रयत शिक्षण संस्थेचे श्री गणेश विद्यालय गणेशनगरचे जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश
आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक या शाळेत स्वर्गीय माधवराव खर्डे पाटील स्मृती प्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये श्री गणेश विद्यालय गणेशनगरची विद्यार्थिनी कुमारी गौरी किरण घोगळ इयत्ता आठवी या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
या विद्यार्थिनीचे स्कूल कमिटीचे सदस्य रावसाहेब गाढवे पाटील, गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील, दादासाहेब गाढवे पाटील, अण्णासाहेब कोते पाटील, संदीप भाऊ गाढवे पाटील, जयभाऊ कालेशेठ,विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय वसावे के.के.सर परिसरातील सर्व शिक्षणप्रेमी यांनी व सर्व शिक्षकांनी गौरीचे व पालकांचे विशेष अभिनंदन केले.
या विद्यार्थिनीला विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा