शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

गोदावरी कालव्यांना मंजूर असलेले पाणी पूर्ववत देऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी एरिगेशनद्वारे ठोस उपाययोजना कराव्यात. ......विवेक कोल्हे

राहाता (वार्ताहर) सन 2011-12 पासून जलसंपदा विभागाने गोदावरी कालवे लाभ क्षेत्रातील ब्लॉकला मुदतवाढ दिलेली नाही. ते स्थगित ठेवलेले आहे. चालू वर्षी जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे व वैतरणा सॅडल गेटचे काम प्रगतीपथावर आहे. शासनाने पश्चिमेकडे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात ओळखण्यासाठी तरतूद केलेली आहे त्यामुळे चालू हंगामापासून ब्लॉकवरची स्थगिती  उठून सर्व ब्लॉक पूर्वत चालू करावे जेणेकरून शेतीसाठी शाश्वत पाणीपुरवठा होऊ शकेल अशी मागणी गणेश साखर कारखान्याचे मार्गदर्शक, युवा नेते विवेक कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले आहे 

पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, पाटबंधारे खात्याने खरीप हंगामात बारमाही गोदावरी कालव्यांना मंजूर असलेले पाणी पूर्ववत देऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मायनर एरिगेशनद्वारे ठोस उपाययोजना कराव्यात.ऊर्ध्व गोदावरी खोरे हे अति तुटीची असून त्यात पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वळविण्याच्या कामाला माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी सन 2000 मध्ये मंजुरी घेतली असून त्यावर सध्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड अंतर्गत कामाला सुरुवात देखील केली आहे. हे काम युद्ध पातळीवर व्हावी यासाठी पुरेशा प्रमाणात आर्थिक निधीची उपलब्धता व्हावी व ब्लॉक पुनर्जीवित करावे असेही त्यांनी म्हटले आहे 
याबाबत कोल्हे यांनी पुढे म्हणाले की, जायकवाडी धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यापासून गेल्या पन्नास वर्षात फक्त चौदा वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. म्हणजेच या धरणाची विश्वासार्हता 30 टक्क्यांपेक्षा कमी आहे. मागील अनुभव लक्षात घेता वाढत्या भविष्यात पर्यावरणीय प्रदूषणामुळे पर्जन्यमान दिवसेंदिवस कमी कमी होत आहे त्यामुळे घाटमाथ्यावरील समुद्राला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याचे काटेकोर नियोजन करावे जेणेकरून भविष्यात शेती व पिण्याच्या पाण्यासाठी बारमाही गोदावरी कालव्यांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही व ब्लॉक देखील चालू राहतील तेव्हा बारमाही गोदावरी कालवे लाभ लाभधारक शेतकऱ्यांसह लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी वरील उपाय योजना तात्काळ अमलात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे 

तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पाण्याची समृद्धी व्हावी व गोदावरी कालव्यांना कमी पडणारे 11 टीएमसी पाणी पूर्ववत निर्माण व्हावी यासाठी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी आळंदी, पालखेड, वाघाड, कश्यपी, वालदेवी, गौतमी गोदावरी, भाम, भावली तसेच मुकणे धरणाची उंची वाढ ही कामे प्राधान्याने पूर्ण करून वाढत्या औद्योगिक व नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळविले. मात्र 2005  समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्याने 2012 पासून बारमाही गोदावरी कालव्यांना त्याच्या झळा बसण्यास सुरुवात झाली. त्याच्या आधीपासून व समन्यायी कायद्यानंतर माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी हक्काच्या पाट पाण्यासाठी रस्त्यावर येत स्वतःच्या शासनाविरुद्ध अनेक आंदोलने केली. सर्व पक्षीय नेत्यांनी नगर नाशिक विरुद्ध मराठवाडा असा प्रादेशिक वाद निर्माण न करता पाण्यासाठी सर्वांनी एका झेंड्याखाली यावे असे आवाहनही अनेक वेळा केलेले आहे असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...