मंगळवार, १८ जून, २०२४

श्री ग.र.औताडे पाटील विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

श्री ग.र.औताडे पाटील विद्यालयात प्रवेशोत्सव  साजरा

पोहेगाव :-
  रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग.र. औताडे पाटील विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ ची सुरुवात नवागतांचे गुलाब पुष्प व मिष्ठान्न देवून करण्यात आली . या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस.के.शिंदे यांनी विद्यालयातील शैक्षणिक सुविधा , विद्यार्थी लाभाच्या योजना , गुरुकुल प्रकल्प ,विद्यालयाची वैशिष्ट्ये सांगून विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. 
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.नेहे सी.के. , विद्यालयातील शिक्षक श्री सांगळे, श्री. गोऱ्हे , श्री. दवंगे ,श्री आहिरे , श्री. के.बी.शिंदे ,श्री.गांगुर्डे , श्री.राठोड ,ग्रंथपाल श्री. इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. 
पहिल्याच दिवशी जल्लोषात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्यामुळे नवीन विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. विद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची उज्ज्वल परंपरा , तज्ञ व अभ्यासू अध्यापक वर्ग यामुळे परिसरातील जास्तीत जास्त प्रवेशपात्र विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहन देखील यावेळी मुख्याध्यापक श्री एस.के.शिंदे यांनी केले.
विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख श्री पाटील जी.एम. यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...