बुधवार, १९ जून, २०२४

योग प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

योग प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
 राहाता=
जागतिक योग दिनानिमित्त राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे आयोजित मोफत तीन दिवसीय योग प्राणायाम शिबिराच्या पहिल्या दिवशी योगसाधकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
प्रारंभी साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी प्रस्तावना करत सूत्रसंचालन केले.राहाता पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पटारे,डॉ.पी.जी.गुंजाळ,योगगुरू सुरेश भिंगारदिवे,राष्ट्रपती पदक प्राप्त सर्जेराव मते,शारदा संकुलाचे प्राचार्य प्रमोद तोरणे,अरुण मोकळ,बालरोग तज्ञ डॉ गोकुळ शिंदे,डॉ अंजली पानगव्हाणे,सुश्मिता चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते श्री साईनाथ महाराजांच्या प्रतिमेला हार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.
योगगुरू सुरेश भिंगारदिवे यांनी शास्त्र शुद्ध व सोप्या पद्धतीने योगासने व प्राणायाम घेवून सर्व योग साधकांना मंत्रमुग्ध केले.शिबिर यशस्वी करण्यासाठी साई योग फाऊंडेशनचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.पहिल्या दिवसाच्या समाप्तीला अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी महिलांच्या सक्षमीकरण साठी योग हे या वर्षीचे जागतिक योगदिनाचे ध्येय असल्याचे नमूद करत महिलांसाठी योग व प्राणायामाचे महत्व सांगितले.शेवटी सर्वांचे आभार मानत पुढील दोन दिवस आपल्या अधिक सहकाऱ्यांना सोबत आणून जास्तीत जास्त फायदा घेण्याचे आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...