मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

मंदिर सुरक्षा चे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हवालदार योगेश पाटोळे यांचा प्रामाणिकपणा

मंदिर सुरक्षा चे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हवालदार योगेश पाटोळे यांचा प्रामाणिकपणा

शिर्डी प्रतिनिधी 

दिनांक 14/09/2024 रोजी व्ही आय पी गेट वर पोलीस बंदोबस्त करिता असणारे मंदिर सुरक्षा चे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील हवालदार श्री योगेश पाटोळे यांना एक लेडीज पर्स सापडली होती. पर्स मध्ये ३९५०/- रुपये सापडले ते पैसे त्यांनी संरक्षण ऑफिसमध्ये जमा केले.

VIP गेट नंबर दोन येथे सापडलेली पर्स महिला साई भक्त भूमिका प्रतीक राठोड रा. कांदिवली वेस्ट मुंबई यांची असल्याचे समजल्याने ओळख पटवून ३९५० रुपये परत केले.

आज रोजी प्रामाणिक पोलीस हवालदार श्री. योगेश पाटोळे यांचा यथोचित सत्कार केला. पोलीस म्हणजे अप्रामाणिक, नकारात्मक हीच बाजू कायम समाजाने पाहिलेली असते. परंतु आजही मोठ्या प्रमाणावर प्रामाणिक आणि आपल्या वर्दीशी इमान असणारे पोलीस आहेत. याची प्रचिती येत असते.हवलदार योगेश पाटोळे यांचा प्रामाणिक पणामुळे साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...