बुधवार, २६ जून, २०२४

योगेश कोठावदे ठरले नवनिर्वाचित अध्यक्ष

योगेश कोठावदे ठरले नवनिर्वाचित अध्यक्ष

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
  

लोणावळा शालेय सहकारी कर्मचारी पतसंस्था मर्यादित लोणावळ्याची 46 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रकाश हॉलमध्ये पार पडली. उपस्थित संचालका मधूनच श्री. योगेश कोठावदे (व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा) यांची 2024-25 आर्थिक वर्षासाठी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.
सभासदांच्या हितासाठी लोणावळा परिसरातील विविध शाळेमधील 264 शिक्षकांनी एकत्र येऊन आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, शुद्ध हेतूने सभासदांच्या हितासाठी पतसंस्थेची स्थापना केली. आज तिचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला.

सन 1978 रोजी श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी सहकाऱ्यांना बरोबर घेऊन सुरुवात केलेल्या पतसंस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे. पतसंस्था ही नेहमीच सभासदांचे हित जपण्याच्या प्रयत्नात असते. मागील आर्थिक वर्षांमध्ये एकूण भाग भांडवलावर 9.70% इतका लाभांश देण्यास संचालकांना यश मिळाले.

दरवर्षीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नती प्राप्त कर्मचारी यांचा सन्मान केला जातो. याही वर्षी अशाच प्रकारचा सन्मान बहुतांश सभासदांचा पतसंस्थेकडून करण्यात आला.

नवनिर्वाचित निवड झालेल्या सभासदांमध्ये श्री. योगेश कोठावदे (अध्यक्ष), श्रीम. मंजुश्री इकारी (उपाध्यक्ष), श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर (सचिव) तर श्री. रवींद्र दंडगव्हाळ (खजिनदार) यांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित माजी अध्यक्ष श्री. विठ्ठल खेडकर, श्री.

प्रकाश पाटील, श्री. महेश चोणगे, श्री. संतोष ठाकूर, श्री. आदिनाथ दहिफळे, श्री. कुंडलिक आंबेकर आणि श्री. बाळू पिंगट, श्रीम. सायली आपटे, श्री. निलेश ढाकोळ (कनिष्ठ लिपिक), आणि श्री. मुकुंद जगताप (सेवक)

उपस्थित होते. प्रसंगी माजी अध्यक्ष यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगता मधून त्यांनी सर्व सभासदांचे त्यांना मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्री. खेडकर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी पतसंस्थेला शाळेतील प्रकाश हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांचे विशेष आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार श्री. आदिनाथ दहिफळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन   राहाता  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे प...