राहाता तालुक्यातील लोहगाव येथील विविध कार्यकारी सहकारी( विकास )सेवा संस्थेची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या गोडाऊन मध्ये संस्थेचे चेअरमन राजेंद्र चेचरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सभेत दिवंगत झालेल्या मान्यवरांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सोसायटीचे सचिव आर व्ही चेचरे यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून दाखवले. त्याचप्रमाणे सन 2023 व 24 सालाचा वार्षिक अहवाल तेरीज ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचून मंजूर करण्यात आले.
सन 2024 व 25 साल ला कमाल मर्यादा पत्रके तयार करण्याचा प्रत्येक सभासदांची कमाल मर्यादा पत ठरवून बँकेकडे कर्ज मागणीचा अधिकार पंच कमिटीला देण्यात आला.
सन 2024 व 25 साला करिता उत्पादनावर खर्चाचे बजेट ठरवण्यात आले. सोसायटी थकबाकी संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. लेखा परीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षक याची नेमणूक करण्यात आली .यासह विविध विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी ॲड.बाबासाहेब चेचरे म्हणाले की संस्थेला उत्पन्न कसे मिळेल यासाठी चेअरमन व्हा. चेअरमन संचालक मंडळाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जागा नगर मनमाड हवे रोडवर कराराने घेऊन गावच्या कार्यक्षेत्रातच पेट्रोल पंप .मॉल. यासारखा व्यवसाय उभारावा तो संस्थेने चालवायला द्यावा त्यातून फक्त पैसाच घ्यावा. त्या उत्पन्नातून मिळालेल्या पैशाचा सभासदांना दरवर्षी डेव्हिंडन्ट रुपात फायदा मिळेल असेही ते यावेळी म्हणाले. प्रत्येक सभासदांनी सोसायटीचे कर्ज भरणे आवश्यक आहे . थकबाकी कर्ज वेळेवर भरावे व ते भरावेच लागते त्याचा फायदा आपल्या सर्व सभासद बंधुना होतो असेही संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे यांनी बोलताना व्यक्त केले.
मा.संचालक भाऊसाहेब चेचरे
म्हणाले की संस्थेला विजन ठरवून काहीतरी व्यवसायात उतरावे लागेल व्यवस्थेतून मिळणारा नफ्यातून संस्थेच्या सभासदांना फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तीच तीच परंपरा आपल्याला बदलावी लागेल यासाठी एखादी एजन्सी पेट्रोल पंप किंवा मॉल यासारखा व्यवसाय करावा लागेल ही आता काळाची गरज आहे.
ह. भ. प .रवींद्र महाराज चेचरे. अशोक चेचरे .यांनी चर्चेत भाग घेतला.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विजय चेचरे. ज्येष्ठ सभासद लहानु चेचरे. कामगार पोलीस पाटील वसंतराव चेचरे.माजी सरपंच गणेश चेचरे. सुरेश चेचरे. दत्तात्रय चेचरे शुभम चेचरे अक्षय चेचरे बबन दरंदले. किशोर दरंदले .तंटामुक्तीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे विठ्ठल दरंदले किरण इनामके .बाबासाहेब चेचरे धुळाजी चेचरे . कृष्णा चेचरे. सोपान चेचरे.अनिल चेचरे.संजय चेचरे.
किरण चेचरे, विजय चेचरे,कुमार चेचरे,लक्ष्मण चेचरे,रावसाहेब चेचरे.भास्करराव चेचरे. आण्णासाहेब चेचरे. संपत चेचरे. बाळासाहेब चेचरे. भाऊसाहेब चेचरे .राजेंद्र चेचरे.कोडीराम नेहे आदि मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा