शुक्रवार, २१ जून, २०२४

जागतिक योगदिन राहता येथे उत्साहात साजरा

जागतिक योगदिन राहाता येथे उत्साहात साजरा 
राहाता=

राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे आयोजित तीन दिवसीय मोफत योग प्राणायाम शिबिराची सांगता करत जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.योगगुरू सुरेश भिंगरदिवे व सह योगशिक्षक दिपक गाडेकर व भाऊसाहेब बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त व सोप्या पद्धतीने योगासने व प्राणायाम शिकावीण्यात आले.राहाता दिवाणी न्यायालयाच्या वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती आदिती नागोरी,न्यायमूर्ती एस.व्ही खैरे,न्यायमूर्ती ए.एस.देशपांडे,न्यायमूर्ती एस.एस.मुलाणी यांनी प्रात्येक्षिक करून सक्रिय सहभाग नोंदविला.
पहाटे मान्यवरांच्या हस्ते साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करण्यात आले.पहाटे५.३० ते ६.४५ वाजेपर्यंत योग प्राणायाम करून सांगता कार्यक्रम सुरू करण्यात आला.
साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले.मान्यवरांना फेटे बांधून श्रीसाई शाल देवून सन्मानित करण्यात आले.न्यायाधीश एस. व्ही.खैरे यांनी जागतिक योग दिनाचे महत्व विषद केले.तसेच भौतिक सुखाच्या मागे लागत आपण आपले स्वस्थ बिघडवत आहोत.शरीर स्वस्थ राहण्यासाठी साईयोग फाउंडेशन गेली अनेक वर्षे रोज मोफत योग वर्ग घेत असल्याचे नमूद करत सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी करत असलेले कार्य विविध सामाजिक उपक्रमात मी स्वतः सहभागी होवून अनुभवले असल्याचे सांगत पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. कैलास सदाफळ,बाल शिवव्याख्याता साईशा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करतांना साईयोग फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे यांनी मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्य अविरत चालू ठेवण्यासाठी फाऊंडेशनचे सर्व सदस्य,विविध सामाजिक संघटनेचे सदस्य,राहाता नगरपालिका व विशेष करून पत्रकार व मीडिया बंधूंचे अनमोल सहकार मिळत असल्याचे नमूद करत निसर्ग संवर्धनासाठी एक जुलै पासून सुरू होणाऱ्या वृक्षरोपन सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन केले.शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे आभार मानले.
या शिबिरात राहाता वैद्यकीय क्षेत्रातील गुरूवर्य पी.जी.गुंजाळ, सर्जेराव मते, संजय सदाफळ, ॲड दत्तात्रय धनवटे,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भानुदास गाडेकर,अरुण मोकळ,ॲड गोरखनाथ दंडवते,विलास वाळेकर,भारत दवंगे,मिलिंद बनकर,व्यंकटेश अहिरे,मनोज पिपाडा,अरविंद बावके,प्रविण डुंगवाल,विठ्ठल निर्मळ,दिपक दंडवते,बबलू फटांगरे,म्हसू पाटील सदाफळ,नामदेव गवते,सिताराम बावके,अनिल सातव,संजय वाघमारे,रविंद्र धस,दास कुंभकर्ण,रावसाहेब गाढवे,उमेश लुटे,सुभाष दंडवते,नारायण गाडेकर,अशोक वाघ,पांडुरंग गायकवाड,शिवाजी पोटे,संतोष बावके,विशाल सोनवणे,अंकुश गांधी,रंगनाथ सदाफळ,परमेष चव्हाण,अर्जुन चव्हाण,नारायण गाडेकर ,प्रविण वाकचौरे,ज्ञानेश्वर शेटे,ऋषी आहेर,विष्णू गाडेकर,प्रणव लावर,अनिल कुंभकर्ण,साई कुंभकर्ण,सागर माळवे,सुनील मोमले,दिगंबर भुजबळ,नकुल लोहकणे,शिवनाथ बनकर,डॉ.अंजली पानगव्हाणे,ज्योती सोनवणे,पुष्पा सदाफळ,आशा पिपाडा,अरूणा डुंगरवाल,सुश्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,सिंधुबई वाकचौरे,रुपाली पिपाडा,वैष्णवी पिपाडा इत्यादी शंभर पेक्षा जास्त मान्यवर सहभागी झाले होते.शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...