रविवार, १५ सप्टेंबर, २०२४

विश्वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धा 2024 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन :- गंगाधर मुटे

विश्वस्तरीय  ऑनलाईन लेखन स्पर्धा 2024  मध्ये  सहभागी होण्याचे आवाहन :- गंगाधर मुटे
     

  कोटी कोटी शेतकर्‍यांचे पंचप्राण तथा शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक युगात्मा शरद जोशी
यांच्या ८९  व्या जयंतीदिनानिमित्त (३ सप्टेंबर २०२४)  
अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य परिषदेने सालाबादप्रमाणे या ही वर्षी  "विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2024 " चे आयोजन केले आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे " शेतमालाचा भाव " हा विषय ठेवण्यात आला असून या विषयावर  दोन हजार शब्दापर्यंत लिहिण्याची मर्यादा दिली गेली आहे. या  स्पर्धेचे चार लेखनप्रकार असतील : 
1)गद्यलेखन स्पर्धा-२०२४ यात  ललितलेख , कथा , वैचारिक लेख , मागोवा , शोधनिबंध  हे प्रकार असतील.
2) पद्यलेखन स्पर्धा-२०२४,  यात  पद्यकविता , छंदमुक्त कविता , छंदोबद्ध कविता , गझल , गेय रचना/गीत (पोवाडा इत्यादी) हे काव्याचे प्रकार असतील.
3) अनुभवकथन स्पर्धा-२०२४  यात  सुखद अनुभव ,  दुःखद अनुभव हे प्रकार असतील. 
4) समीक्षण-रसग्रहण स्पर्धा-२०२४ यात पुस्तक समीक्षण ,ललित लेखांचे समीक्षण, कवितेचे रसग्रहण या साहित्याचा समावेश असेल. 
                    समीक्षणासाठी व रसग्रहणासाठी पुस्तकाची/लेखाची/कवितेची निवड स्पर्धकाने स्वत:च करायची आहे. मात्र  लेख/कविता "शेतमालाचे भाव" या विषयाशी साधर्म्य राखणारे असणे अनिवार्य  असणार आहे.स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वतःचे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे.
पूर्वप्रकाशित लेखन देता येईल मात्र लेखन प्रताधिकारमुक्त असावे. प्रताधिकारासंबंधी संपूर्ण जबाबदारी लेखक/कवीची असेल. शक्यतो स्पर्धेसाठी अप्रकाशित व नवीन लेखन/कविता द्याव्यात.
एक स्पर्धक सर्व विभाग मिळून जास्तीतजास्त कितीही प्रवेशिका सादर करू शकेल. मात्र एका स्पर्धकाचा एकापेक्षा जास्त पारितोषिकासाठी विचार केला जाणार नाही. महत्तम गूण प्राप्त करणार्‍या रचनेची पारितोषिकासाठी निवड केली जाईल.  लेखन सादर करण्यासाठी लेखकाला/कवीला बळीराजा डॉट कॉम चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. सभासदत्व विनामूल्य घेता येते. SIGN IN/LOG IN केल्याशिवाय लेखन करा ही लिंक ओपन होणार नाही. 
                   जगभरातील मराठी साहित्यिक, विचारवंत या स्पर्धेत भाग घेत असतात. आलेल्या साहित्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस हे स्मृतिचिन्ह, सर्टिफिकेट  व नामवंत, विचारवंत साहित्यिकांचे पुस्तके हे  असून बाराव्या अखील भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते  पारितोषिक वितरण होईल. सदरची विश्र्वस्तरिय लेखन स्पर्धा ही 3 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत  असून आपले लेखन कसे करावे यासाठी  https://www.baliraja.com/it-15 या लेखात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त साहित्यिक, साहित्यरसिक, विचारवंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन  संयोजन मंडळातील श्री. गंगाधर मुटे, ला. राजेंद्र फंड, श्रीम. संगीता थोरात यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...