जागतिक स्तरावरील ज्ञान पावर आणि मॅन पावर भारताकडे
डॉक्टर सुधीरजी तांबे
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेश नगर शाखेत थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती दिनांक 30 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. या जयंती समारोह प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी रयत शिक्षण संस्था ही जागतिक स्तरावर ज्ञान पावर आणि मॅन पॉवर पुरवणारी संस्था आहे भविष्यात जगातीक स्तरावर भारत एक बुद्धिमान देश म्हणून ओळखला जाईल.असे सांगितले हे सांगताना रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागामधून रयत शिक्षण संस्था दीनदलीतांच्या घरा घरा पर्यंत पोहचली आहे.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर भविष्यामध्ये सरकारने अभ्यासक्रम सुरू करून तो प्राथमिक वर्गापासून पासून महाविद्यालयीन वर्गासाठी राबवला पाहिजे. कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खरी श्रमप्रतिष्ठा काय असते हे कमवा व शिका या योजनेतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.असे प्रमुख पाहुणे डॉ सुधीरजी तांबे साहेब यांनी विचार व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य रावसाहेब पांडुरंग गाढवे पाटील यांनी माजी विद्यार्थी मेळाव्यामधून मिळालेल्या देणगी मधून विद्यालयाच्या भौतिक सुविधा पूर्ण त्वाककडे घेऊन जाण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.आणि या ज्ञानमंदिरासाठी पालकांनी व माजी विद्यार्थ्यांनी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील यांनी गणेश नगरची ही इमारत माजी विद्यार्थी आणि दानशूर दात्यांच्या देणगी मधून प्रगतीकडे वाटचाल करत आहे असे सांगून सर्व सामान्य कुटुंबातील मुलांना मोफत आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे काम हे विद्यालय करत आहे असे सांगितले.भविष्यामध्ये विद्यालयासाठी ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण सर्वांनी सोडवण्याचा निश्चय करु असे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूरचे प्राध्यापक लक्ष्मण कोल्हे सर यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन नसून ते ब्रह्मास्त्र आहे असे सांगितले शिक्षणाची गंगोत्री कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दीन दलितांपर्यंत घेऊन जाऊन शिक्षणाची जी मक्तेदारी होती ती मक्तेदारी मोडीत काढली. म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटलांना क्रांतीसुर्य दिव्य पुरुष असे म्हटले जाते. रयतेमधील विद्यार्थी हिम्मत मेहनत चिद्द आणि चिकाटी या गुणावर पुढे जात आहे असे वर्णन केले. या प्रसंगी मार्च 2024 मधे संपन्न झालेल्या एस एस सी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.यावर्षीचे आदर्श शिक्षक म्हणून संभाजी रामकिसन धनवडे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.श्री जयाभाऊ कालेशेठ यांनी विद्यालयाच्या परिसरात संपूर्ण वृक्षलागवड करुन देण्याचे जाहीर केले.याप्रसंगी दत्तात्रय बबन गाढवे पाटील यांच्या कडून सर्व विद्यार्थी व पालकांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
या कार्यक्रमसाठी रावसाहेब गाढवे,अनिलकाका गाढवे, सोपानराव कासार, राजेंद्र गाढवे,
रांजणगावच्या सरपंच सुनीताताई सोपानराव कासार,उपसरपंच नीलिमाताई राजेंद्र गाढवे, अण्णासाहेब कोते पाटील,दादासाहेब गाढवे पाटील ,संदीपभाऊ गाढवे पाटील, किरण राऊत साहेब ,राजेंद्र जाधव साहेब, वाकडी ग्रामपंचायतचे सदस्य विजयभाऊ सदाफळ, कारभारी घोगळ, संचालक बाळासाहेब चोळके,वाल्मीकभाऊ गाढवे, श्रीमती विमलताई दिलीपराव गाढवे, संचालक आलेश कापसे, अंकुश आरोटे, तुरकणे सर, महेश आहेर, पुखराशेठ पिपाडा, कैलास चिंधे सर, विनायक देठे, अनिलराव बोठे,निलेशजी कार्ले, चंद्रकांत घोगळ, चोळके सर, चंद्रकांत पाटील गाढवे, विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय वसावे के के सर सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वराडे मॅडम यांनी केले आभार सौ पिलगर मॅडम यांनी मांनले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा