रविवार, २३ जून, २०२४

अहमदनगर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईला सुरुवात : अभिजीत पोटे

अहमदनगर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांवर जप्तीच्या कारवाईला सुरुवात : अभिजीत पोटे


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
  

२७ मे रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाचा ताबा घेऊन ठिय्या आणि मुक्काम आंदोलन केले होते त्यावर प्रादेशिक उपसंचालक यांनी संबंधित साखर कारखान्यांवर ऊस नियंत्रण कायदा १९६६ कलम ३ थकीत एफ आर पी कायद्या नुसार शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल व त्यावरील व्याज थकवणाऱ्या साखर कारखान्यांचे आर आर सी (जप्ती) प्रस्ताव साखर आयुक्तांना पाठवण्याचे लेखी पत्र दिले होते त्यावर कारवाई करत प्रादेशिक उपसंचालक साखर अहमदनगर शुभांगी गोड यांनी १८ जून रोजी पैसे थकवणारे ४ साखर कारखाने
कुकडी सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा , अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पाथर्डी, गंगामाई साखर कारखाना शेवगाव या कारखान्यावर साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयास १८ जून रोजी ऊस नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम ३ अन्वये म्हणजेच थकीत एफ आर पी कायद्यानुसार आर आर सी (जप्ती)  कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे ११ जून रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी पाठवलेल्या निवेदन पत्रानुसार पुढील कारवाईचा प्रस्ताव पाठवून पोटे यांना केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठवण्यात आलेला आहे


माझ्या शेतकऱ्यांना त्रास दिला तर सोडणार नाही
RRC म्हणजे "जप्ती" कारवाई ही तर सुरुवात आहे 
ऊस उत्पादक शेतकरी मित्रांनो एकत्रित या लढाई अजून संपली नाही ऊस नियंत्रण कायद्या नुसार (ऊस पंधरवाडा कायद्यानुसार) उशिरा होणाऱ्या ऊस बिलाचे 18 टक्के व्याज अजून बाकी आहे
आम्ही बोलत नाही करून दाखवतो 
 =
शेतकरी मित्र
अभिजीत अशोकराव पोटे
जिल्हाप्रमुख
प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...