शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी -डॉ,राजेंद्र पिपाडा

शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी अशी मागणी डॉ,राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिर्डी विमानतळावर केली.   



शिर्डी -

       शिर्डी विमानतळावर नाईट लॅंडीग सुरु करण्यात यावी अशी मागणी डॉ,राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे शिर्डी विमानतळावर केली.
              शिर्डी विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवुन त्यांना शिर्डी विमानतळावर नाईट लँडींग सुरु कऱणेसंदर्भात विनंती कऱणेत आली यावेळी त्यांनी CISF चे अधिकारी व टर्मिनल मॅनेजर यांना बोलावुन अडचणींबाबत विचारला केली असता त्यांनी 30 गार्डची आवश्यकता असल्याचे सांगितले याबाबत CISF च्या वरिष्ठ अधिका-यांशी बोलुन आपल्यास मॅन पॉवर पुरविण्यास सांगतो असे आश्वासन दिले.
            शिर्डी विमानतळावरील 600 कोटी रु.चे मंजुर असलेल्या कामाच्या निविदा झालेल्या असल्याने लवकर काम  सुरु करण्यासंदर्भात डॉ.पिपाडांनी मागणी केली असता त्यांनी MADC चे कार्यकारी अधिकारी यांना फोन लावुन त्यांना याबाबत विचारणा करुन
तात्काळ काम  सुरु करणेसंदर्भात सुचना केल्या.
       शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे देवस्थान असल्यामुळे परराष्ट्रातुन व परदेशातुन याठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे भक्तांची गैरसोय होवु नये यासाठी त्यांना नाईट लँडींगची सुविधा देणे गरजेचे आहे. शिर्डी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत परंतु येथे नाईट लँडींगची सुविधा नसल्यामुळे फ्लाईटची संख्याही कमी आहे. या विषयावर चर्चा झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मकता दाखवत तात्काळ अधिका-यांशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला.
       यावेळी बजरंगबलीची शाल देवुन त्यांचा सत्कारही  करण्यात आला.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...