राहाता न्यायालयात लोकअदालतचे आयोजन
राहाता:
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण तथा राहाता वकिल संघ, राहाता यांचे संयुक्त विद्यमाने लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रलंबित दिवाणी दावे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, नियमांतर्गत तडजोड होणारी फौजदारी प्रकरण, धनादेश न वाटल्याची प्रकरण, घरगुती हिंसाचार, विद्युत कायदयांतर्गत येणारी प्रकरणे, बैंक वसुली, भुसंपादन, लवाद अर्ज व दरखास्त त्याचप्रमाणे बँक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, बीएसएनएल यांचे रक्कम थकबाकी तथा ग्रामपंचायत व नगरपालिका यांचे घर, नळपट्टी दाखल पूर्व प्रकरणे या सर्व प्रकरणांच्या अनुषंगाने दि. २८ सप्टेबर २०२४ रोजी राहाता न्यायालय परिसरात राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेउन जास्तीत जास्त प्रकरणे तडजोड करून, आपले प्रकरण मिटवून निकाली काढून घ्याव, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा राहाता वकील संघ, राहाता यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा