रविवार, २२ सप्टेंबर, २०२४

श्री गणेश विद्यालयात कर्मवीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

श्री गणेश विद्यालयात कर्मवीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक


 रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेत रयत शिक्षण संस्थेचे आराध्य दैवत , थोर शिक्षण महर्षी , रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली. 

मिरवणुकीमध्ये कर्मवीर रथाच्या समोर विद्यालयातील शिक्षकांनी बसवलेले झांज पथक, लेझीम पथक, टिपरी नृत्य सादर करण्यात आले.यामध्ये लहान मुलांनी सादर केलेले झांज पथक, लेझीम पथक व टिपरी नृत्य मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणूक बस स्टॅंड वर आल्यावर ग्रामस्थांच्या वतीने कर्मवीर रथाचे पूजन करण्यात आले. या मिरवणुकीमध्ये श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे, स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब गाढवे पाटील ,अण्णासाहेब कोते पाटील, दादासाहेब गाढवे पाटील, संदीपभाऊ गाढवे, जया भाऊ कालेशेठ ,वाल्मीकभाऊ गाढवे ,विजुभाऊ सदाफळ ,रांजणगावच्या सरपंच सुनीताताई सोपानराव कासार उपसरपंच निलिमाताई राजेंद्र गाढवे, सोपानकाका कासार, दत्तात्रय बबन गाढवे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के. के. सर प्रभारी पर्यवेक्षक बाळासाहेब तनपुरे सर यांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी कर्मवीर रथाची सुंदर सजावट केली.या मिरवणूकीसाठी श्री दिलीप बोर्डे यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला.कर्मवीर रथाचे सारथ्य सार्थक बोर्डे यांने केले.मिरवणूक यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...