सोने पॉलिश करून देण्याचा बाहणा करत राहात्यातील पंधरा चारी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील ४ तोळे सोने दोन भामट्या चोरट्यांनी लुटले
राहाता -
सोने पॉलिश करून देण्याचा बाहणा करत राहात्यातील पंधरा चारी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या गळ्यातील ४ तोळे सोने दोन भामट्या चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली असून सोने चोरी करणाऱ्या अज्ञात दोन व्यक्ती विरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत १५ चारी येथील राहणाऱ्या अनिता रमेश आनप यांनी पोलिसात दिलेल्या फिर्याद म्हटले आहे की शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी मी घरातील काम करत असताना सकाळी ११ वाजे दरम्यान दोन व्यक्ती आमच्या घरी मोटारसायवर आले व त्यांनी मला आम्ही उज्वला कंपनीमधून आलो आहे आम्ही तुमच्या घरातील पितळेची भांडी, फर्निचर, टीव्ही व इतर वस्तू पॉलिश करून देतो असे म्हणत त्यांनी मला व माझ्या सुनेला एक कार्ड हातात दिले कार्ड हातात दिल्यानंतर आम्हा दोघींना भुरळ पडल्यासारखे झाले. आम्हाला भुरळ पडल्यानंतर त्यांनी आम्हाला घरातील पितळी भांडे तसेच फर्निचर व टीव्ही केमिकलने स्वच्छ करून दिली . आम्हा दोघींना भुरळ पडली असल्यामुळे ते जे सांगत होते ते आम्ही करत होतो. त्यांनी मला तुमच्या गळ्यातील सोने काढून द्या आम्ही पॉलिश करून देतो असे सांगितल्यानंतर मी व माझ्या सुनेने आमच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने त्यांच्याकडे काढून दिले पॉलिश करण्यासाठी काढून दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये सोन्याचे गंठण, कानातील साखळ्या व टॉप्स, रिंग, असे एकूण ४ तोळे सोने असे अंदाजे २ लाख ५० हजार किमतीचे सोन्याचे ऐवज आम्हाला भुरळ पाडून चोरून निले असल्याची फिर्याद १५ चारी येथील राहणाऱ्या अनिता रमेश आनप यांनी राहाता पोलिसात दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यान विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा