राहाता-
राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला.आज शेवटच्या दिवशी गणेशाचे पर्यावरण पूरक विसर्जन करण्यात आले.सकाळी टाळांच्या गजरात पालखीतून श्रींची लोकरूची नगर ते छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.भगवे फेटे परिधान करून टाळांच्या गजरात श्रीगणेशाचा जयघोष करणारे गणेशभक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.तसेच रिंगण करून फुगडी खेळत सर्व सदस्य आनंद घेत होते.छत्रपती व्यापारी संकुल समोर माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ यांच्या हस्ते विधिवत पूजा करून श्रीगणेशाचे मोठ्या बादलीत विसर्जन करण्यात आले.तत्पूर्वी साईयोग फाऊंडेशनचे सदस्य रविंद्र धस यांनी गुजरातहून आणलेल्या नर्मदा नदीच्या पाण्याने अभिषेत करण्यात आला.यावेळी दहा दिवस मनोभावे पूजन केलेल्या गणरायांना निरोप देताना सर्वच भावुक झाले होते.गणरायाची मूर्ती शाडूची असल्याने ती विरघळल्यानंतर ते पाणी फाउंडेशनने पूर्वी लावलेल्या झाडांना देण्यात आले.
आदल्या दिवशी सत्नारायण पूजा करून महाप्रसाद ठेवला होता.यावेळी शिर्डीचे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या हस्ते सपत्नीक गणरायांची आरती करण्यात आली.महाप्रसादाला अलोट गर्दी लोटली होती.
याप्रसंगी पत्रकार बाळासाहेब सोनवणे,संदीप वाव्हळ,राजूभाई पठाण,सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे,साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे,डॉ पांडुरंग गुंजाळ,डॉ संतोष मैड,डॉ किरण गोरे,सर्जेराव मते, भरत दवंगे,डॉ विनय पाटील,डॉ गोकुळ शिंदे,डॉ सुनील उगले,डॉ अमोल बेद्रे,डॉ आशितोष मैड,डॉ अजिंक्य पानगव्हाणे,ॲड.गोरख दंडवते, ॲड.दत्तात्रय धनवटे,ॲड स्वप्नील जोरे,अक्षय काळे,भाऊसाहेब बनकर,बाळासाहेब गाडेकर,विलास वाळेकर,संजय बाबर,व्यंकटेश अहिरे,बबलू फटांगरे,राजेंद्र बांगर,संजय वाघमारे,आकाश पुंड,,उमेश लुटे,राजेंद्र वायकर,प्रताप गमे,दीपक दंडवते,अनिल सातव,दीपक गाडेकर,रंगनाथ सदाफळ,अंकुश गांधी,अण्णासाहेब कांदळकर,सुभाष दंडवते,विष्णू गाडेकर,अशोक वाघ,नारायण गाडेकर बाळासाहेब तारगे संतोष बावके, ज्ञानू गाडेकर,विठ्ठल निर्मळ,पांडुरंग गायकवाड,आप्पासाहेब माळवदे,भानुदास गाडेकर,मयुर दवंगे,प्रणव लावर,नामदेव गवते,परमेश चव्हाण,अर्जुन चव्हाण,सुनील गायकवाड,देविदास नागरे,शिवाजी आनप,मिलिंद बनकर,सार्थक तुपे नंदकुमार डुंगरवाल,गोटुशेठ रायसोनी,अमोल पिपाडा,सतीश आत्रे,विरेश रुणवाल,सुनील पिपाडा,तुषार मुथा,पंकज पिपाडा,गोटू सदाफळ,प्रभाकर डांगे,रामहरी डांगे,सुभाष डांगे,सदाशिव डांगे,माऊली आरणे,बाळासाहेब गुंजाळ,भानुदास जायभाय, माजी नगरसेविका अनुराधा तुपे,डॉ,अंजली पानगव्हाणे,डॉ गोरे,रूपाली दवंगे,आशा पिपाडा,सुष्मिता चव्हाण,उज्वला गाडेकर,पूजा दवंगे,गौरी नागरे,रूपाली अहिरे,मंगल फटांगरे,ताईबाई निर्मळ,रूपाली पिपाडा,वैष्णवी पिपाडा,सुजाता पिपाडा,योगिता मुथा,जयश्री पिपाडा,प्रीती पिपाडा,सीमा बागुल,मोहिनी सदाफळ,प्रीतम सदाफळ,संजय चिकळकर,गजानन भुरके,सचिन सोनवणे,भास्कर जाधव,अवधूत अहिरे,देवांश अहिरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
साईयोग फाउंडेशनच्या इतर सामाजिक कार्या बरोबरच या साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य भरत दवंगे,मनोज पिपाडा,रविंद्र धस, बबलू फटांगरे यांची संकल्पना व प्रयत्नातून हवा,पाणी व ध्वनीचे प्रदूषण टाळून साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.पर्यावरणाच्या रक्षणासाठी या पद्धतीने सर्वांनी गणेशोत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे.
डॉ बापूसाहेब पानगव्हाणे
अध्यक्ष,साईयोग फाउंडेशन राहाता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा