शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

सन 2023-24 वर्षात राहाता नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानात राज्यात पाचवी तर नाशिक विभागात प्रथम..


  सन 2023-24 वर्षात राहाता नगरपरिषद माझी वसुंधरा अभियानात राज्यात पाचवी तर नाशिक विभागात प्रथम..

राहता
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय माझी वसुंधरा अभियान ४.० सन 2023-24 अंतर्गत भुमी,वायु, जल,अग्नी व‌ आकाश या पंचत्वांतर्गत  पर्यावरणाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्यासाठी राहाता नगरपरिषदेने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये राहाता राहाता नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांतधिकारी साहेब श्री माणिक आहेर साहेब व मुख्याधिकारी साहेब श्री. वैभव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली  उच्चतम कामगिरी करत महाराष्ट्र राज्यात पाचव्या क्रमांकाचा व नाशिक विभागात 15 ते 25 हजार या गटात पहिला क्रमांकाचा मान मिळवला आहे. 
यावर राहाता नगरपरिषदेने १ कोटी ५० लाख रुपयाच्या बक्षिसावर आपली मोहोर उमटवली.
तसेच याकरीता नगरपरिषदेतील सर्व विभागातील अधिकारी,विभागप्रमुख,व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...