सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

शिर्डीत संघटनात्मक बैठकचे आयोजन

शिर्डीत संघटनात्मक बैठकचे आयोजन

नगर 
      आज शिर्डी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर व राहाता मंडळ जिल्हा पदाधिकारी यांची संघटनात्मक बैठक शिर्डी विधानसभाचे निरीक्षक व गुजरात विधानसभाचे मा.अध्यक्ष श्री.राजेंद्रजी त्रिवेदी व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर, शहराध्यक्ष विकास गोंदकर यांच्या प्रमुख  उपस्थितीत पार पडली.
      यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संदर्भात चर्चा करण्यात आली. विरोधकाकडून जो फेक नेरेटिव सेट केला जात आहे त्याला थेट नेरेटिव ने उत्तर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने देण्यात येणार आहे. बूथ सक्षमीकरणावर जोर देत, बूथ रचना मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. बूथ प्रमुखांना कार्याचे योग्य वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या, तसेच मतदारांना केंद्र व राज्य सरकारच्या उपक्रमांची माहिती देण्याची जबाबदारी दिली. ४० दिवस पूर्णवेळ युवा मोर्चाचे कार्यकर्त्या काम करण्याचा संकल्प करण्यात आला. 
       गुजरात विधानसभाचे मा.अध्यक्ष राजेंद्रजी त्रिवेदी सर यांनी भारतीय जनता युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख तुषार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला. 
     यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र माळवदे, नवनाथ मुजमुले, गणेश सोनवणे,  सतीश गायकवाड, किरण बर्डे, सतीश बावके, लखन बेलदार, तालुकाध्यक्ष राहुल गोरे, प्रसाद शेलार, राजु बलसाने, अक्षय मुळे, प्रसाद बावचे, प्रसाद सुरंजे, गिरधारी सोनेजी, शुभम भोर, संदीप थोरात, सागर जेजुरकर व युवा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...