बुधवार, १९ जून, २०२४

सावळीविहीर येथे वृक्षारोपण करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

सावळीविहीर येथे वृक्षारोपण करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

सावळीविहीर प्रतिनिधी=

सावळीविहीर येथे वृक्षारोपण करून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा सकाळी नऊ वाजे दरम्यान ग्रामपंचायत तिच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला यामध्ये आंबा नारळ व इतर अशा वृक्षांची रोपे विद्यार्थी पालक व महिला मंडळ महिला मंडळाकडून लावण्यात आले त्यामध्ये शाळेचा परिसर त्याचप्रमाणे जीवन प्राधिकरण परिसरात दोन तळ्याच्या ठिकाणी सदर वृक्षरोपण लावण्यात येणार असल्याचे आणि एकूण पाच हजार वृक्ष लावण्याचा संकल्प याद्वारे ग्रामपंचायतचे सरपंच उमेश जपे यांनी केले असून लवकरच सदर झाडे लावण्यात येणार आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सावळी वीर गावामध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली व झाडे लावा झाडे जगवा हा संदेश पूर्ण गावभर देण्यात आला.
 न्यू इंग्लिश स्कूल शाळा सावळीविहीर येथे विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने स्वागत करून स्वागत केले व इतर अनेक विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकाचे वाटप करण्यात आले यावेळी नामदार साहेबांचया घोषाने परिसरात दणाणला. सदर कार्यक्रमास सरपंच महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे उपसरपंच विकास जपे.माजी सरपंच सोपानराव पवार. गणेश कापसे. राजेंद्र आगलावे पत्रकार राजेंद्र दुनबळे. गणेश आगलावे .संजय जपे. सागर पगारे शांताराम जपे.संतोष गायकवाड.गणेश बनसोडे. अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य तसेच रयत शाळेचे प्राचार्य व शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...