सेवापूर्ती समारंभाचे आयोजन
शिर्डी प्रतिनिधी संजय महाजन
विद्या प्रसारणी सभेच्या व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातील प्रकाश हॉल मध्ये श्रीमती सुरेखा अनिलसिंग परदेशी मॅडम यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन प्रशाले तर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभेचे कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, शाळा समिती सदस्य अॅड. संदीप अगरवाल आणि श्री. धीरूभाई कल्याणजी उपस्थित होते.
श्रीमती सुरेखा परदेशी मॅडम यांनी वि.प्र. सभेमध्ये एकूण 38 वर्षे सेवा केली. ज्ञानदानाबरोबरच विविध समित्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केले. समित्यापैकी सांस्कृतिक समिती, परीक्षा समिती, सहल समिती आणि शालेय पोषण आहाराचे काम देखील त्यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले.
अध्यापनातील विषयांपैकी इंग्रजी त्यांचा मुख्य विषय त्याचबरोबर मराठीचे अध्यापन त्यांनी केले. तसेच इंग्रजी विषयाचे विषय प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. नेहमी हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सौ. परदेशी मॅडम सेवानिवृत्त होत असल्यामुळे सर्वच अध्यापक वर्गाने हळहळ व्यक्त केली. ज्ञानदानाच्या कार्याबरोबरच घराची जबाबदारी देखील तितक्याच सक्षमपणे त्यांनी पेलवली.
कार्यक्रम प्रसंगी मंचावर प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, उपमुख्याध्यापक श्री. सुहास विसाळ, उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे, वरिष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगल जाधव, प्राथमिक विभाग इंग्लिश माध्यमाच्या मुख्याध्यापिका श्रीमती लोखंडे मॅडम आणि शिक्षक प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात चिरंजीव गौरव गोणते विद्यार्थ्याने प्रस्तुत
केलेल्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोमनाथ
ढुमणे यांनी आपल्या विनोदी शैली मधून केले. प्रास्ताविक शिक्षक
प्रतिनिधी श्रीमती ज्योती डामसे यांनी केले. उपस्थितांपैकी
श्री. हरिभाऊ कुलकर्णी, श्री. अनिल खामकर, श्रीमती स्नेहलता कांबळे,
श्रीमती अनुजा गोसावी, परदेशी मॅडमच्या कन्या अंजली, सूनबाई
श्रीमती स्वाती परदेशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री. परदेशी
सर यांनी आपल्या पत्नी विषयीच्या भावना कागदावर टिपल्या.
कार्यक्रमासाठी श्रीमती परदेशी मॅडम यांचे चिरंजीव ओंकार,
विहीणबाई आणि जवळचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे आणि शाळा समिती
अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर कार्यक्रमासाठी उपस्थित राहू न
शकल्यामुळे त्यांनी आपल्या शुभेच्छा मोबाईल द्वारे दिल्या. माजी
शिक्षकांपैकी मा. प्राचार्या श्रीमती शेख मॅडम, उपमुख्याध्यापिका
मधुमालती संधीर मॅडम, शिक्षक श्री. वाळेकर सर, श्री. प्रल्हाद देशपांडे
श्री. प्रमोद देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या तयारीमध्ये फलकलेखन श्री. महेश चोणगे तर कार्यक्रम पत्रिका श्री. विक्रम शिंदे यांनी तयार केली. स्वागत समितीमधील श्रीमती वैशाली ढाकणे, श्रीमती मनीषा खेडकर, श्रीमती वैशाली तारू, श्रीमती प्रीती म्हात्रे आणि श्रीमती मीना पराते आणि सेवक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांचे आभार श्री. वैभव सूर्यवंशी यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा