लायन्स क्लब राहता अध्यक्ष पदी लायन इंजि. प्रकाश सदाफळ
राहाता प्रतिनिधी=
दिनांक 25 जून 2024 रोजी राहाता लायन्स क्लब ची सर्वसाधारण सभा लायन्स क्लब राहता अध्यक्षा सौ.अंजली उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सर्वप्रथम ला. डॉ.संजय गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत केले. व लायन्स क्लब साठी आरोग्य विषयक जनजागृती व आरोग्य शिबीर घेवून गरीब लोकांची लायन्स क्लब मार्फत सेवा करण्याचा मनोदय बोलून दाखवला
उपाध्यक्ष ला. इंजी. प्रकाश सदाफळ यांनी लायन्स क्लब मधील मागील वर्षाच्या कामकाज बाबत माहिती दिली. ला.ऍड. संतोष घोडके यांनी लायन्स बाबत चर्चा व पुढील काळात मी जास्तीत जास्त सभासद करणार म्हणून सांगितले.
ऍड. गोरखतात्या दंडवते यांनी लायन्स क्लब ने खूप छान काम केले व या पुढे सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे व सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले
अध्यक्षा सौ.अंजली उबाळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्वांचे मनापासून आभार मानले व सर्वांनी सहकार्य केले म्हणून आपला क्लब ने 32 ॲक्टिव्हिटी केल्या व डिस्ट्रिक्ट मध्ये लायन्स क्लब चे नाव उत्तम प्रकारे present zale त्यामुळे रिजन मध्ये आपल्या क्लब्ला सर्वात जास्त पारितोषिके मिळाली
लायन सुधीरजी दागा रिजन चेअरमन, डॉ.संदीप गोंदकर झोन चेअरमन यांनी वर्षभर खूप मोलाचे सहकार्य केले,त्यामुळेच आम्ही चांगले काम करू शकलो,
या नवीन कार्यकारिणीला सर्वांनी सहकार्य करावे असे म्हटले,
सर्वानुमते 2024-2025 ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
लायन्स क्लब राहता चे अडमिनिस्ट्रेटर तथा डिस्ट्रिक्ट चैअरमन डॉ.संजय उबाळे यांनी सर्वांना दिलेल्या पदाची कर्तव्य व जबाबदारी या बाबत व लायन्स इंटरनॅशनल बाबत सविस्तर माहिती दिली
लायन्स क्लब राहता 2024-25 ची कार्यकारिणी खालील प्रमाणे सर्वानुमते करण्यात आली व मान्यता देण्यात आली
प्रेसिडेंट ला इंजिनियर प्रकाश सदाफळ
सेक्रेटरी लायन अडवोकेट दिनेश कारले
ट्रेझरर लायन व्यंकटेश अहिरे
फर्स्ट वाईस प्रेसिडेंट लायन डॉक्टर संजय गायकवाड
व्हाईस प्रेसिडेंट लायन सचिन मुरादे
व्हाईस प्रेसिडेंट लायन राजेंद्र बांगर
एमिजियाट पास्त प्रेसिडेंट लायन्स अंजली उबाळे
एलसीआयएफ कॉर्डिनेटर लायन दीपक दंडवते
ऍडमिनिस्ट्रेटर डॉक्टर संजय उबाळे
पीआरओ लायन गोरख तात्या दंडवते
क्लब सर्विस चेअरमन लायन रतन चौधरी
मेंबरशिप चेअरमन लायन विजय धनवटे
जीएसटी चेएरपर्सन लायन डॉक्टर प्रज्ञा गायकवाड
क्लब लीडरशिप चेअरमन ला.सो अर्चना दंडवते
क्लब मार्केटिंग चेअरमन लायन ऍडव्होकेट संतोष घोडके
टेल्टविस्टर लायन स्मिता मुरादे
टेमर ला.आसावरी बेंद्रे
पब्लिसिटी लायन किरण वाबळे, लायन सागर सोमवंशी
डायरेक्टर
लायन डॉ .बापूसाहेब पानगव्हाणे, लायन दसरथ तुपे, लायन सौ.विद्या चौधरी, लायन लता जाधव
वरील प्रमाणे 2024 25 साठी लायन्स क्लब राहताची कार्यकारणी करण्यात आली
लाइन्स क्लब राहता यांच्या वतीने मागील वर्षात अनेक समाज उपयोगी कामे करण्यात आली गरीब व गरजू मुलांना मदत करणे ,कॅन्सर निदान व रक्त तपासणी शिबिर, डेंटल क्लिनिक ,सायकल बँक, वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान, गरीब मुलींना कपडे वाटप अशा अनेक सामाजिक कामे केल्यामुळे राहता क्लब नेहमीच समाजामध्ये एक आदर्श क्लब म्हणून गणला जातो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा