानंतर गंगा आरतीचा अनुभव, त्यानंतर अयोध्येत श्रीराम जन्मभूमी, कनक भवन, हनुमानगढी व राजदरबार आदींचे दर्शन घेण्यात येणार आहे. साईभजन संध्येनंतर रेल्वेने पुढील प्रवास केला जाणार आहे.
यानंतर नेपाळकडे प्रयाण करून काठमांडू येथे मुक्काम, श्री पशुपतीनाथ व गोरखपुर दर्शन, भजन संध्या तसेच काठमांडू दर्शनाचा कार्यक्रम आहे. पुढे मनोकामना मंदिर येथे दर्शन घेऊन नौतनवा येथे आगमन व तेथून विशेष रेल्वेने शिर्डीकडे परतीचा प्रवास होणार आहे.
१४०० साईभक्तांचे बुकिंग; आता केवळ १०० जागा शिल्लक!
या विशेष तीर्थयात्रेसाठी आतापर्यंत १,४०० साईभक्तांनी बुकिंग केले असून आता केवळ १०० जागा शिल्लक असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे इच्छुक साईभक्तांनी विलंब न करता आपले बुकिंग निश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 29 ऑगस्ट  शिर्डी साईनगर रेल्वे स्थानक वरुण दुपारी 2 वाजता निघणार आहे तेव्हा सर्वांनी सप्तपदी लॉन्स येथे जमावे 
प्रवास शुल्क :
नॉन एसी ट्रेन : ₹१४,१००
थ्री टियर एसी ट्रेन : ₹१८,१००
टू टियर एसी ट्रेन : ₹१९,१००
यात्रेच्या शुल्कामध्ये दोन वेळचे जेवण, एक वेळचा नाश्ता तसेच चार व्यक्तींमागे एका खोलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांसाठी पूर्ण भाडे आकारले जाणार आहे.
यात्रेसाठी बुकिंग करताना आधारकार्डची झेरॉक्स, मतदान कार्डची झेरॉक्स व पासपोर्ट फोटो सोबत आणावा. प्रवासादरम्यान मूळ आधारकार्ड जवळ ठेवणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
यात्रेच्या अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी संपर्क :
९९२१५२९९९९ / ९०९६९१९१९१
श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट | श्री साई निर्माण ग्रुप
मा. श्री कैलास बाप कोते | मा. श्री विजय भाऊ कोते

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६

शिवलीलामृत पारायणाच्या सांगतेदिनी मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचा ‘सेतू संगम’; रक्षाबंधनानिमित्त २६० बहिणींचा भावस्पर्शी सन्मान



शिवलीलामृत पारायणाच्या सांगतेदिनी मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचा ‘सेतू संगम’; रक्षाबंधनानिमित्त २६० बहिणींचा भावस्पर्शी सन्मान


राहाता 

 राहाता तालुक्यातील वीरभद्र मंदिर येथे सुरू असलेल्या शिवलीलामृत पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी, रक्षाबंधनाचे औचित्य साधून मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनच्या वतीने ‘सेतू संगम’ या उपक्रमांतर्गत पारायणासाठी उपस्थित असलेल्या २६० बहिणींना साड्यांचे वाटप करण्यात आले.

शिवलीलामृत पारायणाची सांगता, रक्षाबंधनाचा पवित्र सण आणि महिलांच्या सन्मानाची भावना यांचा सुंदर संगम या उपक्रमातून घडून आला. साडी ही केवळ भेट नसून, ‘तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाच्या आहात’ हा भावनिक संदेश देणारा सन्मानाचा स्पर्श असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या व्यक्तीला मिळणारी आपुलकी, सन्मान आणि स्वीकाराची भावना तिच्या मनात सकारात्मकता निर्माण करते. याच विचारातून मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनने ‘सेतू संगम’च्या माध्यमातून वस्तू देण्यापेक्षा भावना देण्याला प्राधान्य दिले. २६० बहिणींच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे आणि समाधानाचे भाव या उपक्रमाचे खरे यश ठरले.

शिवलीलामृताच्या आध्यात्मिक वातावरणात आणि रक्षाबंधनाच्या प्रेमळ भावनेतून मनाला मनाशी जोडणारा हा ‘सेतू संगम’ अनुभवता आला. सेवा, सन्मान आणि माणुसकी यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.
या उपक्रमासाठी मनोमय हिलींग हार्ट फाउंडेशनचे डॉ. येलम, श्री. किरण वाणी, डॉ. संकेत येलम, पल्लवी नरारे, श्री. नेमीचंदजी लोढा( सचिव श्री गणेश शिक्षण संस्था कोराळे), गीता येलम, डॉ. परमेश चव्हाण, सुष्मिता चव्हाण, श्री तुषार पगार, श्री पोपट गायकवाड, पृथ्वीराज दिवटे, प्रतीक्षा जाधव तसेच इतर सहकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच वीरभद्र शिवप्रतिष्ठान, राहाता यांचे श्री. बाळासाहेब सोनटक्के, श्री. निवृत्ती बनकर, श्री. भालचंद्र लोंढे आणि इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शिवलीलामृताच्या सांगतेदिनी मिळालेली ही भेट साडीची असली, तरी तिच्यामागील भावना होती—सन्मानाची, आपलेपणाची आणि माणुसकीची. म्हणूनच ‘सेतू संगम’चा हा उपक्रम २६० बहिणींच्या मनात आनंदाची आणि आपलेपणाची आठवण कायम ठेवणारा ठरला.

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२६

डॉ. सुजय विखे पाटील यांची आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतानाच पक्षाने सोपविली नवी जबाबदारी

डॉ. सुजय विखे पाटील यांची आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती

प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळतानाच पक्षाने सोपविली नवी जबाबदारी

अहिल्यानगर, :
 भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पक्षाच्या विविध प्रकोष्ठांच्या प्रभारी व सहप्रभारींच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांची आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. विखे पाटील यांच्याकडे पक्षाने आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. पक्ष संघटनेच्या कामात विविध स्तरांवर सक्रिय असलेल्या डॉ. विखे पाटील यांच्या कामाची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी आरोग्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने काम केले आहे. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतरही त्यांनी पक्ष संघटनेच्या कामात सक्रिय सहभाग कायम ठेवला आहे. राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवत पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडण्यावर त्यांनी भर दिला आहे.

आता आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदाची जबाबदारी मिळाल्याने केंद्र शासनाच्या आरोग्यविषयक योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह प्रकोष्ठाचे काम राज्यभर अधिक प्रभावीपणे राबविण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटनेच्या कामात डॉ. विखे पाटील यांच्यावर सातत्याने नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. प्रदेश उपाध्यक्षपदानंतर आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी झालेली ही नियुक्ती पक्ष नेतृत्वाचा त्यांच्यावरील विश्वास अधोरेखित करणारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे

एकादशी निमित्त हर्षदा मोईन पाटील यांची भव्य विठ्ठल-रुख्मिणी रांगोळी सेवा

एकादशी निमित्त हर्षदा मोईन पाटील यांची भव्य विठ्ठल-रुख्मिणी रांगोळी सेवा

हर्षदा नवनाथ मोईन पाटील, रा.वैजापुर  ता.वैजापूर , जि.छ.संभाजीनगर, या रांगोळी कलाकार असून कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. रांगोळी हा त्यांचा आवडता छंद असून, पोर्ट्रेट रांगोळी, विविध कलाकृती तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात त्यांना विशेष प्राविण्य आहे.

सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र धनगरवाडी, ता. राहाता येथे यावर्षी एकादशी निमित्त त्यांना भव्य विठ्ठल-रुख्मिणी रांगोळी सेवा करण्याची पवित्र संधी मिळाली आहे. एकादशी निमित्त त्यांनी १६ × १६ फूट आकाराची विठ्ठल-रुख्मिणीची भव्य कलाकृती रेखाटून त्यामध्ये आकर्षक आणि योग्य रंगसंगतीचा वापर करून रंग भरण्यास सुरुवात केली. ही भव्य रांगोळी पूर्ण करण्यासाठी तब्बल २५ तासांचा अवधी लागला.
सप्ताह च्या पहिल्या दिवशी 16 × 16 या size चे सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि नारायणगिरीजी महाराज यांची portrait rangoli काढली होती आणि आता ती रांगोळी पुसली व एकादशी निम्मित विठ्ठल रुख्मिणी ची रांगोळी सादर केली 

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही भगवंताच्या आशीर्वादाने या भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात रांगोळी सेवा करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

हर्षदा मोईन पाटील यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल World Book of Records कडून सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह, शनी देवगाव येथेही त्यांनी रांगोळी सेवा केली होती.

विशेष म्हणजे, यावर्षी सरला बेट ते पंढरपूर या पवित्र दिंडी सोहळ्याच्या मार्गावर तब्बल १३ ते १४ दिवस दररोज पंढरीच्या वाटेवर मोफत रांगोळी सेवा दिली. भक्ती, कला आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत त्या वारकऱ्यांचे स्वागत रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आले.

“रांगोळी ही केवळ एक कला नसून, माझ्यासाठी ती भगवंताच्या चरणी अर्पण केलेली सेवा आहे. भक्ती आणि कलेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य आहे,” असे हर्षदा मोईन पाटील यांनी सांगितले.

मोबाईल no. 9766563671
Instagram वर रांगोळी बघा:- @harshada_moin.art

रविवार, २३ ऑगस्ट, २०२६

धार्मिक परंपरेत विखे पाटील परिवाराचे योगदान! धनगरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह कमिटीकडे १०१ साखर पोती सुपूर्त

धार्मिक परंपरेत  विखे पाटील परिवाराचे  योगदान!

 धनगरवाडीतील अखंड हरिनाम सप्ताह कमिटीकडे १०१ साखर पोती सुपूर्त

राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे सद्गुरू महंत गंगागिरीजी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १०१ साखर पोती सप्ताह कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली. धार्मिक आणि सामाजिक परंपरा मध्ये  योगदान  देण्याची विखे पाटील परिवाराची सक्रीयता   पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

धनगरवाडी येथे आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह हा परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा मोठा सोहळा आहे. सप्ताहाच्या आयोजनासाठी आवश्यक असलेल्या साखरेची गरज लक्षात घेऊन पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने १०१ साखर पोती सप्ताह कमिटीकडे सुपूर्त करण्यात आली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून यंदाच्या सप्ताहामध्ये योगदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.विखे पाटील परिवाराने जिल्ह्यातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसह वारकरी सांप्रदाया मध्ये नेहमीच योगदान आणि  सहकार्य करण्याची  परंपरा कायम ठेवली आहे. धनगरवाडीतील या भक्तिमय सोहळ्यालाही कारखान्याच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य करण्यात आले.

यावेळी विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन सोपानराव शिरसाठ, एम.डी. महेश कोनापुरे, संचालक लाटे पाटील, ताटे पाटील, यादव पाटील यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सप्ताह कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

धार्मिक परंपरा जपत समाजाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ करण्याचे काम विखे पाटील परिवार सातत्याने करत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून धनगरवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सप्ताह कमिटीकडे करण्यात आलेल्या या सहकार्याबद्दल आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

कोट 

धनगरवाडी येथे सप्ताह घेण्याचा निर्णय झाल्यानंतर या गावाला जोडणार्या सर्व रस्त्यांच्या कामासाठी जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी ४कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करून रस्त्यांची काम मार्गी लावली.यामुळे येणार्या लाखो भाविकांना येणे सोयीस्कर झाले.याबद्दल महंत रामगिरी महाराज यांनी मंत्री विखे पाटील यांचे जाहीर अभिनंदन करून आभार मानले.

शनिवार, २२ ऑगस्ट, २०२६

नव्या शैक्षणिक पद्धतींसाठी शिक्षकांचे प्रभावी प्रशिक्षण


नव्या शैक्षणिक पद्धतींसाठी शिक्षकांचे प्रभावी प्रशिक्षण

शिर्डी, 
श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डी येथे शिक्षकांना आधुनिक व विद्यार्थी-केंद्रित अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा समन्वयक (रतलाम, मध्य प्रदेश) तथा साई श्री इंटरनॅशनल अकॅडमीच्या प्राचार्या डॉ. श्वेता विंचूरकर यांनी या कार्यशाळेस मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत NEP 2020, NCF 2023, competency-based, experiential व activity-based learning, formative assessment तसेच २१व्या शतकातील कौशल्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. केजी ते माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, कृतीआधारित शिक्षण, भावनिक व सामाजिक विकास आणि शिक्षकाची learning facilitator म्हणून भूमिका याविषयी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
केजी शिक्षकांसाठी ECCE, Panchakosha Vikas, foundational literacy व numeracy, play-based learning आणि I Do–We Do–You Do या अध्यापन तंत्रांचा वर्गातील प्रभावी वापर समजावून सांगण्यात आला.
ही कार्यशाळा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आली. “शिक्षक बदलला, तर अध्यापन बदलते; अध्यापन बदलले, तर विद्यार्थ्यांचे भविष्य बदलते.” या विचारातून शिक्षकांना नव्या शैक्षणिक दृष्टिकोनाशी जोडण्याचा या प्रशिक्षणाचा प्रयत्न असल्याचे प्राचार्या डॉ. श्वेता विंचूरकर यांनी यावेळी नमूद केले.

अखंड हरिनाम सप्ताहात हर्षदा मोईन पाटील यांची रांगोळी सेवा

अखंड हरिनाम सप्ताहात हर्षदा मोईन पाटील यांची रांगोळी सेवा

हर्षदा नवनाथ मोईन पाटील, ता.वैजापूर , जि.छ.संभाजीनगर, या रांगोळी कलाकार असून कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. रांगोळी हा त्यांचा आवडता छंद असून, पोर्ट्रेट रांगोळी, विविध कलाकृती तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात त्यांना विशेष प्राविण्य आहे.

सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र धनगरवाडी, ता. राहाता येथे यावर्षी त्यांना रांगोळी सेवा करण्याची पवित्र संधी मिळाली आहे. सप्ताहाच्या एक दिवस आधी त्यांनी भव्य पोर्ट्रेट रांगोळीचे चित्र रेखाटून त्यामध्ये आकर्षक आणि योग्य रंगसंगतीचा वापर करून रंग भरण्यास सुरुवात केली. ही पोर्ट्रेट रांगोळी पूर्ण करण्यासाठी तब्बल 21 तास 30 मिनिटांचा अवधी लागला.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही भगवंताच्या आशीर्वादाने या भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात रांगोळी सेवा करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

हर्षदा मोईन पाटील यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल World Book of Records कडून सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह, शनी देवगाव येथेही त्यांनी रांगोळी सेवा केली होती.

विशेष म्हणजे, यावर्षी सरला बेट ते पंढरपूर या पवित्र दिंडी सोहळ्याच्या मार्गावर तब्बल १३ ते १४ दिवस दररोज पंढरीच्या वाटेवर मोफत रांगोळी सेवा दिली. भक्ती, कला आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत त्या वारकऱ्यांचे स्वागत रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आले.

रांगोळी ही केवळ एक कला नसून, माझ्यासाठी ती भगवंताच्या चरणी अर्पण केलेली सेवा आहे. भक्ती आणि कलेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य आहे,” असे हर्षदा मोईन पाटील यांनी सांगितले
मोबाईल no. 9766563671
Instagram वर रांगोळी बघा:- @harshada_moin.art

उद्योजकांना सुरक्षा वाटेल,त्यांना पायाभूत सुविधा कामागारांना संरक्षण मिळेल असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी उद्योग विभागाला घ्यावी लागेल



अहिल्यानगर

अहील्यानगर जिल्ह्यात ७८उद्योजकांनी सुमारे १३हजार कोटी रुपयांची  केलेली गुंतवणूक औद्योगिक क्षेत्राला नवा आत्मविश्वास देणारी आहे.औद्यगिक विकासाच्या दृष्टीने निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे  उद्योजक जिल्ह्यात निर्भयपणे गुंतवणूक करून रोजगार निर्माण करतील असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने  गुंतवणूक परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात ७८ उद्योगांशी उद्योग विभागाच्या माध्यमातून करार  करण्यात आले.सुमारे १३हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यामाध्यातून झाली आहे.सर्व उद्योजकांचा सन्मान मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात

गुंतवणूक परिषदेस आ.काशिनाथ दाते उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोने,उद्योजक अरविंद पारगावकर,औद्योगिक विकास मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गणेश राठोड जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके,भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहराचे अध्यक्ष अनिल मोहिते विनायक देशमुख अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
याप्रसंगी उद्योजकांशी संवाद साधतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहील्यानगर जिल्हा मुख्य औद्यगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे.यापुर्वी औद्योगिक विकासात थोडे नकारात्मक वातावरण होते.मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात येत असलेल्या गुंतवणूकीचा लाभ जिल्ह्याला होत असल्याने  औद्योगिक क्षेत्रात सकारत्मक वातावरण निर्माण होत असल्याचे  समाधान व्यक्त केले.

जिल्ह्यात औद्योगिक विकासासाठी जागांची उपलब्धता करून दिल्यानंतर पहीला संरक्षण प्रकल्प निबे गृपच्या माध्यमातून जिल्ह्यात भविष्यात बेलवंडी, हरेगाव येथेही संरक्षण उत्पादनाचे प्रकल्प कार्वान्वित होणार असल्याचे सांगून,यापुर्वी असे प्रयत्न जिल्ह्यात झाले नाहीत त्यामुळे औद्योगिक विकासात जिल्हा मागे राहीला.धाक दडपशाही मुळे उद्योग माघारी गेल्याची खंत त्यांनी  व्यक्त केली.
उद्योजकांना सुरक्षा वाटेल,त्यांना पायाभूत सुविधा कामागारांना संरक्षण मिळेल असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी उद्योग विभागाला घ्यावी लागेल असे सुचित करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, सूक्ष्म आणि लघु उद्योगापासून ते मोठ्या उद्योगांच्या गुंतवणूकीसाठी युवक महीला पुढे येत असल्याचे समाधान असून,यातून नवा आत्मविश्वास औद्योगिक क्षेत्राला मिळेल.गुंतवणूक किती कोटीची यापेक्षाही तरूण उद्योजकांच्या धाडसाला महत्व आहे.

अहील्यानगर जिल्हा छत्रपती संभाजी नगर आणि पुणे या मोठ्या औद्यगिक पट्ट्याला जोडणारे केंद्र झाले  आहे.रस्ते विकास आणि शिर्डी विमानतळाचा विस्तार होत असून  कार्गो हब निर्माण होईल.जिल्ह्यात सेमी कंडक्टरचा प्रकल्प आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे.जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उजनी प्रकल्पावर डेटा सेंटर उभारले जाणार आहे.सुमारे ९४हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करीत असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोनी,उद्योग अधिकारी अशोक बेनके,औद्योगिक विकास मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गणेश राठोड अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग शहर अध्यक्ष अनिल मोहिते विनायक देशमुख यांच्यासह उद्योजक उपस्थित होते

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

थोर स्वातंत्र्य सेनानी कै. का.ल.शिंदे पाटील स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

थोर स्वातंत्र्य सेनानी कै. का.ल.शिंदे पाटील स्मृतिदिनानिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

राहाता 

 रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा थोर स्वातंत्र्य सेनानी कै. का.ल. शिंदे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सुमारे 165 स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी.जी .गुंजाळ हे होते वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते त्यातून उत्कृष्ट वक्ते घडतात. विद्यार्थ्यांमधून वक्ते निवडणे हा श्रृत्य उपक्रम आहे असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतच सांगितले. या प्रसंगी डॉ. जयंत गायकवाड यांनी सादरीकरण करणे, वक्तृत्व स्पर्धा ही एक कला आहे, ती आत्मसात केली पाहिजे. शारदा  संकुला मधूनच मी वक्तृत्व कला शिकलो याचा मला सार्थ अभिमान आहे असे सांगितले .डॉ. नजीर शेख यांनी व्यक्तिमत्व विकास घडण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा गरजेची आहे. विद्यार्थ्यांनी शब्दसंग्रह वाढविला पाहिजे त्यामुळे आपल्याला व्यक्त होता येते असे सांगितले.  त्यांनी ऊन सावल्या या कवितेचे गायन केले दुःखात पोळलो मी सुखात लोळलो मी  या कवितेच्या ओळीने जीवनाचा अर्थ सांगितला व श्रोत्यांची मनी जिंकली. 
      ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी आपल्या मनोगतामध्ये वक्तृत्व स्पर्धा ही आजच्या काळाची गरज आहे काहीतरी बोला पण काहीतरी बोलू नका. चांगले ऐकले तर चांगलेच बोलता येते .उद्याचा भारत उत्तम वक्ताच घडू शकतो आणि या स्पर्धेतून उत्तम वक्ते घडावेत असे अपेक्षा व्यक्त केली. 
       संकुलाचे मार्गदर्शक रमेश भाऊ शिंदे यांनी स्पर्धेतून आपले अस्तित्व सिद्ध होते .यासाठी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. राहाता तालुक्यातील सर्व पत्रकार हे शारदाचे माजी विद्यार्थी आहेत  याचा आम्हाला अभिमान आहे .महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये रयत शिक्षण संस्थेचा मोठा वाट आहे .त्यासाठी वक्ते निर्माण झाले पाहिजे यासाठी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन संकुलात केली जाते असे सांगितले .  मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.शशिकांत बनकर, विठ्ठल शेजुळ, सुभाष डांगे ,सोपान गमे ,गणेश गमे ,प्रतीक बेलेकर यांनी पारदर्शीपणे काम केले या कार्यक्रमाचे नियोजन संकुलाच्या प्राचार्या शिला संसारे ,कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे ,इंग्लिश मीडियम च्या प्राचार्या निशाचे गोट, उपप्राचार्य जगताप एस. पी., पर्यवेक्षक देशमुख ,पर्यवेक्षक कमल साबळे ,प्रा. बाळासाहेब दिघे, प्रा. रमेश आहेर,यांनी नियोजन केले. प्रा. शरद गमे यांनी सदर कार्यक्रमाचा उद्देश प्रस्ताविकातून सांगितला .आभार कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार साळवे यांनी मानले.सूत्रसंचलन सोनाली थोरात यांनी केले

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

४० वर्षांचे ओझे उतरले… आता गळा मोकळा आणि श्वासही मोकळा!

४० वर्षांचे ओझे उतरले… आता गळा मोकळा आणि श्वासही मोकळा!

शिर्डी : 
तब्बल ४० वर्षे गळ्यातील प्रचंड वाढलेली गाठ घेऊन जीवन जगणाऱ्या ७० वर्षीय आजीची जवळपास ७०० ग्रॅम वजनाची आणि तब्बल २० सेंटीमीटर आकाराची महाकाय थायरॉईड ग्रंथी शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीपणे काढण्यात आली. ही अत्यंत आव्हानात्मक शस्त्रक्रिया डॉ. अजिंक्य बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १२/०८/२०२६ रोजी श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी येथे पार पडली.

रुग्ण गेल्या जवळपास ४० वर्षांपासून गळ्यातील या प्रचंड गाठीमुळे त्रस्त होती. कालांतराने ही गाठ एवढी मोठी झाली की तिने गळ्याचा बहुतांश भाग व्यापला होता. अनेक ठिकाणी शस्त्रक्रियेबाबत तिला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. वाढते वय, गाठीचा प्रचंड आकार आणि श्वासनलिकेशी असलेला जवळचा संबंध यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती.

तपासणीमध्ये दोन्ही बाजूंच्या थायरॉईड ग्रंथी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या असून त्यामध्ये अनेक गाठी व कॅल्सिफिकेशन दिसून आले. महाकाय ग्रंथीने श्वासनलिकेला पूर्णपणे वेढले होते आणि श्वासनलिकेवर दोन्ही बाजूंनी दाब निर्माण झाला होता.

अशा परिस्थितीत डॉ. अजिंक्य बापूसाहेब पानगव्हाणे यांनी हे आव्हान स्वीकारत शस्त्रक्रियेचे योग्य नियोजन केले. अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने जवळपास २० × १० सेंटीमीटर आकाराची आणि अंदाजे ७०० ग्रॅम वजनाची महाकाय थायरॉईड ग्रंथी ३ ते ४ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे काढण्यात आली.

या आव्हानात्मक शस्त्रक्रियेमध्ये भूलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती समाधानकारक असून तिचा आवाज टिकून आहे. श्वासोच्छवास व्यवस्थित असून ती पुढील उपचार घेत आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेमागे जनरल सर्जरी ऑपरेशन थिएटरच्या संपूर्ण टीमचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले. नर्सिंग ऑफिसर सुनीता एरंडे सिस्टर, जयश्री चोळके सिस्टर, ओटी टेक्निशियन बाळासाहेब डांगे आणि गौतम मोकळ यांनी शस्त्रक्रियेच्या काळात मोलाची भूमिका बजावली.तसेच रुग्णाच्या उपचार प्रक्रियेत आणि आवश्यक समन्वयामध्ये सोशल वर्कर नागपूरे मॅडम ,गाडेकर मॅडम   यांचेमहत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गोरक्ष गाडीलकर (भा प्र से ) वैद्यकीय संचालक प्रीतम वडगावे यांनी जनरल ओटी टीमचे अभिनंदन केले आहे 
४० वर्षांपासून गळ्यातील एवढी मोठी गाठ घेऊन जगणाऱ्या या महिलेच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रियेनंतर दिसलेला आनंद हा डॉ. अजिंक्य पानगव्हाणे, डॉ. संतोष सुरवसे आणि संपूर्ण वैद्यकीय टीमसाठी अत्यंत समाधानाचा क्षण ठरला.

ही केवळ एका मोठ्या गाठीची शस्त्रक्रिया नव्हती;
ही ४० वर्षे त्रास सहन करणाऱ्या एका महिलेच्या आयुष्यात पुन्हा आत्मविश्वास आणि आनंद आणणारी शस्त्रक्रिया होती.

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

नगर मनमाड आणि ट्रम्प विधानावर डॉ सुजय विखे पाटील ठाम ! विरोधकांना थेट प्रत्युत्तर, पुराव्यांसह मांडली भूमिका

नगर मनमाड आणि ट्रम्प विधानावर डॉ सुजय विखे पाटील ठाम !  विरोधकांना थेट प्रत्युत्तर, पुराव्यांसह मांडली भूमिका


शिर्डी 

   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर मी ठाम आहे. अभ्यासू पणे केलेले हे वक्तव्य विरोधकांना न समजल्याने व तेवढा अभ्यास त्यांचा नसल्याने राजकीय पोळी भाजण्यासाठी ते रान उठवत आहे या प्रश्नावर मला विरोधकांना उत्तर देण्याची गरज नाही परंतु जनतेला उत्तर देणे माझे दायित्व आहे. रस्त्याच्या कामांना युद्धजन्य परिस्थिती व डोनाल्ड ट्रम्प हेच जबाबदार असल्याचे वक्तव्यावर मी आजही ठाम असल्याचा पुनर्रचार करत दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली हे वक्तव्य मी मार्मिक व मिश्किल पणे केले होते याचा अर्थ काहींनी वेगळा काढला आहे हे मिस्कील वक्तव्य मी मागे घेत असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेत शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते राजेंद्र गोंदकर यांच्यासह नगर परिषदेच्या नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते याप्रसंगी बोलताना डॉ सुजय विखे पाटील म्हणाले की
 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कार्यपद्धतीमुळे युद्ध लादल्याने डांबराची उपलब्धता व आयात कमी झाली डांबर आयातीवर संकट आले त्यामुळे देशातील अनेक रस्त्यांची कामे थांबली त्यात अहील्यानगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुद्धा संथ गतीने होत आहेत अमेरिकेच्या युद्ध धोरणामुळे पश्चिम आशियातून डांबराचा पुरवठा घटला, दर वाढले आणि त्याचा परिणाम देशातील रस्त्यांच्या कामांवर झाला,’ या आपल्या आधीच्या वक्तव्यावर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ठाम राहिले आहेत. ‘मी प्रत्येक वाक्य पूर्ण अभ्यास करून बोलतो. माझ्या वक्तव्याला अधिकृत आकडेवारी, शासकीय पत्रे आणि परदेशी व भारतातील विविध वृत्तपत्रांतील वृत्तांचे आधार आहेत. त्यामुळे मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. नगर-मनमाड रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.
भारताला दरवर्षी सुमारे ९० लाख मेट्रिक टन डांबराची गरज भासते. त्यातील सुमारे निम्मे डांबर देशांतर्गत तेलशुद्धीकरण कारखान्यांमध्ये तयार होते, तर उर्वरित डांबर इराक, संयुक्त अरब अमिराती, इराण आणि बहरीन या देशांतून आयात केले जाते, असा दावा डॉ. विखे यांनी केला. युद्धजन्य परिस्थितीमुळे या देशांतून होणाऱ्या डांबराच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून, आयातीत सुमारे ७८ टक्क्यांची घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
दर ४८ हजारांवरून ८३ हजार ६५२ रुपये
डांबराच्या दरवाढीची आकडेवारीही त्यांनी मांडली. फेब्रुवारी २०२६मध्ये प्रति मेट्रिक टन सुमारे ४८ हजार रुपये असलेला डांबराचा दर काही महिन्यांत वाढून ८३ हजार ६५२ रुपयांवर पोहोचला. त्यामुळे दरात सुमारे ७१ टक्क्यांची वाढ झाली आहे. डांबराच्या वाढलेल्या दरामुळे रस्त्यांच्या कामांवर परिणाम झाला असून, केंद्र सरकारने कंत्राटदारांना वाढीव दर देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ केंद्र सरकारची अधिकृत आकडेवारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची पत्रे तसेच विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांतील वृत्तांचे दाखले त्यांनी दिले. ‘विरोधकांनी आधी जागतिक घडामोडींचा अभ्यास करावा आणि मगच टीका करावी,’ असा टोला त्यांनी लगावला.
दारूसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून झालेल्या वादावरही डॉ. विखे यांनी स्पष्टीकरण दिले.  ते विधान मार्मिक आणि उपहासात्मक शैलीत केले होते; मात्र त्याचा विपर्यास करण्यात आला. कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून ते शब्द मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘निवडून दिलेल्यांनी हात वर केले म्हणून मला रस्त्यावर उतरावे लागले’
नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेवरून सुरू असलेल्या राजकीय टीकेलाही डॉ. विखे यांनी थेट प्रत्युत्तर दिले. ‘माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. मात्र जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हात वर केल्यामुळे आज निवडणुकीत पराभूत झालेल्या माणसाला जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून हे काम हाती घ्यावे लागत आहे,’ असा घणाघात त्यांनी केला.
रस्त्याच्या कामात दिरंगाई झाली असून काही ठिकाणी कामाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आहेत आणि रस्ता खचल्याच्या तक्रारीही खऱ्या असल्याचे त्यांनी मान्य केले. ‘ठेकेदार माझा नातेवाईक नाही. मात्र जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन त्याच्याकडून दर्जेदार काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मी स्वतः घेतली आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
‘ठेकेदारावर कारवाई केली तर रस्ता कोण पूर्ण करणार?’
रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी सवाल केला. ‘राहात्यातील काही नेते चौकशी लावण्यासाठी आणि गुन्हे दाखल करण्यासाठी केंद्राला चार-चार पानी पत्रे पाठवत आहेत. ठेकेदारावर कारवाई होऊन तो काम सोडून गेला, तर उर्वरित रस्ता हे नेते स्वतः पूर्ण करून देणार आहेत का? याचे उत्तर त्यांनी आधी जनतेला द्यावे,’ असे आव्हान त्यांनी दिले.
केवळ पत्रे पाठवून आणि आरोप करून रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही. जनतेला दर्जेदार आणि पूर्ण रस्ता हवा आहे. त्यामुळे काम थांबविण्याऐवजी ते पूर्ण करून घेण्याला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘रस्त्यासाठी आवाज उठवायला ग्रामपंचायत सदस्य असण्याची गरज नाही. मी या देशाचा करदाता नागरिक आहे. जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या करातून हा रस्ता होत आहे. या रस्त्यावर अपघातात जीव गमावणारे नागरिक माझे आहेत. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून मला प्रश्न विचारण्याचा आणि काम पूर्ण करून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे,’ असे विखे म्हणाले.
‘पराभवाने कोणी संपत नाही’
आपल्या राजकीय भवितव्याबाबतही त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ‘एका निवडणुकीतील पराभवाने कोणी माजी होत नाही किंवा संपत नाही. निवडणूक पुन्हा होणार आहे. २०२९मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लागणारा निकाल सर्वांसमोर असेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जागतिक परिस्थितीमुळे अडचणी निर्माण झाल्या असतानाही नगर-मनमाड रस्त्याचे जवळपास ६० टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा डॉ. विखे यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाला गती देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुळा धरण ९५% भरल्याने दोन्ही कॅनाॅल व नदीपात्रात पाणी सोडा- गडाख

मुळा धरण ९५% भरल्याने दोन्ही कॅनाॅल व नदीपात्रात पाणी सोडा- गडाख 


नेवासे 

घाट माथ्यावर झालेल्या पाऊसाने मुळा धरण ९५% भरले असून सध्या च्या जलसंपदा विभागाच्या आकडेवारी  तारखेनुसार मुळाधरणातुन पाणी सोडता येत असते  दोन्ही कॅनाॅल बरोबरच मुळा नदीपात्रात पाणी सोडा अन्यथा शेतकऱ्यांसह जनावरे घेवून अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गवर घोडेगाव 
(ता. नेवासे)येथे रास्ता -रोको आंदोलन छेडण्याचा इशारा अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी पशुसंवर्धन अर्थ बांधकाम सभापती लोकनेते सुनिल गडाख यांनी दिला आहे. प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले की,मुळा लाभक्षेत्रात सुरुवातीला झालेल्या पाऊसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आडसाली ऊस लागवडी केल्या आहेत त्याच बरोबर तुर सोयाबीन,कपाशी, मूग, बाजरी, मका, भूईमूग आणि पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पिकं पाण्याअभावी जळून चालली आहे.आता जवळपास दोन महिने होत आले असून पाऊसाने दडी मारल्याने पिका बरोबरच पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून टॅंकर द्वारे आज हि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू असून पिकांना वेळीच पाणी नाही मिळाल्यास उभी पिकं पाण्या अभावी जळून जातील व कोट्यावधी रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. ते टाळण्यासाठी दोन्ही कॅनाॅल त्यांच्या पोटचाऱ्या बरोबरच नदीपात्रात पाणी सोडल्याने पिकांना जीवदान मिळणार असून शेतकऱ्यांचे होणार नुकसान थांबेल. लवकरात लवकर मुळाधरणातुन पाणी सोडुन लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा देणयात यावा अन्यथा प्रशासनाल पुर्व सुचना न देता रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गडाख यांनी दिला आहे.
---+++प्रतिक्रिया -  मुळा नदीवरील बंधारे कोरडे ठाक असून भर पावसाळ्यात मुळानदीवरीलचं नदीपात्र कोरडेठाक आहे मुळाधरणातुन नदीपात्रात तसेच दोन्ही कॅनाॅल पाणी सोडावे अन्यथा लोकनेते सुनिल गडाख यांनी दिलेला रास्ता-रोको इशारा आंदोलनात जनावर गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या घेऊन येवू - ज्ञानेश्वर आयनर 
सरपंच अंमळनेर ता नेवासे.

प्रतिक्रिया:-
 
 सुरुवातीला झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आडसाली ऊस लागवड केली असून दोन महिन्यांपासून पाऊसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून मुळाधरणात जलसंपदा विभागाच्या आकडेवारी नुसार अपेक्षित जलसाठा झाला असून तातडीने मुळाधरणातुन पाणी सोडण्यात यावे अन्यथा सुनिल गडाख यांनी दिलेला इशारा नुसार शेतकरी मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभागी होणार आहे- 
आबासाहेब फाटके 
- प्रगतीशील शेतकरी खरवंडी

श्रीगोंदा-अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांतील सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार - डॉ. सुजय विखे पाटीलमहायुती सरकारचे आभार; साकळाई योजनेच्या ९६७ कोटींच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध

श्रीगोंदा-अहिल्यानगर तालुक्यातील ३२ गावांतील सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार - डॉ. सुजय विखे पाटील

महायुती सरकारचे आभार; साकळाई योजनेच्या ९६७ कोटींच्या कामाचे टेंडर प्रसिद्ध


अहिल्यानगर 

अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेतील साकळाई उपसा सिंचन योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता वेग आला आहे. दीर्घकाळ कागदोपत्री प्रक्रिया, आश्वासने आणि प्रशासकीय अडथळ्यांमध्ये रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेचे ९६७ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध झाले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता असून, सर्व प्रक्रिया मार्गी लागल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर योजनेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात 
होईल अशी माहिती डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली.

या योजनेमुळे अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ जिरायती गावांमधील सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतीला शाश्वत पाण्याचा आधार मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीतही बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर निर्णायक टप्पा
साकळाई योजनेची मुहूर्तमेढ पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी रोवली होती. जिरायती भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी, दुष्काळी गावांचा कायापालट व्हावा आणि शेतीला शाश्वत पाण्याचा आधार मिळावा, या उद्देशातून या योजनेची संकल्पना पुढे आली. मात्र अनेक वर्षे सरकारे आणि लोकप्रतिनिधी बदलत राहिले तरी योजनेचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. प्रत्येक निवडणुकीत साकळाईचा मुद्दा चर्चेत येत होता; मात्र निवडणुकीनंतर प्रक्रिया पुन्हा संथ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.

२०२२ नंतर या योजनेच्या प्रक्रियेला निर्णायक गती मिळाली. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाईचा विषय सातत्याने शासन दरबारी लावून धरत अधिकाऱ्यांच्या बैठका, प्रस्तावांचा पाठपुरावा, तांत्रिक अडचणी आणि सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी प्रयत्न केले. २०२४ मध्ये योजनेचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर योजनेला प्रत्यक्ष आकार मिळण्याची आशा निर्माण झाली. तसेच पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा अडथळा दूर
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर योजनेसमोरील महत्त्वाचा प्रश्न होता तो पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा. हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने योजनेच्या पुढील प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला होता. २०२४-२५ मध्ये जलसंपदा विभागाची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आल्यानंतर साकळाई योजनेच्या प्रक्रियेला पुन्हा वेग मिळाला. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेत योजनेतील अडथळे दूर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता आणि १,२३४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाल्याने योजनेच्या पुढील प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.

आता ९६७ कोटींच्या कामाचे टेंडर
साकळाई उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी ९६७ कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध झाल्याने योजनेने आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. वनविभागासह अन्य संबंधित विभागांच्या आवश्यक मान्यतांसाठीही मागील महिन्यात टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून साकळाई योजनेच्या प्रत्यक्ष कामाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अतिरिक्त पाण्यातून दुष्काळी भागाला दिलासा
१९५४ मध्ये घोड धरणासाठी केंद्रीय जल आयोगाने १०.४० टीएमसी पाणी साठ्याला मंजुरी दिली होती. मात्र प्रत्यक्षात धरणाची क्षमता ७.४० टीएमसी इतकी बांधण्यात आली. परिणामी दरवर्षी सुमारे तीन ते चार टीएमसी पाणी ओव्हरफ्लोच्या स्वरूपात वाहून जाते. या अतिरिक्त पाण्यापैकी १.८० टीएमसी पाणी साकळाई योजनेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे.

साकळाईच्या वाटचालीतील महत्त्वाच्या घडामोडी
साकळाई योजनेचा इतिहास पाहता या मागणीसाठी अनेक वर्षे आंदोलने, निवेदने आणि बैठका झाल्या. प्रत्येक निवडणुकीत योजनेचा मुद्दा ऐरणीवर आला; मात्र प्रत्यक्ष काम सुरू झाले नव्हते.माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदारकीच्या काळात सर्वेक्षण पूर्ण करून घेणे, प्रशासकीय पातळीवरील अडथळे दूर करणे आणि प्रस्तावाला गती देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, शासन मान्यता आणि निधी मंजुरीच्या प्रक्रियेला गती दिली.या प्रक्रियेत माजी मंत्री बबनराव पाचपुते, स्व. आमदार शिवाजीराव कर्डिले, विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार अक्षय कर्डिले यांनी सहकार्याची भूमिका घेतली.

३२ जिरायती गावांना लाभ
साकळाई उपसा सिंचन योजनेचा लाभ अहिल्यानगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील ३२ जिरायती गावांना अपेक्षित आहे. यामध्ये चिखली, कोरेगाव, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, जाधववाडी, वाळकी, शिरढोण, हिवरे झरे, बाबुर्डी बेंड, दहिगाव, साकत, वाटेफळ, देऊळगाव सिद्धी, तांदळी, बडगाव, रुई छत्तीसी, आंबिलवाडी, गुणवडी, गुंडेगाव, राळेगण, मांडवगण, मठ पिंप्री, हातवळण, खांडगाव, महांडूळवाडी, कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी, कोतुळ, बांगर्डा आणि कामठी या गावांचा समावेश आहे.

सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याची अपेक्षा असल्याने साकळाई योजना पूर्ण झाल्यास या भागातील शेतीच्या चित्रात मोठा बदल होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साकळाईच्या मागणीला आता प्रत्यक्ष कामाच्या रूपाने दिशा मिळते का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेला मिळालेल्या मंजुरी आणि पुढील प्रक्रियेला गती मिळाल्याबद्दल माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

देशसेवा हीच ईश्वर सेवा – वीरनारी मंगलताई वल्टे

देशसेवा हीच ईश्वर सेवा – वीरनारी मंगलताई वल्टे

पोहेगाव 
:- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री.ग.र.औताडे पा. विद्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी देशासाठी बलिदान दिलेले वीर सैनिक सुनिल रावसाहेब वल्टे यांच्या पत्नी मंगलताई वल्टे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणनंतर विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी सांगितले की, आज अनेक सैनिक अहोरात्र आपल्या प्राणांची पर्वा न करता सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी  देखील आपल्यापरीने देशसेवा करावी. आपले देशहितासाठी केलेले कार्य ही देशसेवा म्हणजे ईश्वर सेवा आहे. वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून नागरिकांनी देशाविषयी आपले कर्तव्य पार पाडणे ही प्रत्येकाचे जबाबदारी आहे असे आपल्या मनोगतातून त्यांनी सांगितले.
विद्यालयाने  प्रारंभी प्रभातफेरी काढून जनजागृती , देशभक्ती विषयक घोषणा दिल्या . ध्वजारोहण नंतर विद्यार्थ्यांनी परेड संचलन केले त्यानंतर सामुहिक कवायत , कॉपीमुक्त परीक्षा , बालविवाह प्रतिबंधक शपथ, अंमली पदार्थ विरोधी शपथ उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी , शिक्षक यांनी घेतली.  विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य , गायन ई.सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी कलागुण सदर केले. या प्रसंगी स्कूल कमिटीचे सदस्य श्री. सचिन रोहमारे, श्री मधुकर औताडे, श्री. नंदकिशोर औताडे, श्री देवेन रोहमारे व उपस्थित इतर पालक यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसे देवून त्यांच्या कलागुणांना दाद दिली. याप्रसंगी श्री राजेंद्र गायकवाड , श्री उत्तम भालेराव, श्री योगेश औताडे, श्री. निलेश औताडे श्री किरण रोहमारे,श्री कृष्णा औताडे, श्री सुशील औताडे व इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांकृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन सांगळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय भोसले , सुनील वाघमारे, गोपाल पाटील, अनिल गांगुर्डे, ज्ञानेश्वर राठोड, महेंद्र काळंगे , प्रदीप दरेकर, गोकुळ व-हाडे, सुहास भावसार, नरेंद्र लहिरे, विजय सूर्यवंशी, श्रीमती बनसोडे, श्रीमती साळवे, श्रीमती लहामगे ,श्रीमती बागुल , मनीषा शिंदे श्रीमती धीवर इ. शिक्षक , शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...