गुरुवार, २० जून, २०२४

श्री साईबाबा संस्थान शिर्डी व शिर्डी परिसरा च्या वतीने शिर्डी ते पंढरपूर साईबाबा पालखीचे दोन जुलै ला प्रस्थान

श्री साईबाबा संस्थान शिर्डी व शिर्डी परिसरा च्या वतीने शिर्डी ते पंढरपूर साईबाबा पालखीचे दोन जुलै ला प्रस्थान

शिर्डी प्रतिनिधी :


श्री साईबाबा संस्थान शिर्डी व शिर्डी परिसराच्यावतीने शिर्डी ते पंढरपूर साईबाबा पालखीचे दोन जुलै रोजी दुपारी एक वाजता प्रस्थान.ॄंं़ गेली सतरा वर्ष पासून श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांनी सुरू केलेली शिर्डी ते पंढरपूर पायी. पालखी सोहळा आजही अखंडपणे चालू आहे. हा एकमेव सोहळा भव्य दिव्य करण्यासाठी श्री साई संस्थान व साईबाबा पालखी सोहळा समिती व शिर्डी ग्रामस्थ व भाविक भक्तांच्या सहकार्याने श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीकानंद जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने दिनांक 2 जुलै 24 रोजी दुपारी एक वाजता साईबाबा शताब्दी मंडप 16 गुंठे येथून साईबाबांचे दर्शन घेऊन व मान्यवराच्या. हस्ते पूजा करून पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे अशी माहिती श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद महाराज यांनी दिली आहे या सोहळ्याला माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील माननीय खासदार भाऊसाहेब जी वाकचौरे साहेब श्री खासदार सुजय दादा विखे पाटील श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर साहेब व उपकार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवळे साहेब श्री कैलास बापू कोते पाटील प्रथम नगराध्यक्ष श्री रामकृष्ण कुंभारे साहेब शिर्डी पोलीस स्टेशन विजयराव कोते पाटील श्री प्रतापराव जगताप श्री महेंद्र दादा शेळके पाटील श्री राजेंद्र जगताप श्री सचिन कोते श्री विठ्ठलराव पवार साहेब चेअरमन श्री विष्णुपंत थोरात मंदिर प्रमुख व शिर्डी ग्रामस्थ व साधू संतांच्या उपस्थित दुपारी एक वाजता पालखीतील फोटोची पूजा पाद्यपूजा मान्यवरांच्या हस्ते होऊन दुपारी एक वाजता शिर्डी शहरातून पालखीचे प्रस्थान होणार आहे हा सोहळा पंधरा दिवस चालणार आहे पालखी सोहळ्या त हजारो भाविक सहभागी होणार आहे दररोज सकाळी नाष्टा दुपारी जेवण संध्याकाळी जेवण भाविकांना मिळणार आहे या सोहळ्याला शिर्डी ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री 1008 महामंडलेश्वर काशिकानदजी महाराज यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...