शनिवार, १३ जून, २०२६

डॉ. संजय उबाळे यांचा नगरपालिकेत सन्मान

डॉ. संजय उबाळे यांचा नगरपालिकेत सन्मान

राहाता : 
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय सदस्य तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या राहाता तालुका सह संपर्क समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल डॉ. संजय उबाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

मा. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री (जलसंपदा) तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित "नामदार मॅरेथॉन स्पर्धा" नियोजन बैठकीदरम्यान हा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष विजय सदाफळ, गटनेते मुन्नाभाई शहा तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

डॉ. संजय उबाळे यांनी लायन्स क्लब राहाता व लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरीय व विभागीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच समाजरत्न पुरस्कार, वर्ल्ड लंडन बुक ऑफ रेकॉर्ड सन्मान आणि लायन्स क्लबचे विविध पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेऊन त्यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या राष्ट्रीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री. सुभाष बसवेकर यांच्या हस्ते त्यांची राहाता तालुका सह संपर्क समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल नुकतेच अभिनंदन करण्यात आले.

सन्मान सोहळ्यावेळी चौधरी साहेब, नायब तहसीलदार हेमंत पाटील, नगरसेवक प्रवीण रूणवाल, दशरथ तुपे, राहुल सदाफळ, नितीन गाडेकर, सुयोग शेळके, ॲड. मयूर पाळंदे, अजय आग्रे, प्रदीप बनकर, अक्षय बोठे, योगेश डांगे, अजय डांगे, अरुण मोकळ, गुड मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा व रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकारी, लायन्स क्लब ऑफ राहता चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, साईश्रध्दा परिसरातील विविध पदाधिकारी सर्वच स्तरांमधून अभिनंदन करण्यात येत आहे 

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नगरसेवक दशरथ तुपे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा; नेवासा न्यायालयाचा निकाल

महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा; नेवासा न्यायालयाचा निकाल  नेवासा (तालुका प्रतिनिध...