बुधवार, २६ मार्च, २०२५

गोरगरीब लोकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी दिले.

गोरगरीब लोकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी दिले.

 शिर्डी-

शिर्डी  येथील निमगाव शिवारातील 60-70 वर्षापासून वास्तव्यांस असलेली दलित बांधवांची 500 हुन अधिक घरे काही कारण नसताना बुल्डोजरच्या सहाय्याने जमीनदोस्त करून त्यांना बेघर करण्यात आले. गरीबांची घरे पाडल्यानंतर तेथील दृश्य मन हेलावणारे होते. तरी त्यांचे सरकारी जागेत घरकुले बांधून देवुन या गोरगरीब लोकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुंबई येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी दिले.

       शिर्डी येथील निमगाव शिवारातील 60-70 वर्षापासून वास्तव्यांस असलेली दलित बांधवांची 500 हुन अधिक घरे अतिक्रमणाच्या नावाखाली जमीनदोस्त करण्यात आली. वास्तविक तेथे    राहणा-या नागरीकांच्या दोन-दोन पिढ्या त्या ठिकाणी गेल्या आहेत. ते त्या ठिकाणचे कायमचे रहिवासी झालेले होते. अतिक्रमण निघाले त्या ठिकाणी या रहिवासांचा इरिगेशनची चारी असेलरस्ता असेल किंवा इतर कुठल्याही वाहतुकीस अडथळा होत नसताना कारवाई झाली आहे. तेथील महिलांच्या यातना व घरे भुईसपाट केलेले दृष्य पाहून काळीज हेलावुन गेले. तेथील प्रत्येक कुटुंबाची एक वेगळीच व्यथा होती. कोणाच्या घरी दोन दिवसाची बाळंतीन महिला होती तर कोणाच्या घरात आजारपणाने खाटावर झोपलेले वृद्ध होते. अशातच बुलडोजर येईल व आपली घरे उद्ध्वस्त करून जाईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. तेथील प्रत्येक कुटुंब हे शासनाला घरपट्टी ,पाणी पट्टी, लाईटबील असे कर भरत होते, प्रत्येक घराला मिळकत नंबर होता. काहींनी शासकीय योजनेचा लाभ घेवुन घरे बांधली होती. कोणी घर देत का घर अशी या लोकांची अवस्था झाली आहे. मोलमजुरी करुन प्रपंच चालविणारे ही सर्व लोक आहेत.

        तरी या गोरगरीब कुटुंबांचे सरकारी जागेत घरकुले बांधून देवुन या गोरगरीब लोकांचे तात्काळ पुनर्वसन करावे अशा मागणीचे निवेदन भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी महसुल मंत्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले.

चौकट-

        राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे भेट घेवुन दलित बांधवांवर झालेल्या अन्यायाबद्दल माहिती दिली. यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच तेथील नागरीकांना सरकारी जागेत घरे बांधून त्यांचे पुनर्वसन करु असे आश्नासन दिले.
-डॉ.राजेंद्र पिपाडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...