श्री साईबाबा हॉस्पिटलला १२.८० लाख रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देणगी
श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलला हैदराबाद येथील साईभक्त साईदीप अन्नदाता यांनी सुमारे १२ लाख ८० हजार रुपये किमतीची सेंट्रल व्हॅक्यूम पंप (Central Vacuum Pump) व एअर ड्रायर (Air Dryer) ही अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे देणगी स्वरूपात प्रदान केली.
रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग (ICU) तसेच विविध वॉर्डमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली ही उपकरणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. सेंट्रल व्हॅक्यूम पंपद्वारे सक्शनसाठी आवश्यक व्हॅक्यूम निर्माण केला जातो, तर एअर ड्रायरद्वारे कॉम्प्रेस्ड एअरमधील ओलावा काढून स्वच्छ व कोरडी हवा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे वैद्यकीय उपकरणांची कार्यक्षमता वाढून रुग्णसेवा अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते साईदीप अन्नदाता यांचे रुग्णसेवेसाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, आधीसेविका मंदा थोरात, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, बायोमेडिकल इंजिनियर श्रद्धा कोते, प्रणाली कांबळे, कार्तिक पांगारकर यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा