संपादक =ज्ञानेश्वर जोरे/ शिर्डी आणि राहता परिसरातील ताज्या बातम्या त्वरित पाहण्यासाठी ब्लॉगर वर नक्की भेट द्या
सोमवार, २९ जून, २०२६
श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये ऑगस्ट २०२६ सत्राकरीता प्रवेश सुरू श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डा संचालित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी या संस्थेमध्ये ऑगस्ट - २०२६ सत्राकरीता प्रवेश देणे सुरू आहे. या संस्थेमध्ये वेगवेगळया ११ व्यवसायांच्या २१ व्यवसाय तुकडयामध्ये प्रशिक्षण दिले जाते. ऑगस्ट - २०२६ सत्राकरीता प्रवेश क्षमता २८० इतकी आहे. सन १९८४ साली संस्थेची स्थापना झालेली आहे. या संस्थेमधील सर्व व्यवसायांना डीजीटी, नवी दिल्ली यांचे कायमस्वरूपी संलग्नता आहे. सर्व व्यवसायांमध्ये अत्याधुनिक मशिनरीवर अभ्यास क्रमानुसार १००% प्रशिक्षण दिले जाते. याकामी असणारे सर्व प्रशिक्षक हे अनुभवी व उच्च विद्याविभूषित आहेत. सर्व प्रवेश प्रक्रिया ही संस्थेतील १००% प्रवेश क्षमतेच्या जागांवार महाराष्ट्र शासनाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेने Online गुणवत्तेनूसार भरल्या जातात याकामी शासनाच्या नियमानुसार अत्यंत माफक प्रशिक्षण शुल्क आकारले जाते. सन २०२६ मध्ये या संस्थेत इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक मोटर व्हेईकल, टूल अॅण्ड डायमेकर, मशिनिस्ट ग्राईंडर, टर्नर, फिटर, रेफ्रीजरेशन अॅण्ड एसी मेकॅनिक, इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेन्टेंनन्स, वेल्डर, मेकॅनिक ट्रॅक्टर, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट या व्यवसायासाठी प्रवेश चालू आहेत. या संस्थेची उत्कृष्ठ निकालाची परंपरा असुन संस्थेमधील सात प्रशिक्षणार्थी आजपर्यंत देशात प्रथम आलेले आहेत व २३ प्रशिक्षणार्थी राज्यात प्रथम आलेले आहेत. संस्थेला केंद्र शासनाच्या सात वेळा वेगवेगळया ट्रेडमध्ये सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार मिळालेले आहेत. प्रशिक्षण पुर्ण होण्याच्या अगोदरच संस्थेतील प्रशिक्षणार्थ्याची वेगवेगळया नामांकित कंपन्यामध्ये Campus Interview चे आयोजन करून शिकाऊ ऊमेदवारी / नोकरीसाठी निवड केली जाते. यावर्षी सर्व व्यवसायातील ३८ प्रशिक्षणार्थींची लॉरीट्झ नुडसेन इलेक्ट्रिकल अॅण्ड ऑटोमेशन , अहिल्यानगर या कंपनीत व ४० प्रशिक्षणार्थी मॅशिओ गॅस पारडो इं.प्रा.लि.रांजणगाव या कंपनीत तसेच ८९ प्रशिक्षणार्थी टाटा मोटर्स, पुणे या कंपनीत शिकाऊ उमेदवारीसाठी निवड झालेली आहे तसेच काही प्रशिक्षणार्थी प्रतीक्षा यादीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या वेगवेगळया शिष्यवृत्ती याजेनांचा लाभ संस्थेतील प्रवेशीत प्रशिक्षणार्थ्यांना मिळण्यासाठी संस्थेकडुन मार्गदर्शन केले जाते. यांचा लाभ संस्थेतील बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांना होतो. श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणारे बरेचसे प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील व आर्थिक दुर्बल घटकातील असल्यामुळे संस्थानने विनामुल्य जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग संस्थेत सुरु केलेला आहे व याकामी जर्मन भाषा प्रशिक्षकाची नियुक्ती करणेत आलेली आहे. या सत्राकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असुन दि. २१ मे२०२६ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मदत व मार्गदर्शन केंद्र सुरू करणेत आलेले आहे. सर्व व्यवसायांसाठी १० वी उत्तीर्ण व Welder या व्यवसायासाठी १० वी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता आहे. तरी जास्तीत जास्त विदयार्थ्यानी प्रवेश अर्ज भरून ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से., यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्राचार्य, श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिर्डी ( फोन नं. ०२४२३ - २५८८५८) यांचेशी संपर्क साधावा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Featured post
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील
सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील सा...
-
राहता शहरातील वेशीपासून ते पिंपळाच्या झाडापर्यंत पिंपळाच्या झाडापासून ते सावता मंदिरापर्यंत गळवंती मार्ग रस्त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारास पाच...
-
रेशीमगाठी वधू-वर व समुपदेशन मेळावा 2026 उत्साह मध्ये संपन्न रविवार, दिनांक 18/01/2026 रोजी पुणे येथे महाराष्ट्र परीट धोबी सेवा म...
-
लोणी गणपती बाप्पा आला या नवीन गाण्याचे शूटिंग लोणी वरद विनायक मंदिर परिसरात करण्यात आले शूटिंग चे उद्घाटन शुभारंभ ह भ प महंत उद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा