शुक्रवार, ९ मे, २०२५

अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्या चे डांबरीकरण ऐवजी काँक्रिटीकरण होऊन राहता शिर्डी शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर उड्डाणपूल करण्यात यावा या मागणीचे निवेदन भाजप नेते डॉ राजेंद्र पिपाडा यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना शिर्डी विमानतळ येथे दिले

राहता

         अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी कॉंक्रीटीकरण होवुन राहाता शिर्डी शहरातुन  जाणा-या रस्त्यावर उड्डाणपुल कऱणेत यावा या मागणीचे निवेदन भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीनजी गडकरी यांना शिर्डी विमानतळ येथे दिले. 
      दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,गेल्या 40 वर्षापासुन नगर शिर्डी या महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असुन असंख्य बळी जात आहे. उत्तर दक्षिण भारतातुन शिर्डीत येणा-या भाविकांना व सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे. जागोजागी रस्ते अर्धवट खोदुन ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत असुन खोदलेले रस्ते तात्काळ बुजवले नाही तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होवुन निराप्राध लोकांचे बळी जाणार असल्याची शक्यता आहे. रस्ते खोदुन ठेवल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. रस्त्याच्या बाजुला बांघकाम साहित्य आहे यामुळे 2-3 तास एकाच ठिकाणी वाहतूक ठप्प होवुन जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात संतापाची तीव्र भावना आहे. अर्धवट कामामुळे रस्त्याची अत्यंत भिषण अवस्था झालेली असुन वाहन चालवणे अवघड झाले आहे हा रस्ता नसुन जणु मृत्युचा सापळाच बनला आहे. या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
           


  सर्वाधिक अवजड वाहनांची वर्दळ  असणा-या या महामार्गावर लहान मोठी वाहने दुचाकी स्वारांना अक्षरश: जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. केवळ खड्ड्यांमळे फार लोकांचे प्राण या रस्त्यावर गेले आहेत. शिर्डी नगर जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतुक असलेला शिर्डी-नगर हा एकमेव महामार्ग आहे. रस्ताला जागोजागी ठिगळ देवुन डागडुजी केली आहे. वाहने आदळुन किंवा खड्डे चुकविताना अपघात प्रवाशांचे हाडे खिळखिळी होत आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहने नादुरुस्त होवुन वाहतूकीचा खोळंबा होतो. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थ क्षेत्र आहे. ज्या लोकांना शिर्डीमध्ये न थांबता पुढे जायचे आहे त्याकरीता पिंपरीनिर्मळ पासुन शिर्डी राहाता शहरातुन निमगाव -निघोज  पर्यंत उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना भक्तांना होणारा त्रास कमी होईल.तसेच शिर्डी राहाता शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल तरी याबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...