अॅड कोमल चौधरी यांची प्रथम दंड न्यायाधीशपदी
श्रीरामपूर :महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत *२०२४-२५* या कालावधीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत अॅड कोमल फकीरचंद चौधरी यांनी उल्लेखनीय यश मिळवत प्रथम दंड न्यायाधीशपदी नियुक्ती मिळवली आहे. आपल्या आत्मशक्तीवर विश्वास ठेवत, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी सेल्फ स्टडीद्वारे हे मोठे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हा यशाचा टप्पा पहिल्याच प्रयत्नात गाठला आहे.
खानापूर ता श्रीरामपूर येथील रहिवासी असलेल्या अॅड कोमल चौधरी यांनी Bcomआणि LLB शिक्षण कोपरगाव येथून पूर्ण केले आहे.
अॅड कोमल चौधरी या अर्बन बँकेचे माजी मॅनेजर फकीरचंद गणपत चौधरी व सौ. पद्मा चौधरी यांच्या कन्या असून, नामांकित विधिज्ञ दिलीपरावऔताडे मार्गदर्शनाखाली त्यांनी तयारी केली त्या दिलीप औताडे यांची भाची आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे नगराध्यक्ष अनुराधाताई आदीक, नेवासा पंचायत समिती कृषी अधिकारी बाळासाहेब कासार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे आदींसह संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा