मंगळवार, १ एप्रिल, २०२५

जिवन सुखमय करण्यासाठी भगवंताचे स्मरण, सेवा करा - ह.भ.प जंगले शास्त्री

जिवन सुखमय करण्यासाठी भगवंताचे स्मरण, सेवा करा - ह.भ.प जंगले शास्त्री 

पानेगांव (वार्ताहर) 

जिवन सुखमय करण्यासाठी भगवंताचे स्मरण सेवा, करा निश्चितच आपल्या जिवनात आमुलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही असे पानेगांव 
(ता नेवासे) येथे संत ज्ञानेश्वर महाराज ५९ अखंड हरिनाम सप्ताहाचा काल्याच्या किर्तनरुपी सेवेत ह.भ.प भगवान महाराज जंगले शास्त्री आपल्या वाणीतून किर्तन रुपी सेवा देताना सांगितले. 
कंठी धरला कृष्ण मनी अवघा जगी प्रकाश जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा अभंग विवेचन करताना भगवंताला आपल्या अंतःकरणात कंठामध्ये वाणी, काया, वाचा, मन वृद्धिंगत केल्यास भगवंताची प्राप्ती होते मनुष्यदेहाला उर्जा सुख शक्ती समृद्धी मिळते. काल्याचा महाप्रसाद हा पुण्यवानांनच मिळतो काल्याचा प्रसाद घेण्यासाठी देवदूतांना अवतार घ्यावा लागला. आपण भाग्यवान आहात आपल्याला काल्याचा प्रसाद मिळतो. गोपाल कृष्ण भगवंताचा लिला सांगून मंत्रमुग्ध केले.



 अखंड हरिनाम सप्ताह तथा कीर्तन सोहळा संपन्न झाला परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ  उपस्थित होते , सप्ताह कालामध्ये परिभाजकाचार्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज यांची गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्ती  आगमन व दर्शन सोहळा संपन्न झाला,सर्वपक्षिय नेते मंडळींनी सदिच्छा भेट दिली. आठ दिवस चालणाऱ्या सप्ताहात नामांकित कीर्तनकार मंडळींचे कीर्तने सपन्न झाली. आठ दिवस अन्नदान कार्य अविरतपणे सुरू होते.
 दहीहंडी फोडून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व आमटी भाकरी भात -काला महाप्रसादाचे सर्वांना वाटप करण्यात आले.


पुर्व संध्येला विद्यार्थ्यांन साठी रांगोळी निबंध स्पर्धा आयोजन करुन विजेत्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले.
यावेळी लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील, नेवासे तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे, सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नि.विजय माळी. परीसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्याच बरोबर पारायण कमिटी, युवक मंडळ,महिला मंडळी तसेच रोज रांगोळी रेखाटणाऱ्या भगिनी, भजनी मंडळ, स्वच्छतादूत तसेच स्वादिष्ट स्वयंपाक बनविणारे आदींसह सेवकांचे मोठं योगदान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...