महाराष्ट्रातील इतर गणेश मंडळे त्यांच्या उपक्रमाचे आदर्श घेतील - माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
शनिचौक गणेश मित्रमंडळाने डीजे, फटाके व गुलाल हद्दपार करत धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सवाचे उत्कृष्ट नियोजन केले. गणेश उत्सवात आनंदाचे वातावरण निर्माण केले महाराष्ट्रातील इतर गणेश मंडळे त्यांच्या उपक्रमाचे आदर्श घेतील अशी भावना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाघचौरे, खासदार भास्करराव भगरे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, माजी आमदार सुधीर तांबे, कृषी भूषण प्रभावती घोगरे व इतर मान्यवरांच्या हस्ते शनि चौक गणेश मित्रमंडळाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करत शनिरत्न पुरस्कार देऊ सन्मानित केले.कीर्तन महोत्सव, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर, अनाथ मुलांना मदत, महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान अशा विविध प्रकारचे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवून मंडळाच्या सदस्यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली.
यावेळी आ. थोरात म्हणाले, या धार्मिक गणेशोत्सवात अतिशय सुरेख नियोजन या मंडळाच्या सदस्यांनी केले आहे. खरतर महाराष्ट्रात प्रथमच डी.जे गुलाल, फटाके मुक्त असा गणेश उत्सव या मंडळाने विविध उपक्रम व धार्मिक कार्यक्रम हाती घेऊन साजरा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर मंडळे निश्चितच या मंडळाचा आदर्श घेऊन या निर्णयाची नोंद घेतली पाहिजे.
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, मंडळाने स्तुत्य असे विविध स्पर्धा, सामाजिक उपक्रम व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. याठिकाणी टाळ, मृदूंग, भजन किर्तनाच्या तालावर तसेच बाल कीर्तनकार, टाळकरी, वारकरी यांच्या उपस्थितीत अतिशय भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा केला जात आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजात योगदान देणाऱ्या सत्कारमूर्ती यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले हे अभिमानास्पद आहे. याची संपूर्ण महाराष्ट्र दखल घेईल.
खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. भास्करराव भगरे, माजी आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. प्रभावती घोगरे, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशचे माजी अध्यक्ष व संचालक अॅड. नारायणराव कार्ले यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची अध्यक्षीय सूचना योगेश बोठे यांनी मांडली तर अनुमोदन निलेश कार्ले यांनी दिले. प्रास्ताविक रणजित बोठे यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष अनिल बोठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यावेळी गणेशचे चेअरमन सुधीर लहारे, धनंजय गाडेकर, अॅड. पंकज लोंढे, सुधीर म्हस्के, भगवानराव टिळेकर, संपत हिंगे, बाबासाहेब डांगे, नानासाहेब नळे, महेंद्र गोर्डे, अनिल गाढवे, बाळासाहेब चोळके, विष्णूपंत शेळके, आलेश कापसे, गंगाधर डांगे, अभिषेक बोरसे, नितीन कोल्हे, चंद्रशेखर कार्ले, नितीन सदाफळ, दत्तात्रय सदाफळ, विजय सदाफळ, सोपान हिंगे, प्रतीक हिंगे, सचिन मेचे, सचिन खरपस, अभिजित बोठे, अमोल सदाफळ, दीपक सदाफळ, कुमार सदाफळ, साईनाथ जाधव, भोजराज चौधरी, रवी सदाफळ, अमोल लोहाटे, धीरज सोनवणे, कैलास मेचे, रवींद्र मेचे, किरण लांडगे, धीरज कार्ले तसेच आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, पुरस्कारार्थी तसेच गणेश व शनि भक्त, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा