मंगळवार, १ एप्रिल, २०२५

राहाता तालुक्यातील एकरुखे येथील ॲड ऋषिकेश आभाळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( jmfc) न्यायाधीश पदी निवड

राहाता तालुक्यातील एकरुखे येथील ॲड ऋषिकेश किसन आभाळे यांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( JMFC) पदी  नियुक्ती


   

    राहाता तालुक्यातील एकरूखे येथील शेतकऱ्याच्या मुलाची गरुडझेप , वयाच्या 25 व्या वर्षी न्यायाधीशपदी गवसणी .
  ग्रामीण भागात शिक्षण, योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्या असताना प्रतिकूल परिस्थितीत तोंड देत राहता तालुक्यातील एकरुखे या गावातील ॲड ऋषिकेश किसन आभाळे  यांनी एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीश पदाला गवसणी घातली आहे .जिद्द चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतो  याचे उत्तम उदाहरण म्हणजे ॲड ऋषिकेश आभाळे हे झाले आहे. एकरुखे गावातील शेतील राबणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने सोने झाले आहे. 
 ॲड ऋषिकेश आभाळे यांचे दहावीपर्यंत शिक्षण राहाता येथे सेंट जॉन  स्कूल येथे झाले , तर बारावीपर्यंत शिक्षण एस एस जी एम महाविद्यालय कोपरगाव येथे विज्ञान शाखेत पूर्ण झाले त्यानंतर बारावीला चांगले गुण मिळाल्याने वडिलांच्या सल्ल्यानुसार पुण्यातील फर्ग्युसन विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. घरातील परिस्थिती नाजूक असतानासुद्धा आई वडिलांनी शेतीत प्रचंड कष्ट करून शिक्षणात कुठलीही कमी पडू दिली नाही . अभ्यासात सातत्य व त्यास प्रचंड मेहनतीची जोड असल्यामुळे 2021 मध्ये प्रथम श्रेणी with distinction मिळवत कायद्याची पदवी प्राप्त केली . विधी महाविद्यालयात शिकत असताना वडीलांची इच्छा व न्यायिक क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली व आत्ता निर्धार केला की न्यायाधीश व्हायचे त्या दृष्टीने त्यांची परीक्षा पद्धती , पात्रता याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असताना पुणे येथील आदरणीय ॲड गणेश शिरसाठ सर यांची भेट   घेतली व तेथूनच त्यांनी खऱ्या अर्थाने न्यायिक परीक्षेच्या अभ्यासास सुरुवात केली .
  अभ्यासात सातत्य , संयम व शिस्त या गोष्टी सोबतच आदरणीय ॲड गणेश शिरसाठ सर यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी jmfc  या पदाला गवसणी घातली . यांच्या या परीक्षा उत्तीर्ण झाल्या बद्दल राहाता तालुक्यासह एकरुखे गावात अभिनंदन होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...