मंगळवार, २५ जून, २०२४

व्ही.पी.एस चे विद्यार्थी गिरवतात लोकशाहीचे धडे

व्ही.पी.एस चे विद्यार्थी गिरवतात लोकशाहीचे धडे

शिर्डी प्रतिनिधी : 

विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूलमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. व्ही.पी.एस हायस्कूल मध्ये नेहमीच नवनवीन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना नवीन गोष्टीचा अनुभव दिला जातो. अशाच नवीन उपक्रमाने यावर्षीही शाळेची सुरुवात करण्यात आली.
नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर वर्गामध्ये वर्ग प्रतिनिधीची निवड केली जाते. याच धरतीवर लोकशाही पद्धतीने वर्ग प्रतिनिधी निवडण्याचे ठरवून इयत्ता सहावी तुकडी 'अ' वर्गाचे वर्गशिक्षक श्री. संजय पालवे यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला.

प्रथम आदल्या दिवशी वर्गामध्ये वर्ग प्रतिनिधी निवडण्याची कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वर्ग प्रतिनिधी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्यात आले. विद्यार्थ्यांना सर्व निवडणूक प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. आणि मग उमेदवारांना प्रचार करण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आला. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

वर्गातीलच इच्छुक विद्यार्थ्यांना तनुजा वाघ (केंद्राध्यक्ष), की. काव्या जायगुडे (मतदान अधिकारी एक), कु. कार्तिकी कोकरे ( मतदान अधिकारी दोन), आणि कु. वैष्णवी गायकवाड (मतदान अधिकारी तीन) जागेवर नियुक्त करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या पदाची जबाबदारी समजून सांगण्यात आली. मतदान करण्यासाठी मतदान कक्ष, मतदान पेटी, मतदान चिठ्या आणि बोटाला शाई लावण्याची व्यवस्था करण्यात आली.

वर्गशिक्षक श्री. संजय पालवे यांनी सूक्ष्म निरीक्षकाची भूमिका पार पाडली. तसेच सेक्टर ऑफिसर म्हणून श्री. वैभव सूर्यवंशी तर मतमोजणी अधिकारी म्हणून श्री. शिवकुमार दहिफळे यांनी जबाबदारी पार पाडली. सर्व निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण श्री. मोहनराव ढाणे यांनी केले.

वर्गातील या उपक्रमाचे नियमक मंडळ सदस्य तसेच शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, पर्यवेक्षिका श्रीम.क्षमा देशपांडे, शिक्षक प्रतिनिधी श्री. अनिल खामकर, प्रशालेचे मुख्य लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर यांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...