बिहार राज्य येथील मा. ना.श्री.मंगल पांढेजी आरोग्यमंत्री शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते,त्यांचा सत्कार इंडिया लॅबोरेटरी ऑफिसर असोसिएशन चे राज्याध्यक्ष डॉ.संजय उबाळे व टीम यांनी केला
बिहार येथील आरोग्यमंत्री यांचा शिर्डी येथे सत्कार अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माननीय नामदार श्री मंगलजी पांडे यांचा सत्कार अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय उबाळे व त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी केला
दिल्लीत होणाऱ्या कॉन्फरन्स साठी 20 व 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले महाराष्ट्रातील व बिहार मधील प्रयोग शाळेसाठी असणाऱ्या सोयी सुविधा व इतर बाबीवर चर्चा करण्यात आली. सन्माननीय मंत्री यांनी ऑल इंडिया संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आपुलकीने चौकशी करून विचारपूस केली त्याबद्दल ऑल इंडिया संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे
या प्रसंगी अखिल भारतीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संघटनेचे सरसचिव माननीय देवेंद्र प्रसादजी, ऑल इंडिया संघटनेचे झोनल सेक्रेटरी श्री रामेश्वरजी लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सर्व टीम काम करत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मंत्री महोदयाची भेट शक्य झाली
याप्रसंगी अहील्यानगर जिल्हाध्यक्ष रामचंद्र घनगाव व उपाध्यक्ष उल्हास गलांडे, बाबासाहेब गाडेकर ,योगेश धावणे व इतर सभासद उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा