लोक सहभागा तुन मनसंधारण ते जलसंधारण
राहाता प्रतिनिधी -
पुणतांबा येथे मिशन 500कोटी लिटर जलसाठा जळगाव यांच्या माध्यमातून अध्यक्ष EWT -MSCDA मुंबई या ग्रुप माध्यमातून च्या कामासाठी 200तास पोकलेन मशीन चे उपलब्ध झाले असून सदर कामाची पाहणी करण्यासाठी प्रथम लोकनियुक्त सरपंच तथा शेतकरी नेते डॉ.धनंजय धनवटे, छगनराव जोगदंड राज्य सचिव सामाजिक न्याय विभाग, ग्रामपंचायत सदस्य भुषण वाघ, पुरषोत्तम जेजुरकर, नामदेव गायकवाड,रवी जेजुरकर,पाराजी वरखड,विनोद धनवटे, सागर जोगदंड, संजय जोगदंड यांनी कामाची पाहणी केली लोकसहभागातून पोकलेन मशीन डिझेल खर्च करावयाचा असुन सदर डेरा नाल्यातील दोन मीटर गाळ काढून पन्नास फुट रूंदीकरण केल्यास अतिरिक्त पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून तसेच गोदावरी नदीचा केटीवेअर बंधारा अडविल्या नंतर बॅक वाॅटर रिटर्न येवुन पुणतांबा गावांतील ग्रामस्थांच्या बंद पडलेल्या विहिरी, बोअरवेल/कुपनलिका, पुरातन बारवं यांची पाणी पातळी वाढेल व गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल ग्रामस्थांच्या सहकार्यातून पुणतांबा गावातील एक चांगले जलसंधारणाचे सामाजिक कार्य होत आता पर्यंत तीन किलो मीटर काम पूर्ण झाले असून मिशन 500 अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न चालू आहेत, वृक्षारोपण, सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन, पानंद रस्ते, सिमेंट बंधारे,नाला खोलीकरण व रुंदीकरण असे उपक्रम पाच वर्षे पुणतांबा गावांमध्ये राबविण्यात येणार असून या कामासाठी डॉ. उज्ज्वल कुमार चव्हाण, शेखर निंबाळकर,भिला पाटील, विशाल सोनकुळ, राजेंद्रसिंह पाटील यांच्या सहकार्याने पुणतांबा येथे नाल्यातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण करण्याच्या काम चालू आहे, बाळासाहेब पेटकर यांच्या बांधालगत डेरा नाला ते पुणतांबा कोपरगाव रोड पर्यत साधारणपणे अडीच किलो मीटर नाला खोलीकरणाचे काम सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून 200तास पोकलेन मशीन व ग्रामस्थ लोकसहभागातून डिझेल खर्च करून करण्यात आले तसेच EWT - MSCDA या या संस्थेच्या सीएसआर माध्यमातून200 तास पोकलेन मशीन उपलब्ध झाले असून पुणतांबा कोपरगाव रोड पर्यत साधारणपणे 727मीटर लांब व पन्नास रुंद, दोन मीटर खोल गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरणाचे काम ग्रामस्थांच्या लोकसहभागातून डिझेल खर्च करून पुणतांबा येथे काम चालू आहे चालू आहे, सदर कामा पुणतांबा गावातील पिण्याच्या पाण्याची खोलवर गेलेली पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होईल व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लागेल, नाल्यातील गाळ काढून खोलीकरण व रुंदीकरण केल्याने पाणी अडविण्याची क्षमता वाढणार आहे, त्या मुळे पुणतांबा गावाला पुरा च्या पाण्याचा धोका कमी होईल, असे डॉक्टर धनंजय धनवटे यांनी सांगितले
एकुण या कामामुळे पुणतांबा गावातील व परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ हे समाधानी असुन *1959 साली* अतिरिक्त पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुणतांबा येथील पाटबंधारे विभागाने सदर नाला तयार केले आहेत परंतु त्या नंतर आजतागायत त्याचं काम झालेले नव्हते.मिशन 500 च्या माध्यमातून व लोकसहभागातून असे काम चालू असल्याने गावकरी समाधान व्यक्त करीत आहेत असे विनोद धनवटे यांनी सांगितले व उपस्थितांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा