मंगळवार, २३ जून, २०२६

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर वकिली परीक्षेत घवघवीत यश"


जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर वकिली परीक्षेत घवघवीत यश
"
न्यायासाठी प्रामाणिकपणे लढणारा, सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन करणारा आणि कायद्याचे सखोल ज्ञान असणारा वकीलच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो," असे प्रतिपादन भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केले.
राहाता येथील अँड. संदीप पुंडलीक पुंड यांनी वकिलीच्या परीक्षेत 70.39 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल राहाता नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ममता पिपाडा आणि भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आरपीआयचे नेते दिलीपराव वाघमारे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. पिपाडा म्हणाले की, ग्रामीण भागातील युवकांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. *जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अँड. संदीप पुंड आहे.* त्यांनी अथक परिश्रम, अभ्यासू वृत्ती आणि कायद्याचा सखोल अभ्यास यांच्या बळावर हे यश मिळविले आहे. त्यांच्या यशामुळे राहाता शहरासह गणेश परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
*अँड. संदीप पुंड यांनी साईसन कॉम्प्युटर क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देत समाजात शैक्षणिक योगदान दिले आहे.* आता कायद्याच्या क्षेत्रातही त्यांनी यशस्वी पाऊल टाकले असून राहाता न्यायालयाला एक प्रामाणिक, अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि जनसामान्यांच्या न्यायासाठी झटणारा युवा वकील मिळाला आहे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अँड. संदीप पुंड यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...