सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदी तुषार महाजन यांची नियुक्ती

ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदी तुषार महाजन यांची नियुक्ती


      ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यच्या उपाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे तुषार संजय महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साधना सहकारी बँक मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब बापुराव कोळपे व ग्रीन फाउंडेशन संस्थापक/अध्यक्ष अमित जगताप यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. 
      याप्रसंगी तुषार महाजन म्हणाले, पर्यावरण संरक्षण करणे, जनजागृती करणे, वृक्ष लागवडकरणे, वृक्षाचे संवर्धन करणे, एक कुटुंब, एक झाड ही संकल्पना प्रत्यक्ष राबविणे, शाळांमध्ये, महाविद्यालयात वृक्ष कार्यक्रम आयोजन, निबंध / वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे, निसर्गाच्या संरक्षणासाठी विविध उपाययोजना करणे, झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष चळवळ लोक चळवळ व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाची साखळी टिकवून ठेवण्यासाठी त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. व ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे कार्य संपुर्ण महाराष्ट्र पोहोचवणार असल्याची माहीती ग्रीन फाउंडेशन उपाध्यक्ष तुषार महाजन यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...