रविवार, २३ जून, २०२४

दूध दरवाढीसाठी आंदोलन करन्यात येणार

दूध दरवाढीसाठी आंदोलन करन्यात येणार 

राहाता प्रतिनिधी =
  शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने दुधाला ४० रुपये प्रती लिटर भाव मिळावा यासाठी २५ जून रोजी हरेगाव फाटा, श्रीरामपूर येथे करण्यात येणाऱ्या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे राहाता तालुकाध्यक्ष ऍड. पंकज लोंढे यांनी वाकडी येथील बैठकीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. अजित काळे यांना पाठिंबाचे पत्र देवून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके, राहाता तालुका किसान काँग्रेसचे गणेश चोळके, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र लहारे, मच्छिंद्र शेळके, शिवसेनेचे भास्कर मोटकर, दूध उत्पादक शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी ऍड. पंकज लोंढे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून दुधाचे दर २२-२३ रुपये लिटरवर आलेले आहेत. चालू वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने असतानाही सरकारने कोठेही चारा डेपो व चारा छावण्या चालू केलेल्या दिसत नाहीत. दूध व्यवसायावर अनेक शेतकरी व शेतमजुरांचे पोट अवलंबून आहे. दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना व्यवसाय परवडत नाही. दुग्ध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दूध दरवाढ व्हावी यासाठी काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत. शासकीय कार्यालयात निवेदने दिलेली आहेत. परंतु त्याचा कोणताही परिणाम झाला नाही व त्यांनी दूध दरवाढीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे दूध व्यावसायिकांच्या मनात या सरकारविरुद्ध प्रचंड राग असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत दाखवला असे ऍड. पंकज लोंढे म्हणाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...