एकादशी निमित्त हर्षदा मोईन पाटील यांची भव्य विठ्ठल-रुख्मिणी रांगोळी सेवा
हर्षदा नवनाथ मोईन पाटील, रा.वैजापुर ता.वैजापूर , जि.छ.संभाजीनगर, या रांगोळी कलाकार असून कला शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. रांगोळी हा त्यांचा आवडता छंद असून, पोर्ट्रेट रांगोळी, विविध कलाकृती तसेच फुलांची आकर्षक सजावट करण्यात त्यांना विशेष प्राविण्य आहे.
सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७९ वा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र धनगरवाडी, ता. राहाता येथे यावर्षी एकादशी निमित्त त्यांना भव्य विठ्ठल-रुख्मिणी रांगोळी सेवा करण्याची पवित्र संधी मिळाली आहे. एकादशी निमित्त त्यांनी १६ × १६ फूट आकाराची विठ्ठल-रुख्मिणीची भव्य कलाकृती रेखाटून त्यामध्ये आकर्षक आणि योग्य रंगसंगतीचा वापर करून रंग भरण्यास सुरुवात केली. ही भव्य रांगोळी पूर्ण करण्यासाठी तब्बल २५ तासांचा अवधी लागला.
सप्ताह च्या पहिल्या दिवशी 16 × 16 या size चे सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि नारायणगिरीजी महाराज यांची portrait rangoli काढली होती आणि आता ती रांगोळी पुसली व एकादशी निम्मित विठ्ठल रुख्मिणी ची रांगोळी सादर केली
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही भगवंताच्या आशीर्वादाने या भव्य आणि दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात रांगोळी सेवा करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
हर्षदा मोईन पाटील यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल World Book of Records कडून सन्मानित करण्यात आले आहे. मागील वर्षी सद्गुरू श्री गंगागिरी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताह, शनी देवगाव येथेही त्यांनी रांगोळी सेवा केली होती.
विशेष म्हणजे, यावर्षी सरला बेट ते पंढरपूर या पवित्र दिंडी सोहळ्याच्या मार्गावर तब्बल १३ ते १४ दिवस दररोज पंढरीच्या वाटेवर मोफत रांगोळी सेवा दिली. भक्ती, कला आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम साधत त्या वारकऱ्यांचे स्वागत रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आले.
“रांगोळी ही केवळ एक कला नसून, माझ्यासाठी ती भगवंताच्या चरणी अर्पण केलेली सेवा आहे. भक्ती आणि कलेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळणे, हे माझे भाग्य आहे,” असे हर्षदा मोईन पाटील यांनी सांगितले.
मोबाईल no. 9766563671
Instagram वर रांगोळी बघा:- @harshada_moin.art
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा