बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

जैन स्थानकात महिला तपस्वींच्याउपवासाचे सांगता.......


जैन स्थानकात महिला तपस्वींच्याउपवासाचे सांगता
        आपल्या पुर्व पुण्याने मिळालेली धन-संपत्ती केवळ साठवुन न ठेवता, तळागळातील लोकांच्या कल्याणाकरीता वापरली गेली पाहिजे .अपरिग्रह हा भगवान महावीरांचा एक सिद्धांत आहे. त्याचे अनुकरण कऱणे आपली नैतीक जबाबदारी आहे, असे मला वाटते अशी भावना गंगापुर-खुलताबादचे आमदार व पिपाडा यांचे व्याही प्रशांत बंब यांनी बोलताना व्यक्त केली. अनंत चतुर्दशीचे व्रत कऱणा-या महिला तपस्वींच्या उपवासाचे सांगता कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

        राहाता येथील जैन स्थानकात प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा व डॉ.राजेंद्र पिपाडा परिवाराकडुन या कार्यक्रमाचे आयोजन कऱण्यात आले होते. यावेळी गंगापुर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांचा सन्मानपत्र देवुन  सत्कार करण्यात आला. यावेळी संघपती अनिल पिपाडा,डॉ.राजेंद्र पिपाडा,विजय मुथा,बन्सीलाल सोळंकी,सुनिल धाडीवाल, सुमतीलाल ताथेड,कमलनयन टाकी, नेमीचंद लोढा, राजेश भन्साळी,पुखराज पिपाडा, विरेश रुणवाल आदी यावेळी उपस्थित होते.

        यावेळी पुढे बोलताना आमदार बंब म्हणाले की, आपल्या इंद्रीयांवर ताबा ठेवुन त्याच्यावर विजय मिळवता येतो म्हणुन जय जिनेंद्र म्हणतात. व्रत उपवास असे करा की त्यात तल्लीन होता आले पाहिजे. तरच खरा उपवास घडतो असे मला वाटते. जैन समाज हा जगाच्या पाठीवर सर्वांत जास्त प्रगती केलेला समाज आहे त्यामुळे आपली जबाबदारीही जास्त आहे .याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. फक्त चुल आणि मुल न पहाता गृहिणीनी घराच्या बाहेर पडुन पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन काम केले पाहिजे.

        ज्या कुटुंबात चार पिढ्या एकाच वेळी नांदत असतात असेच कुटुंब या कार्यक्रमाचा लाभ घेवु शकतात आणि पिपाडा परिवार खरच सौभाग्यशाली आहे त्यांना या कार्यक्रमाचा लाभ मिळाला. अशी भावना सामाजिक कार्यकर्ते प्रवीण बागरेचा यांनी व्यक्त केली.

        यावेळी श्रृती पिपाडा,प्रवीण बागरेचा, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...