शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

नामदार विखे पाटील यांच्या सहकार्याने साकुरीत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज स्वीकृति प्रारंभ

नामदार विखे पाटील यांच्या सहकार्याने  साकुरीत प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज स्वीकृति प्रारंभ 

राहता -    प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी हातावर काम करणारे कारागीर यांचे साठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नुकतीच सुरू केली आहे या योजने अंतर्गत कारागिराणा रुपये एक लाख पर्यन्त अर्थसंहाय तसेच शिलाई मशीन साठी महिलाना रुपये पंधरा हजार पर्यन्त अर्थ सहयाय देण्यात येणार आहे या योजने मध्ये सुतार,लोहार,सोनार,कुंभार,न्हावी,माळी ,धोबी,शिंपी,गवंडी,चर्मकार,असरकर,अवजार बांधणारे,खेळणी बांधणारे,कुलूप बांधणारे,विणकर कामगार,यांना आपला व्यवसाय वाढ करणे साठी शासकीय बँक मार्फत अर्थसाहाय करण्यात येणार आहे या योजनेचा अर्ज स्वीकृति प्रारंभ आज साकुरी येथून करण्यात आला सदरील योजना जास्तीत जास्त महिलानी लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री ट्रस्ट च्या संचालिका वनिता जाधव व साकुरी च्या सरपंच मेघना दंडवते  यांनी केले आहे

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

साकुरी येथील युवा उद्योजकांची साकुरी ते तिरूपति बालाजी सायकल यात्रा

साकुरी येथील युवा उद्योजकांची साकुरी ते तिरूपति बालाजी सायकल यात्रा

राहता 

साकुरी येथील ट्रेकर ग्रुप व रोहोम पाटील फार्मर्स क्लब च्या युवा उद्योजकानी साकुरी ते तिरुपति बालाजी अशी सायकल यात्रा आजपासून सुरू केली आहे सदरील यात्रा आज पहाटे चार वाजता साकुरी येथून सुरू झाली सदरील सायकल यात्रा पुढील सात दिवसात तिरूपति बालाजी येथे पोहचणार आहे.

या अगोदर या युवा उद्योजकाणी पंढरपूर, कळसुबाई,
अश्या यात्रा सायकल वर केलेल्या आहेत त्यांच्या या यात्रे मध्ये युवा उद्योजक रणजीत शामराव रोहोम, अनिल भागवत राव रोहोम, अनिल रामजी रोहोम, अजित उत्तम रोहोम, अभिषेक अशोक दंडवते, संदीप विजयराव दंडवते, संदीप यामजी रोहोम, राहुल सुधाकर दंडवते, कैलास निवृत्ती रोहोम आदि युवा उद्योजक सहभागी झाले आहेत त्यांच्या या यात्रेसाठी साकुरी ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जात वैधता प्रमाणपत्र चा आग्रह न धरता महाविद्यालय मध्ये प्रवेश देण्यात यावा - मा. उच्च न्यायालय

जात वैधता प्रमाणपत्र चा आग्रह न धरता महाविद्यालय मध्ये  प्रवेश देण्यात यावा - मा. उच्च न्यायालय

शिर्डी 

State Common Entrance Test यांनी घेण्यात आलेल्या सन २०२४-२०२५ च्या विधी शाखा प्रवेशाच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रवेशाची अंतिम तारीख २९/०८/२०२४ होती आणि प्रवेशा करिता जात वैधता प्रमाणपत्र असणे बंधन कारक आहे असे CET कडून notice द्वारे सांगण्यात आले. जात प्रमाणपत्र नसल्यास विद्यार्थ्याचे प्रवेश रद्द करण्यत येईल, परंतु राज्य सरकार यांच्या २२/०७/२०२४ च्या GR मध्ये असे नमूद आहे कि “उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, प्रवेशासाठी अर्ज केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांचा कालावधी देण्यात येत आहे.” या मुद्द्यांना अनुसरून ॲड. ऐश्वर्या राजेश डांगळे हिने आपली लहान बहिण कु. पूर्वा राजेश डांगळे हिच्या प्रवेशा करिता ॲड. अमर अशोक घरटे यायच्या मार्फत मा. उच्च न्यायालयात Writ Petition No. 12207 of 2024 दाखल केली. सदर प्रकरणात वरिष्ठ वकील ॲड. किशोर पाटील, ॲड. अमर अशोक घरटे आणि ॲड. अशोक कदम यांनी युक्तीवाद केला असुन मा. उच्च न्यायालय यांनी त्यांच्या निकालात कु. पूर्वा राजेश डांगळे यांना जात वैधता प्रमाणपत्र चा आग्रह न धरता नरहर बळवंत ठाकूर विधी महाविद्यालय मध्ये  प्रवेश देण्यात यावा व समाज कल्याण यांना ४ महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थिनीला देण्यात यावे असा आदेश दिला.

शिर्डीत जागृती युवक मंडळाची दहीहंडी उत्साहात संपन्न

शिर्डीत जागृती युवक मंडळाची दहीहंडी उत्साहात संपन्न

शिर्डी 

साईबाबांच्या नगरीत परंपरा जोपासत दहिहंडीचा उत्सव गोविंदानी जल्लोषात साजरा केला. तरुणाईचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक मंडळाच्या गोविंदा पथकांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.

शिर्डीमध्ये गोकुळाष्टमी आणि दहीहंडी उत्सवाचे महत्त्व मोठे आहे. अनेक मंडळ वर्षानुवर्षाची परंपरा जोपासत या उत्सवाचे आयोजन करतात. यंदाच्या वर्षी सुध्दा सर्वच मंडळांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून या पारंपरीक सणाचा आनंद निर्माण केला आहे.

शहरातील सर्वच मंडळांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देत गोविंदा पथकांशी संवाद साधून शुभेच्छा दिल्या. गोविंदा पथकांनी ना. विखे पाटील यांचे स्वागत केले. गोविंदांनी सेल्फी काढण्याचा हट्ट पूर्ण केला. मंत्र्यांनी सुध्दा गोविंदांचा उत्साह अधिक वाढविण्यासाठी ठिकठिकाणी सर्वांच्या सत्काराचा स्विकार केला. गोविंदा आला रे आलाच्या तालावर तरुणाईने धरलेल्या ठेक्यावर ना. विखे पाटील यांनाही मोह आवरला नाही. लहानग्या गोविंदांना उचलून घेत त्यांचाही उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला.

साई द्वारकामाई प्रतिष्ठान, ५०१ ग्रुप शिर्डी शहर, क्रांती व सन्मित्र युवक मित्र मंडळ यांच्यासह अनेक मंडळाना ना. विखे पाटील यांनी भेटी दिल्या. त्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिक, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेचे दत्तात्रय कोते यांच्या नेतृत्वाखाली जागृती युवक मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीराम फिटनेस गोविंदा पथकाने पटकावला. तसेच ना. विखे पाटील यांच्याहस्ते लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या महिलांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी महिला व पुरुष लकी ड्रॉ विजेत्यांना देखील बक्षीसांचे वितरण करण्यात आले.

या दहीहंडी उत्सवासाठी माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते, रमेश गोंदकर, नितीन कोते, एम्प्लॉइज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते, विलास कोते, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, निलेश कोते, काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चौगुले, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक गोंदकर, सोसायटी चेअरमन तान्हाजी गोंदकर, बाबासाहेब कोते, संग्राम कोते व शिर्डी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागृती युवक मंडळाच्या सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे परिश्रम घेतले.

आज संपूर्ण नगरपरिषद व नगरपंचायत मधील सवर्ग अधिकारी व सर्व कर्मचारी बेमुदत संपावर

आज संपूर्ण महाराष्ट्रातील नगरपरिषद व नगरपंचायत मधील सवर्ग अधिकारी व सर्व कर्मचारी यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. इतर राज्य शासकीय कर्मचारी यांना एकतर जुनी पेन्शन किंवा नवीन पेन्शन  योजना आता नव्याने येऊ घातलेली यूपीएस लागू असताना राज्यातील सुमारे 6000 संवर्ग अधिकारी व 60000 पेक्षा जास्त नपा कर्मचारी यांना कोणतीही पेन्शन लागू नाही. गेल्या अनेक वर्षांपासून  राष्ट्रीय निवृत्ती योजना येऊन देखील कित्येक नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी मयत पावले त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही लाभ मिळू शकलेला नाही. त्याचप्रमाणे एका बाजूला नगर विकास विभाग संवर्ग अधिकाऱ्यांना  शासकीय कर्मचारी दर्जा लागू करतो दुसऱ्या बाजूला वित्त विभाग शासकीय कर्मचारी नाहीत असे घोषित करून सेवार्थ आयडी देण्यास नकार देत आहे.तसेच इतरही मूलभूत मागण्या मान्य होत नाहीत.अशा परिस्थितीत राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यात कमालीचा असंतोष पसरल्याने  आज नाईलाजाने संपावर जावे लागत आहे. त्यामधे राहाता नगरपरिषदेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कर्मचारी या संपात आजपासून सहभागी होवुन राहाता नगरपरिषदे समोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. माननीय  मुख्यमंत्री महोदय यांच्या अखत्यारीत  नगर विकास विभाग येत असल्याने नक्कीच कर्मचाऱ्यांच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील असा कर्मचाऱ्यांना विश्वास आहे.

बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४

गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न....

शिर्डी 

विद्या प्रसारिणी सभेने एस.एस.सी आणि एच.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये 85% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शिवाजीनगर येथील रमा रमण कार्यालयामध्ये आयोजित केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.डॉ.वा.मा. औटी (अध्यक्ष विद्या प्रसारिणी सभा पुणे 5), प्रमुख पाहुणे श्री. डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग जिल्हा परिषद पुणे), मुख्य प्रमुख उपस्थिती श्रीम.डॉ. मृणालिनी गरवारे (अध्यक्षा नियामक मंडळ विद्या प्रसारिणी सभा), श्री.डॉ. सतीश गवळी (कार्यवाह), श्री. विजय भुरके (सहकार्यवाह) उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी डॉ. हिरेन निरगुडकर, श्री. अरविंद मेहता, श्री. कन्हैया भुरट, श्री. दिलीप सराफ, श्री. भगवानभाऊ आंबेकर (व्ही.पी.एस शाळा समिती अध्यक्ष) अॅड. संदीप अगरवाल, श्री. प्रमोद कुदळे श्री. केशव कुलकर्णी नियामक मंडळातील सदस्य उपस्थित होते, तसेच श्री. धीरूभाई टेलर (शाळा समिती सदस्य व्ही.पी.एस. लोणावळा) उपस्थित होते.

विविध विद्याशाखेंमधून 85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या जवळपास 40 विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कुमारी सुप्रिया भानवसे (व्ही.पी.एस हायस्कूल लोणावळा) विद्यार्थिनीने एस.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये (93.20%) गुण मिळवून सर्व विद्याशाखां मधून प्रथम क्रमांक पटकावला, कुमारी रसिका जोशी (भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे) विद्यार्थिनीने एच.एस.सी बोर्ड परीक्षेमध्ये (93.50%) मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.

विद्या प्रसारिणी सभेतर्फे सर्व शाखांमधून एस.एस.सी आणि एच.एस.सी बोर्ड परीक्षा मध्ये सर्वांत जास्त निकाल लागणाऱ्या विद्या शाखेला फिरता करंडक बहाल केला जातो. यंदाचा हा मान भारत इंग्लिश स्कूल शिवाजीनगर पुणे आणि व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा यांना मिळाला. संबंधित विद्या शाखांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फिरता करंडक बहाल करण्यात आले.
प्रमुख पाहुणे डॉ. भाऊसाहेब कारेकर, डॉ. मृणालीनी गरवारे आणि अध्यक्ष डॉ.वा.मा. औटी यांनी आपली मनोगते सादर केली. मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना अपार कष्ट करणे, प्रामाणिकपणा आणि देशावरचे प्रेम आबाधीत ठेवणे असा संदेश दिला.

कार्यक्रमासाठी विविध शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती वर्षा कुलकर्णी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. सतीश गवळी (कार्यवाह) यांनी उपस्थितांना करून दिला. कार्यक्रमाची सांगता श्री. धनंजय काळे यांच्या पसायदानाने झाली.

निधनवार्ता मंदाबाई खपके

निधनवार्ता 
मंदाबाई खपके

आंबी(वार्ताहर)राहुरी तालुक्यातील दवणगाव 
येथील ग.भा.मंदाबाई सदाशिव खपके(वय ६६ वर्षे) यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्य पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. त्या प्रकाश व शिवाजी सदाशिव खपके यांच्या मातोश्री तर, युवा नेतृत्व प्रफुल्ल खपके यांच्या आजी तसेच तांभेरे येथील सकाराम गागरे यांच्या भगिनी होत.

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा

गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा

शिर्डी प्रतिनिधी 

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला.
श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरातील स्‍टेजवर दिनांक २६ ऑगस्‍ट रोजी रात्रौ १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. त्‍यानंतर श्रींची शेजारती झाली.
तसेच आज सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपाचे स्‍टेजवर ह.भ.प. सौ. प्रज्ञा देशपांडे पळसोदकर, पुणे यांचे गोपालकाला किर्तन झाले. कीर्तनानंतर १२.०० वाजता समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री सर्जेराव अशोकराव पा. कोते यांच्‍या हस्‍ते दहीहंडी फोडण्‍यात आली.

यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर विभाग प्रमुख विष्‍णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव आनंदमय व भक्‍तीमय वातावरणात पार पडला.

राहाता सह्याद्री क्लबचे कार्य उत्तमच :- ला. गिरीश मालपाणी.

राहाता  सह्याद्री क्लबचे कार्य उत्तमच :-  ला. गिरीश मालपाणी.



  अवघ्या सहा महिन्यात स्थापन झालेला लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री याने अनेक चांगल्या सामाजिक ऍक्टिव्हिटी केल्या आहेत. मागील वर्षी सहा महिन्यातच 18 अँक्टिव्हीटी तर या वर्षीच्या दोन महिन्यातच  22 नावीन्यपूर्ण  ॲक्टिव्हिटी या क्लबने केल्या आहेत. त्यामुळे राहाता सह्याद्री लायन्स क्लब हा उत्तमच कार्य करत असल्याचे मत माजी प्रांतपाल तथा  मालपाणी ग्रुपचे विश्वस्त ला. गिरीश मालपाणी यांनी म्हटले आहे. ते लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पदग्रहण अधिकारी म्हणून  बोलत होते. क्लबच्या सर्व सदस्यांना त्यांनी शपथ दिली व  जगभर लायन्स क्लब करीत असलेल्या सेवाकार्याची माहिती दिली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड हे होते. तर मान्यवरांमध्ये शपथप्रदान अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट ॲडीशनल कॅबिनेट ट्रेझरर ला. सुधीरजी डागा, अतिथीमध्ये ग्रामसेवकांचे नेते तथा ढाकणे शैक्षणिक संकुलाचे संस्थापक  श्री. एकनाथराव ढाकणे, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर आय टी ला. धनंजय धुमाळ, झोन चेअरपर्सन ला. सुमित भट्टड हे होते. 
                   प्रास्तविकमध्ये प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड म्हणाले की ला. विनोद गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली राहाता सह्याद्री क्लब सुरू झाला. जनतेच्या गरजा ओळखून सेवा देण्याच्या उपक्रम  या क्लबने हाती घेतला. यामध्ये महिलांच्या गर्भाशय पिशवीचा कॅन्सर वाढू नये म्हणून केवळ जास्त पैशाअभावी उपचार न  घेणाऱ्या  महिलांसाठी शिबिरात  मोफत गर्भाशय पिशवीचे शस्त्रक्रिया केली तर इतर वेळी अत्यंत अल्पदरात शस्त्रक्रिया कानडे हॉस्पिटल येथे केशवसुत फाऊंडेशन व लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे वतीने घेण्यात येत आहे. जनतेचा ही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. साथीच्या काळात प्रतिकार शक्ती कमी होवू नये म्हणून मतिमंद मुलांना फळे वाटप, वेगवेगळे आरोग्य शिबिराचे आयोजन, मुलांना स्कूल बॅग वाटप, वृक्षारोपण व इतर कार्यक्रम राबविले.
            क्लब लीडरशिप  चेअरमन डॉ. दत्ता कानडे, ला. महेश गाडेकर ला. ज्ञानेश्वर नळे,  ला. विजय बनकर ,ला. मिलिंद कडलग, ऍड. ला. सुधीर बोठे, ला. सिराज शेख, ला. सत्यम सदाफळ, ला. मिनिनाथ तेलोरे, ला. बापू गायकवाड, यांनी पाहुण्यांचा सन्मान केला.  संस्थापक ला. विनोद गाडेकर यांनी क्लबच्या आर्थिक  अहवालाबरोबरच क्लब करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची माहिती दिली.  तर  सेक्रेटरी ला. सागर रोकडे यांनी अहवालाचे वाचन केले. ला. सुधीर डागा यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली व क्लब करत असलेल्या कामाची स्तुती केली. श्री. एकनाथराव ढाकणे, डी . सी. ला. धनंजय धुमाळ व  झोन चेअरमन ला. सुमित भट्टड यांनी क्लबच्या कामाचे कौतुक करून शुभेछ्या दिल्या.  कु. आरोही बोठे हिने प्रतिज्ञा दिली.
                    प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या एच आर ला. गायत्री म्हस्के यांच्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन झाले 
या सोहळ्यास शिर्डी क्लबचे प्रेसिडेंट ला. महेश वैद्य,   तंटामुक्तीचे उपाध्यक्ष श्री. खंडेराव कडलग, उद्योजक श्री. सुनील निकम,उद्योजक श्री. अनिल देसाई, श्री. सुधाकर वाघ, श्री. वेणूनाथ  शेलार,  ला. केतन कुंभकर्ण, ला.सुनील काळोखे, ला. सौ.रोहिणी गाडेकर ला. सौ. राजश्री फंड  ला. सौ. राजश्री रोकडे , मनीषा धाडगे, सुवर्णा बोठे, छाया नळे, प्रतीक्षा शेलार, संगीता शेलार हे उपस्थित होते.

साईभक्ताची "कथित फसवणूक" प्रकरणी कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी, दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

साईभक्ताची "कथित फसवणूक" प्रकरणी कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी, दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


आज सोशल मीडियावर जी बातमी फिरत आहे,एका साईभक्ताकडून 40 लाखाची फसवणूक साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी केली,अशी बातमी आली आहे.त्या संदर्भात शिर्डीतील सर्व युवकांनी आज  साईबाबा मंदिर कार्यकारी अधिकारी साहेबाना निवेदन देऊन सदर प्रकारनाची चौकशी करुन दोषी वर येत्या २ तारखि पर्यंत कारवाई करावी अन्यथा ३ तारखिला आम्ही १० युवक गेट नं ४ समोर आमरण उपोषन करनार आहोत हे निवेदन 
नितिन अशोक कोते, अविनाश गोंदकर , विकास गोरक्षनाथ गोंदकर ,किरण कोते , महेश गोंदकर, अमोल ( नंदु ) कोते, विकास रमेश गोंदकर, प्रकाश गोंदकर, प्रतीक शेलके, अमोल सुपेकर, प्रसाद बावचे, सागर पोटे, अभिजीत गोंदकर, प्रसाद सुरांजे, डॉ सुयोग गोंदकर,चेतन कोते, वैभव कोते,
अनिल त्रिभुवन,साईं कोतकर,अक्षय कोते, 
अभिजीत कोते,राज राजपूत , निलेश शिंदे,विकास कोते, ताराचंद कोते,दिनेश गुजर,अशोक गायके, अमोल पोपट गायके, दीपक रमेश गोंदकर, सचिन शिंदे , मारूती पाटील सर्वांच्या वतीने देन्यात आले

सोमवार, २६ ऑगस्ट, २०२४

वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार सहकाराला ऊर्जादायी - खा.वाकचौरे -

वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार सहकाराला ऊर्जादायी - खा.वाकचौरे 
-


शिर्डी प्रतिनिधी 

वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेचा 9 वा वर्धापन दिन व दशकपूर्ती वर्षात पदार्पण सोहळा नुकताच शिर्डी येथील हॉटेल शांतीकमल'च्या प्रशस्त कॉन्फरन्स हॉलमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे उपनेते, प्रबोधन कुर्ला विद्यालयाचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना खासदार वाकचौरे यांनी सहकाराला संजीवनी देणारा "वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार" दरवर्षी देऊन आपल्या सभासदांप्रति ऋण व्यक्त करणारा उपक्रम नक्कीच सहकारासाठी ऊर्जादायी असल्याची भावना व्यक्त केली. तर प्रमुख अतिथी आदरणीय भाऊंनी संस्थेचा प्रवास थक्क करणारा असून मा.संचालक मंडळाचे कौतुक करत मुंबईला शाखा काढणार असाल तर सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
सर्वप्रथम दीपप्रज्वलनाने कार्यक्रमांची सुरुवात झाली. यावेळी मागील आर्थिक वर्षात दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वार्षिक सभेच्या नोटीशीचे वाचन करत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर मा.संचालक मंडळाच्या वतीने पहिला "वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार" संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक आदर्श सभासद म्हणून आदरणीय शंकरराव सूर्यभान वाणी यांना सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर संस्थेच्या 9 व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. प्रथम संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी प्रास्ताविक करत कोरोनानंतर संस्थेची वाटचाल आणि सहकार क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणीबाबत विस्तृत विवेचन केले. यापुढे दशकपूर्ती वर्षापासून सभासदांच्या हिताचे काही संकल्प करत दरवर्षी आदर्श सभासद पुरस्कार देण्याबाबत आणि या वर्षापासून आपल्या सर्व सभासदांना 6% लाभांस आणि एक भेटवस्तू देणेबाबत मा.चेअरमन यांनी घोषणा करताच सर्व सभासदांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी प्रमुख मान्यवरांपैकी अमृतसंजीवनीचे चेअरमन पराग संधान साहेब, शिर्डी पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख साहेब, वैष्णवीमाता पतसंस्थेचे चेअरमन अशोक मामा थोरे, मानद डॉक्टरेट ऍड. वसंतराव ठोंबरे सर आदींनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. यावेळी प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या सर्व संचालक मंडळासह मुंबई येथील प्रगतीशील व्यावसायिक व्हा.चेअरमन राजेश धमेजानी, जेष्ठ सभासद भाऊसाहेब पाटील सिनगर, ज्ञानेश्वर पाटील सिनगर, शहाराम पाटील सिनगर यांच्यासह साईबाबा संस्थान एम्प्लॉयीज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, युवा नेते रोहित वाकचौरे, जेष्ठ पत्रकार रजनीश राणे सर, अशोक पवार, दत्ता कडू, अनंत निकम,कैलास  माने, रंजन जाधव, पप्पू पडियार, गणपत गोंदकर, धोंडीराम धट, संतोष मुळम, साहेबराव सिनगर, योगेश माने, दिनकर सिनगर, अनुप गोंदकर, रविंद्र जाधव सर, नारायण पवार, मच्छिन्द्र बागल यांच्यासह बचत गटाच्या महिला व सभासद बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर सर्व सभासदांसाठी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि आधार ब्लड बँकेच्या सौजन्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, ज्यात सभासदांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवीला. यावेळी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संस्थेचे संचालक सर्व श्री. बाजीराव जी,  शेवाळे, दीपक जी धट, अच्युत जी सिनगर, अतुल जी लोहाटे, मिलिंद जी नाईकवाडी, भागवत जी चोळके, सौ. सारिका सिनगर, सौ. वनिता गोंदकर, कार्यकारी संचालक बळीराम सिनगर, सरव्यवस्थापक गणेश वाळुंज, विभागप्रमुख अनिल कापसे यांच्यासह सर्व शाखेचे कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
सूत्रसंचालन नरेश पाटील सर यांनी तर संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी सर्वांचे आभार मानले.

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषयाच्या राज्य कार्यकारिणी जिल्हाध्यक्षपदी. डॉ.शरद दुधाट




लोहगाव (वार्ताहर )राहाता तालुक्यातील प्रवरनगर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे प्रा.शरद दुधाट यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
 महाराष्ट्र राज्य मराठी विषय राज्य कार्यकारिणीची आभासी बैठक अध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीमध्ये सचिव प्रा. बाळासाहेब माने यांनी राज्याच्या मुख्य कार्यकारणीसह मराठी विषयाची ३५ जिल्ह्यांची जिल्हाध्यक्षांची निवड या कार्यकारणीमध्ये जाहीर केली. मराठी विषय राज्य कार्यकारिणीसाठी अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शरद दुधाट यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. 
        या निवडीबद्दल जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, उपाध्यक्ष अरुण कडू, जनरल बॉडी सदस्य एकनाथ घोगरे, मराठी राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. सुनील डिसले, सचिव प्रा. बाळासाहेब माने, सहसचिव प्रा. डॉ. स्मिता भुसे, प्राचार्य अंगद काकडे, उपप्राचार्य अलका आहेर, मुख्याध्यापिका सिंधू क्षेत्रे, प्रभारी पर्यवेक्षक संजय ठाकरे, सुभाष भुसाळ, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष सोपानराव कदम, सचिव सुनील गोरे, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, कोंडीराम नेहे, बाबासाहेब अंत्रे आदींसह शिक्षक प्राध्यापक ग्रामस्थ विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

रविवार, २५ ऑगस्ट, २०२४

शिर्डीत मंगळवारी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

शिर्डीत मंगळवारी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन

शिर्डी 

मंगळवारी गोपाल काल्यानिमित्त जागृती युवक मंडळाच्यावतीने मानाची दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम बक्षीस मिळवणाऱ्या स्पर्धकांना १ लाख ५० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे. उत्सवासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने भरघोस सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये शिर्डी शहरातील व पंचक्रोशीतील सर्व कलाकारांना स्टेज उपलब्ध असणार आहे. महिला प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. लकी ड्रॉ विजेत्या महिलेस प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्याकडून सोन्याची नथ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. द्वितीय लकी ड्रॉ विजेत्या महिलेस माजी उपनगराध्यक्ष गोपिनाथ गोंदकर यांच्यावतीने पैठणी साडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे व तृतीय लकी ड्रॉ विजेत्या महिलेस भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष विकास गोंदकर यांच्या वतीने गॅस शेगडी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरूष प्रेक्षकांसाठी लकी पुरूषास युवा शिर्डीचे किरण कोते यांच्यावतीने रेंजर सायकल, कॉर्ड डान्स स्पर्धेत तिन्ही क्रमांकासाठी माजी  उपनगराध्यक्ष निलेश कोते यांच्यावतीने ५ हजार द्वितीय बक्षीस ३ हजार व तृतीय बक्षीस २ हजार देण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेतील पात्र भगिनींना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जागृती युवक मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय कोते, रावसाहेब देशमुख, उपाध्यक्ष कैलास भुजबळ, रुपेश देवकर, पांडुरंग गिरी, ज्ञानेश्वर जगदाळे, राहुल देशमुख, सुरेश सोनवने, सुनील देशमुख, त्रंबक मोहीते, दामोधर उमाप, कुणाल सांबारे, सचिन देशमुख, भिमा गाजरे, विशाल गुलदगड, दीपक शेलार, हरिभाऊ पाटोळे, संपत हतांगळे, प्रशांत ठोंबरे, गोरख पवार, ज्ञानेश्वर पवळे, महेश गायकवाड, सनी देशमुख, प्रसाद देशमुख, साई सोनवणे, किरण गुलदगड, यश कोते, मिरा वर्मा आदी प्रयत्नशिल आहेत.

शनिवार, २४ ऑगस्ट, २०२४

राज्य सरकारने जाहीर केलेले दुधाचे 5 रुपये अनुदान त्वरीत जमा करावे- संजय शिंदे पाटील,

राज्य सरकारने जाहीर केलेले दुधाचे 5 रुपये  अनुदान त्वरीत जमा करावे- संजय शिंदे पाटील,



शिर्डी प्रतिनिधी 

संपुर्ण राज्यातील दुध उत्पादक शेतकरी गेली अनेक दिवस दुध व्यवसाय तोट्यात असताना आपल्या गोमातेची सेवा करत आहे,शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दुधाचे दर मागील काही महिन्यांन पासून 22  रुपयांच्या खाली आलेले होते,
अशा परिस्थितीतही शासनाने चारा व पशुखाद्यांचे दर कमी केले नाही,
 त्यामुळे राज्यभरातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात असताना दुध दरवाढीसाठी आमच्यासह अनेकांनी मोर्चे आंदोलने केले होते,  राज्य सरकारने दुध दरवाढ व अनुदानाचा निर्णय घेतला नि 5 रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केले,परंतु ते अनुदान शासनाने अद्यापही दुध उत्पादकांना जमा केलेले नाही,तरी जाहीर केलेले अनुदान थेट दुध उत्पादक शेतक-यांचा बॅक खात्यात कुठल्याही अटी शर्ती न घालता त्वरीत जमा करावे अशी मागणी  प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष  श्री.संजय शिंदे पाटील यांनी केली,
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, शासन निर्णयात म्हटले होते की, राज्यातील खासगी तसेच सहकारी दुध संघांनी एक जुलै पासून ३.५ फँट व ८.५ एसएनएफ गुणप्रत असलेल्या दुधाला प्रती लिटर ३० रू. दर द्यावा व राज्य सरकार
प्रति लिटर 5 रुपये अनुदान देईल,त्या
नुसार राज्यातील बहुतांश दुध संघांनी शासन निर्णयानुसार दर देण्यास सुरुवात केली,मात्र राज्य शासनाने जाहीर केलेले 5 रुपये प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही,पुढे बोलताना शिंदे पाटील म्हणाले
नाशिक विभागाचे दुग्ध विकास आयुक्त याच्याकडे ज्या ज्या दुध संघांच्या फाईल्स दाखल झालेल्या आहेत,त्या त्या संघांना दुध घालणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर त्वरीत अनुदान जमा करावे,शासनाने यामंधे लक्ष घालुन प्रत्येक दुध संघांनी लवकरात लवकर फाईल्स दुग्ध विकास आयुक्त  यांच्याकडे सादर कराव्या असे लेखी आदेश देऊन दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर विनाअट त्वरीत अनुदान जमा करुन
कष्टकरी दुध उत्पादक शेतक-यांना सहकार्य करावे अशी विनंती करुन मागणी  श्री.संजय शिंदे पाटील यांनी केली,

लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडका पत्रकार: महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी महायुती सरकार निर्णय घेणार?

लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडका पत्रकार: महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी महायुती सरकार निर्णय घेणार?




महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर, नागपूर दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा ही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. आंदोलनानंतर महायुती सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रसंगी, राज्याचे मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांना आश्वासन दिले की, त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल आणि योग्य निर्णय घेतले जातील. लाडकी पत्रकार ही योजना सुरू करणार असे आश्वासन नामदार लोढा यांनी दिले

या पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने ना. चंद्रकांत दादा पाटील, ना. मंगलप्रभात लोढा आणि माजी मंत्री आ. पंकजाताई मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांमध्ये पत्रकारांच्या शाश्वत सुरक्षिततेसाठी विशेष योजना लागू करण्याची मागणी होती. यावर प्रतिक्रिया देताना ना. मंगलप्रभात लोढा यांनी आठ दिवसांत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या समवेत बैठक घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

"एक वज्र मुठ, एक संघटन, दोन नेते" अशा घोषणांनी पत्रकारांच्या या आंदोलनाला बळ मिळाले आहे. राज्यातील पत्रकारांनी आता शाश्वत लढाईत उतरण्याचा निर्धार केला आहे. महायुती सरकारने याची दखल घेतली असून, "अबकी बार पत्रकारांना होणार शाश्वत लाडका पत्रकार योजना" अशी अपेक्षा पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.

या पत्रकार संवाद यात्रेचे नेतृत्व वसंत मुंडे, संजय भोकरे, डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले, मात्र ही लढाई केवळ त्यांची नसून, संपूर्ण राज्यातील पत्रकारांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही लढाई पुढे नेण्यात येणार आहे.

सरकारकडून यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, या निर्णयाचा राज्यातील पत्रकारांच्या भवितव्यावर मोठा प्रभाव पडणार आहे. "लाडकी बहीण, लाडका भाऊ" या संज्ञांचा वापर आता "लाडका पत्रकार" योजनेवर होण्याची अपेक्षा सर्वत्र आहे, ज्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक त्वरित होईल.

श्री गणेश विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न

श्री गणेश विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न



रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेत दिनांक 24/08/2024 शनिवार  रोजी सकाळी गुरुकुल उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन याचे महत्त्व समजावे म्हणून शारदा विद्या मंदिर राहाता येथील तज्ञ अध्यापक श्री जोशी बी एस सर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करायचे असेल तर *आत्मविश्वास, त्यागीवृत्ती,कठीण परिश्रम* या  त्रिसुत्रीच्या जोरावर यश मिळवता येते असे सांगून शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांचे  महत्व सांगितले.कठिण प्रश्न सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्या सांगितले.
सुरुवातीला गुरुकुल विभाग प्रमुख श्री कैलास भोये  सर यांनी विद्यालयातील गुरुकुल उपक्रमांतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी शालेय स्पर्धा परीक्षा या मुलांना आपल्या भविष्यातील ध्येय सिद्धीकडे घेऊन जाण्यासाठी मदत करतात असे सांगून या मिळालेल्या संधीचे मुलांनी सोने केले पाहिजे असे समजावले.
 या उपक्रमाचे स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य श्री रावसाहेब पांडुरंग गाढवे, श्री अण्णासाहेब कोते, श्री दादासाहेब गाढवे, श्री जयाभाऊ कालेशेठ,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अनिल काका गाढवे पाटील,संदिप  गाढवे,मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले. शेवटी श्रीमती वराडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४

वरिष्ठ पत्रकार विशाल रायते यांच्या झाडे देऊन अनोखा वाढदिवस साजरा-प्रा. मोतीलाल सोनवणे




वरिष्ठ पत्रकार विशाल रायते यांच्या झाडे देऊन अनोखा वाढदिवस साजरा-प्रा. मोतीलाल सोनवणे
शिर्डी प्रतिनिधी : 

  न्याहाळोद येथील कुस्तीचे भीष्माचार्य देविदास जयराम रायते यांचे सुपुत्र,आदर्श पत्रकार विशाल रायते यांच्या वाढदिवस आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या घरी निसर्गरम्य बगीचा मध्येशाल,श्रीफळ,बुके,पिंपळ, चिक्कू अशोक वृक्ष देऊन वाढदिवस  साजरा करण्यात आला.ज्या वेळी त्यांनी कार्यक्रमात प्रवेश केला त्यावेळी टाळ्या वाजवून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात.आले.त्यावेळी आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असे वातावरण निर्माण झाले होते.झाडे ही माणसाला ऑक्सिजन,फुले,फळे,लाकूड
अन्न,औषधे,सावली,देतात.पक्षी व प्राणी यांना निवारा देतात. झाडांमुळे पाऊस पडत असल्यामुळे जास्तीत जास्त झाडे लावावीत म्हणून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.
    वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रा.मोतीलाल सोनवणे म्हणाले की,विशाल शब्दाचा अर्थच भव्य आणि दिव्य आहे.त्यांच्या नावातच भव्यता आणि दिव्यता आहे.ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात.त्यांचे भावी आयुष्य सुखाचे,समृद्धीचे,आणि भरभराटीचे जावो अशाप्रकारे सदिच्छा व्यक्त केल्या.अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या माजी सरपंच कैलास गोविंदा पाटील यांनी लहान मुलं हे मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात त्यांना हवा तो आकार देऊ शकतो.लहान मुले संस्कारक्षम असतात त्यांच्यावर लहानपणी चांगले संस्कार करू शकतो.त्यांनी नमस्कार का करतात याचे महत्त्व पटवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे त्यांनी झाडाचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना वाढवण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली व शेतात ती झाडे लावली.विशाल रायते यांनी सर्वांची कृतज्ञता व्यक्त केली.
    यावेळी माजी सरपंच अण्णा पवार,प्रशांत अहिरे,गणेश काकु ळदे,मोनल चित्ते,सोनल चित्ते, नेहा निळे, चैतन्य ओतारी,परी वाकडे,आरश भील, फुगी कोळी, यश काकुळदे,बबन बोरसे, प्रफुल्ल बोरसे,महेश ओतारी, विष्णू भिल,कुंदन मोरे,सुनील कोळी,गायत्री भिल,होम निकम, भावेश चव्हाण,पवन कोळी,हरी शिरसाठ इत्यादी उपस्थित होते.

वरिष्ठ पत्रकार विशाल रायते यांच्या झाडे देऊन अनोखा वाढदिवस साजरा-प्रा. मोतीलाल सोनवणे

वरिष्ठ पत्रकार विशाल रायते यांच्या झाडे देऊन अनोखा वाढदिवस साजरा-प्रा. मोतीलाल सोनवणे

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साई 9 ग्रुपचे संचालक साईराज गायकवाड यांचा सत्कार

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साई 9 ग्रुपचे संचालक साईराज गायकवाड यांचा सत्कार


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित सन्मान महाराष्ट्राच्या गुणवंतांचा... श्री शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2024 या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराष्ट्रातील मेडिकल विभागात मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर , क्रिडा विभाग व सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांचा सत्कार करून फाऊंडेशन तर्फे महाराष्ट्राच्या युवा नेतृत्व या पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी पद्मश्री राहिबाई पोपरे खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब, शेतकरी संघटनेचे नेते श्री रविकांतजी तुपकर साहेब, रोहीत वाघचौरे तसेच महाराष्ट्रा भरातून आलेले विविध क्षेत्रातील पुरस्कारर्थी मान्यवर तसेच फाऊंडेशन चे चेअरमन डॉ.ज्ञानेश्वर सानप,हर्षवर्धन सातपुते, गणेश सांगळे, रोशन सानप,मच्छिंद्र भवन आदि सहकारी उपस्थित होत

मा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची श्री साई संस्थान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि शिर्डी येथे सदिच्छा भेट

मा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची श्री साई संस्थान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि शिर्डी येथे सदिच्छा भेट


शिर्डी

आज श्री साईनाथ औद्योगिक सोसायटी, शिर्डी यांचे वतीने मा.श्री राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर (मा. भाजपा जिल्हाध्यक्ष )यांनी
 श्री साई संस्थान एम्प्लाईज क्रेडिट को-ऑफ. सोसायटी लि. शिर्डी येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी सत्कार करतांना संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हा.चेअरमन पोपटराव कोते  संचालक राम गागरे ,मिलिंद दुनबळे, रवी गायकवाड सभासद शंकर आरणे व सचिव नबाजी डांगे उपस्थित होते.
तसेच यावेळी श्री साईनाथ औद्योगिक सोसायटीच्या वतीने निवेदन देताना व्हा.चेअरमन  सोमनाथ काजळे, संचालक ,राजेश शर्मा,  अशोक पवार, किरण बोराडे उपस्थित होते

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०२४

संगमनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचा प्रमुख भारती दीदी व पद्मा दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा

संगमनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचा प्रमुख भारती दीदी व पद्मा दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सोहळा उत्साहात साजरा


शिर्डी 

                          रक्षाबंधन सणानिमित्त हाताला बांधला जाणारा स्नेहधागा अर्थात राखी ही बहीण भावांच्या सर्वश्रेष्ठ नात्याचे प्रतीक असून हा स्नेहाचा धागा बहिणींना जिव्हाळा प्रेम आपुलकी जपण्यासाठी तर भावाला कर्तव्याची सुरक्षिततेची कायमस्वरूपी आठवण व जाणिव ठेवण्याकरिता पवित्र बंधन रुपी असतो असे प्रतिपादन शिर्डी येथील प्रजापिता ईश्वरीय विद्यालयाच्या योगिनी दीदी यांनी केले आहे.
       राखी पौर्णिमा सणानिमित्त प्रजापती ईश्वरीय ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीने सर्वत्र रक्षाबंधन सन साजरा केला जातो.संगमनेर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या प्रमुख   भारती दीदी. व पद्मा दीदी. यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी केंद्रातील योगिनी दीदी यांनी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे तसेच शिर्डी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार निस्सीम साईभक्त रमेश भाऊ गोंदकर या सर्व बांधवांना आत्मिक स्मृतीचे तिलक लावून रक्षाबंधनाचा स्नेहाचा धागा बांधला योगिनी दीदींनी सर्व बांधवांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी साईबाबा चरणी प्रार्थना केली शासकीय अधिकारी तसेच कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करताना आपल्या संस्कृतीत  रक्षाबंधन चे असलेले विशेष महत्त्व यावेळी योगिनी दीदी यांनी विशद केले सर्व बांधवांना स्नेहाच्या धाग्या बरोबरच ईश्वरीय शिवबाबा ची प्रतिमा भेट स्वरूपी देण्यात आली .या राखी बंधन सोहळ्याप्रसंगी बोलताना शिर्डी शहरातील धार्मिक व सामाजिक कामात  अग्रेसर असलेले रमेश भाऊ गोंदकर म्हणाले की आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे प्रत्येक सण व उत्सवाचे एक वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व व पावित्र्य आहे याचे महत्त्व आपणास संत महंत साध्वी यांच्या कडून तसेच कुटुंबातील ज्येष्ठां कडून समजते रक्षाबंधन हा सण बहिण भावाचे अतूट बंधन व नाते जपणारा धागा आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या माध्यमातून योगिनी दीदी व ओम शांती परिवार अध्यात्मिक संस्कृती व संस्कार रुजविण्याचे पवित्र कार्य करताहेत प्रत्येक सणावाराचे महत्त्व व अनमोल विचार या संस्कारा द्वारे ओम शांती परिवार देशभर देत आहेत ही आपणा सर्वांचे तसेच राष्ट्रहित व भारतीय संस्कृतीचे दृष्टीने महत्त्वाची बाब आहे धर्म कार्यास वाहून घेतलेल्या तपस्वी साध्वीं भारती दीदी. पद्मा दीदी .योगिनी दीदी. यांच्या शुभहस्ते आशीर्वाद रुपी स्नेहाचा धागा मिळाला हे  आपल्या सर्वांच्या दृष्टीने फार मोठे भाग्य लाभले असल्याचे रमेश भाऊ गोंदकर यांनी सांगितले.

बुधवार, २१ ऑगस्ट, २०२४

काशी कानंद जी महाराज यांच्या आश्रमात कृष्णा सोपान पेखळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

काशी कानंद जी महाराज यांच्या आश्रमात कृष्णा सोपान पेखळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार


शिर्डी 

काशीकानंदजी महाराज यांच्या आश्रमात कृष्णा सोपान पेखळे यांचा वाढदिवसानिमित्त काशीकानंदजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समवेत सोपान पेखळे, संगीता पेखळे, श्रेया पेखळे, ठकाजी काटकर, नवनाथ जी थोरे व पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

रक्षाबंधना निमित्त वृद्धाश्रमाला भेट

रक्षाबंधना निमित्त वृद्धाश्रमाला भेट




शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 

विद्या प्रसारिणी

सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयातर्फे दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त लोणावळा परिसरातील पोलीस स्टेशन, पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा आणि अंधवृद्धाश्रम या ठिकाणी भेटी देऊन रक्षाबंधन साजरे केले जाते.

या वर्षी प्रशालेच्या स्काऊट आणि गाईड विद्यार्थिनींनी वरसोली येथील स्वामी रामानंद ट्रस्टलां भेट दिली. तेथील वृद्धाश्रमातील आजी- आजोबांना राख्या बांधल्या आणि मिठाईचे वाटप करून रक्षाबंधन साजरे केले.
या वर्षी प्रशालेच्या स्काऊट आणि गाईड विद्यार्थिनींनी वरसोली येथील स्वामी रामानंद ट्रस्टलां भेट दिली. तेथील वृद्धाश्रमातील आजी- आजोबांना राख्या बांधल्या आणि मिठाईचे वाटप करून रक्षाबंधन साजरे केले.

आश्रमातील जवळपास ऐंशी आजी - आजोबांना राख्या बांधून विद्यार्थिनींनी त्यांचे आशीर्वाद घेतले. आजी-आजोबांनी देखील विद्यार्थ्यांना भरभरून आशीर्वाद दिले.

विद्यार्थिनींनी राख्या बांधल्यानंतर आजी-आजोबांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू वाहताना दिसले. शाळेने घेतलेल्या उपक्रमाबद्दल आजी- आजोबांनी शाळेचे आभार मानले.

कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट लीडर श्री. संजय पालवे यांनी केले. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे गाईड कॅप्टन श्रीमती वैशाली तारू, प्रशालेच्या शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर आणि ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर उपस्थित होते.

अनोख्या उपक्रमाबद्दल नियामक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. मृणालीनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके आणि नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा प्रशासन यांचे कौतुक केले.

साईसेवा मतिमंद विद्यालयातील विशेष विद्यार्थिनींकडून रक्षाबंधन साजरा

साईसेवा मतिमंद विद्यालयातील विशेष विद्यार्थिनींकडून रक्षाबंधन साजरा



शिर्डी प्रतिनिधी 

   आज दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला-मुलींची शाळा शिर्डी येथील विद्यार्थिनींकडून शिर्डी परिसरात रक्षाबंधन साजरे करण्यात आले. 
    रक्षाबंधन म्हणजे रक्षण करण्याचे बंधन .रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. हा सण मराठी महिन्याच्या श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. रक्षाबंधन हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा करतात. या सणाचेच औचित्य साधून साईसेवा मतिमंद विद्यालयातील विद्यार्थिनींकडून शिर्डी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचे औक्षण करून राखी बांधण्यात आली. 
   त्यामध्ये शिर्डी विभागाचे खासदार श्री भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब, शिर्डी नगरपंचायतचे प्रथम माजी नगराध्यक्ष श्री कैलास बापू कोते साहेब, पुढारी वृत्तपत्र शिर्डी पत्रकार श्री प्रवीणजी टाटू, रोटरी क्लब ऑफ शिर्डीचे अध्यक्ष श्री निलेशजी गंगवाल व संचालक, शिर्डी नगरपंचायतचे कार्यकारी अधिकारी श्री दिघे साहेब, शिर्डी नगरपंचायत शिर्डीचे नगराध्यक्ष श्री शिवाजीभाऊ गोंदकर, शिर्डी प्रहार संघटनेचे अध्यक्ष श्री कैलास भाऊ यादगुडे व दिव्यांग बांधव, नगरसेवक नितीनभाऊ कोते, अशोकभाऊ गोंदकर तसेच हॉटेल साईदीप विलासचे मालक व पंचमुखी गणपती मंदिराचे ट्रस्टी श्री एच. पी. शर्मा साहेब, श्री बस स्थानक व्यवस्थापक व विभाग, साईबाबा स्तवन मंजिरी पठण करणारे सर्वेसर्वा शिर्डीतील डॉ. धनंजयजी जगताप, साई सेल्स कार्पोरेशन मालक श्री कमलेशजी धाडीवाल साकुरी (राहाता) या सर्वांचे निवासस्थानी जाऊन रक्षाबंधन साजरे करण्यात आले तसेच या विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
    हा सर्व कार्यक्रम विद्यालयातील विशेष शिक्षक श्री नासीर देशमुख सर, कलाशिक्षक श्री मंगेश वाकचौरे सर तसेच श्री शंकर सोनवणे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

धनगरवाडी येथे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे उत्साहात स्वागत

धनगरवाडी येथे गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांचे उत्साहात स्वागत



धनगरवाडी  

तालुक्यातील धनगरवाडी येथे श्री क्षेत्र गोदा धाम सराला बेटाचे मठाधिपती गुरुवर्य रामगिरीजी  महाराज यांना समर्थन देण्याकरीता गोंधवणी लबडे पेट्रोल पंप येथुन धनगरवाडी ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ यांनी भव्य मोटरसायकल रॅली काढुन दिघी गावातुन धनगरवाडी येथे आगमन झाले असता भव्य फटाक्याची आतिषबाजी व  जेसीबीतुन फुलांचा वर्षाव करण्यात आला. तरुणांनी जय श्रीराम, जय श्रीराम घोषणा देत परिसर दणाणुन
 सोडला. यावेळी त्यांच्या समवेत मधुकर महाराज, रामभाऊ महाराज, नवनाथ महाराज म्हस्के, भगवान महाराज डमाळे, नवनाथ महाराज आंधळे, वैभव महाराज भराडे, आदित्य महाराज आदमाने, चेतन महाराज मंडलिक, दत्तात्रय महाराज रक्टे, अशोक महाराज ठेंग, सरला बेटाचे चोपदार जानकुनाना आदमाने,  राजेंद्र रक्टे विठ्ठल राशिनकर, पुंजा रक्टे, ज्ञानदेव आदमाने शिवाजी राशिनकर केरु रक्टे ,दगडु रक्टे, रामभाऊ रक्टे, सरपंच गोपीनाथ खरात ,उपसरपंच साहेबराव आदमाने ,तंटामुक्ती अध्यक्ष अनिल रक्टे, संभाजी आदमाने, अंबादास रक्टे, मेजर साईनाथ राशिनकर अनिल रक्टे, अशोक रक्टे नामदेव राशीनकर, गणेश राशिनकर, ज्ञानेश्वर सोडणार, भैय्यासाहेब गोरे, अशोक भडांगे ,संदीप गायकवाड  इत्यादी तरुण मित्र मंडळ मोठ्या संख्येने रॅलीमध्ये उपस्थित होते.

श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने सहावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी च्या वतीने सहावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर  संपन्न 




नेत्रसेवा 
हीच साईसेवा
 साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नविन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने  दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी  सहावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर साई9 ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले.
यावेळी उपस्थित शंकरा आय हॉस्पिटल चे श्री.डॉ प्रकाश पाटील व डॉ. सौ. अश्विनी पवार  व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
18 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या शिबिरात जवळपास 980 रुग्णांची मोफत तपासणी होऊन 70 पेशंट ला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी मुंबई येथे नेण्यात आले. शिर्डी शहर व परिसर तसेच कल्याण, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर , धुळे,  वैजापूर, जालना, मालेगाव,जळगाव, श्रीरामपूर, नाशिक, नेवासा,राहाता, कोपरगाव,आशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत 5400 गरजू व वयोवृद्ध  रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला. व आत्तापर्यंत  439 पेशंट ची  मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शंकरा आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे  यशस्वीरित्या पार पडली. ट्रस्ट चे हे कार्य अल्पावधीतच  भारतात नावारूपास येत आहे. अशा  प्रकारची सेवा ट्रस्ट च्या वतीने अविरतपणे सुरू राहील व  29 सप्टेंबर 2024 रोजी सुद्धा सातवे मोफत शिबीर आयोजित केले असून याचा फायदा देशातील अनेक  गरजूंनी घ्यावा असे आवाहन  ट्रस्ट चे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे- गायकवाड पाटील केले. 
कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी ट्रस्ट च्या विश्वस्त सौ.संगीता गायकवाड पाटील व साई9 ग्रुप चे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४

जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा






धनगरवाडी  तालुक्यातील 
जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा धनगरवाडी येथे 78 वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
      सर्वप्रथम जि.प.शाळा धनगरवाडी येथून प्रभातफेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणा,भारत देशाचा जयजयकार यामुळे वातावरण प्रसन्न बनले.
     ग्रामपंचायत कार्यालय धनगरवाडी येथे धनगरवाडी गावचे सरपंच गोपीनाथ खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ग्रामपंचायत येथून प्रभातफेरी जिल्हा परिषद शाळा धनगरवाडी येथे आली. सर्व पदाधिकारी,ग्रामथ व पालकवर्ग शाळेत ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित झाले.
      शाळेचे मुख्याध्यापक शरद होडगर सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.धनगरवाडी गावचे उपसरपंच साहेबराव आदमाने यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठलराव राशिननकर यांची निवड करण्यात आली.माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राजू रक्टे, अशोक रक्टे,गणेश राशिनकर,माजी उपसरपंच अनिल रक्टे, रंगनाथ राशिनकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जितेंद्र भोंडे, उपाध्यक्ष गणेश राशिनकर,पत्रकार बाबासाहेब मंडलिक,अंबादास रक्टे, संजय राशिनकर,दिगंबर रक्टे, प्रकाश लांडे,चंद्रभान रक्टे, हरिभाऊ रक्टे, सोपान आदमाने,संभाजी आदमाने,ग्रामविकास अधिकारी सरला कहार मॅडम आदि प्रमुख्य मान्यवरांच्या उपस्थितीत धजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
     शाळेतील विद्यार्थिनी कु.सायली रक्टे व धनश्री राशिनकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.बालचित्रकला स्पर्धेत तालुकास्तरावर क्रमांक मिळविल्याबद्दल अथर्व गीताराम आदमाने यास चित्रकला सेट बक्षीस देऊन त्याचे अभिनंदन करण्यात आले.पालकांच्या वतीने उपाध्यक्ष गणेश राशिनकर,उपसरपंच साहेबराव आदमाने यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील विविध उपक्रम,गुणवत्ता याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
    कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.शिक्षक बंडू कोरडे यांनी आभार मानले.ग्रामपंचायत धनगरवाडी यांनी विद्यार्थ्यांना खाऊची व्यवस्था केली.संपत रक्टे, नानासाहेब रक्टे, संजय राशिनकर,संपत भुसारी यांनी  खाऊसाठी सहकार्य केले.
     कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिक्षक विजय जगताप,किशोर जगताप,अनिल धिरडे,गीता गलांडे,विवेक मोरे,अंगणवाडी ताई मंदाबाई रक्टे, वैशाली आदमाने ,ग्रामपंचायत कर्मचारी विलास साळुंके तसेच मदतनीस इंदूबाई बागडे,कविता माळी यांनी सहकार्य केले.

साईमाऊली परिवारकडून श्री साईबाबांना साधारण ३५ किलो वजनाची ३६ फुट लांब व ०५ फुट रुंद अशी भव्‍य राखी समर्पित केली...

साईमाऊली परिवारकडून श्री साईबाबांना साधारण ३५ किलो वजनाची ३६ फुट लांब व ०५ फुट रुंद अशी भव्‍य राखी समर्पित केली...




शिर्डी..राजेंद्र दूनबळे.


रक्षाबंधना निमित्‍त छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून श्री प्रबोधराव यांनी श्री साईबाबांना साधारण ३५ किलो वजनाची ३६ फुट लांब व ०५ फुट रुंद अशी भव्‍य राखी समर्पित केली. या बद्दल प्रबोधराव यांनी सांगितले की, ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी १० दिवसांत बनवली असून यामध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदींचे काम करण्यात आले आहे. श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाणींची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहेत. प्रत्येक नाणे श्रीमद भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते, तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे. या राखीचे श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने  मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ वंदिना गाडीलकर,  उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ ज्‍योती हुलवळे  तसेच राखी देणगीदार साईभक्‍त प्रबोधराव यांचे हस्‍ते विधीवत पुजन करणेत आले. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते.

वाकडी शिव येथे अखंड हरिनाम सप्ताह


वाकडी शिव येथे अखंड हरिनाम सप्ताह


धनगरवाडी 

तालुक्यातील वाकडी खंडोबाची, राजुरी ममदापूर शिवावर  चालू होणारा अखंड हरिनाम सप्ताह योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज व समर्थ किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह वर्षा 53 वे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायण तसेच  महादेव मंदिर जीर्णोद्धार, श्री गणेश, शिवलिंग पिंड, नंदी, कासव, शिवाआई स्थापना सोहळा  शनिवार दिनांक २४/८/२०२४ते शुक्रवार दिनांक ३०/८/२०२४ पर्यंत २४/०८/२०२४ रोजी सकाळी ७:३० वाजता ह. भ. प. रावसाहेब बाबा शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल आहे .किर्तन सेवा संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ह.भ.प. सुनील महाराज कोळपकर.  ह.भ.प. अमोल महाराज गाढे. ह.भ.प. मीराताई वाघचौर. मंगळवार दिनांक २७/८/२४ रोजी भेट प.पु. महंत रामगिरीजी महाराज (मठाधिपती गोदावरी धाम सराला बेट) यांची कार्यक्रमाला नंतर शिवशाहीर ह.भ.प.शरद महाराज ढवळे बुधवार दिनांक २८/८/२०२४ रोजी महंत भास्करगिरीजी महाराज क्षेत्र देवगड भेट महंत  राजेश्वगिरीजी महाराज यांच्या दोघांच्या हस्ते शिवलिंग पिंड स्थापना नंतर ह.भ.प.सुरेखाताई साखरे शुक्रवार ३०/८/२०२४ सकाळी ९ ते ११ ग्रंथ मिरवणूक होणार आहे महंत राजेश्वगिरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यांनंतर महाप्रसादाचे पंगत होईल या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांनी उपस्थित रहावे पंचकोशीतील भजनी मंडळ वाकडी धनगरवाडी, नांदुर, लांडेवाडी, यादव मळा, जळगाव, चितळी, पांढरी वस्ती शेळके वस्ती, जाधव वस्ती, काकडा आई, सावता महाराज भजन मंडळ, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, खंडोबा वाडी भजनी मंडळ, रामेश्वर भजनी मंडळ, डीजे रस्ता भजनी मंडळ या परिसरातील भजनी मंडळ उपस्थित राहणार आहे. ठिकाण :- श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर वाकडी खंडोबाची. राजुरी ममादापुर शिवेवर.

डॉक्टर संजय उबाळे यांना इंटरनॅशनल प्रेसिडेंट पिन देवून गौरव करण्यात आला

डॉक्टर संजय उबाळे यांना इंटरनॅशनल प्रेसिडेंट पिन देवून गौरव करण्यात आला 




लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 कॅबिनेट इन्स्टॉलेशन सोहळ्यानिमित्त डेक्कन कॉलेज ग्राउंड पुणे येथे प्रमुख पाहुणे मार्क लियॉन इंटरनॅशनल वाईस प्रेसिडेंट यांच्या शुभहस्ते डॉक्टर संजय उबाळे यांना गौरवण्यात आले 
राहता लायन्स क्लबचे डॉक्टर संजय उबाळे ऍडमिनिस्ट्रेटर तथा डिस्ट्रिक्ट चेअरमन यांनी राहता लायन्स क्लब च्या माध्यमातून डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 यांच्या सहकार्याने गेल्या पाच वर्षापासून अनेक सामाजिक व गरजूपर्यंत मदत करण्याचे काम केले आहे ,पुणे नगर नाशिक मध्ये आपल्या कामाचा ठसा त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिला आहे कॅन्सर आवेरणेस,डायबिटीस आजारावर लायन्स क्लबच्या मार्फत गरजू पर्यंत सेवा देण्याचे काम 
त्यांनी केले आहे . एक छोटासा राहता लायन्स क्लब परंतु सर्वांना सोबत घेऊन डॉक्टर संजय उबाळे यांनी राहता लायन्स क्लबच्या सभासदांची संख्या वाढवून मेंबरशिप ग्रोथ अवार्ड नुकताच इन्स्टॉलेशन सोहळ्यानिमित्त देण्यात आला आहे. 
या कार्यक्रमासाठी इन्स्टॉलेशन ऑफिसर प्रवीणजी छाजेड डिस्टिक गव्हर्नर विजयजी  सारडा , माजी प्रांतपाल विजय भंडारी, नरेंद्र भंडारी उपप्रांतपाल राजेश अग्रवाल ,श्रेयस दीक्षित, मार्गदर्शक राजभाई मूछाल ,गिरीशभाऊ मालपाणी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला
या पुरस्काराबद्दल  सुधीरजी डागा ,संदीप भाऊ गोंदकर, धनंजय  धुमाळ, आशिष बोरावके , झोन चेअरमन भट्टड राहता लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रकाश सदाफळ, उपाध्यक्ष डॉक्टर संजय गायकवाड, सचिन मुरादे, राजाभाऊ बांगर गोरख तात्या दंडवते ,अडवोकेट दिनेश कारले, व्यंकटेश अहिरे ,माजी अध्यक्ष अंजली उबाळे, डॉ बापूसाहेब पान गव्हणे, लायन  राजेंद्र फंड अध्यक्ष राहता सयाद्री , दीपक दंडवते ,एडवोकेट घोडके संतोष, दशरथ तुपे,किरण वाबळे  सर्व लायन्स क्लब चे पदाधिकारी व सभासद यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाळेत शक्ती योगा ग्रुप मलेशिया व साई महिमा अन्न सेवा ट्रस्ट काशी व शिर्डी यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप

श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाळेत शक्ती योगा ग्रुप मलेशिया व साई महिमा अन्न सेवा ट्रस्ट काशी व शिर्डी यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप




रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेश नगर शाळेत दिनांक 16 ऑगस्ट रोजी शक्ती योगा ग्रुप मलेशिया व साई महिमा अन्नसेवा ट्रस्ट काशी आणि शिर्डी यांच्यावतीने सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन मिष्ठांन्न भोजन देण्यात आले. या ट्रस्टचे प्रमुख श्री धनशेखरन  व एन आदर्श यांनी प्रथम या सेवाभावी संस्थेची माहिती दिली हे ट्रस्ट शिर्डी येथे रोज अन्नदान कार्यक्रम चालवते तसेच परिसरातील शाळांनाविविध प्रकारचे शैक्षणिक साहित्याचे वाटपही करते या उपक्रमाचे गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अनिल काका गाढवे, स्कूल कमिटीचे चेअरमन रावसाहेब पांडुरंग गाढवे, श्री अण्णासाहेब कोते , श्री दादासाहेब गाढवे, श्री जयाभाऊ कालेशेठ ,श्री गणेशभाऊ गाढवे ,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के .के.सर यांनी कौतुक करून अभिनंदन केले. श्री धनशेखरन यांनी भविष्यात विद्यालयासाठी आणखी मदत करण्याचे आश्वासन दिले. स्कूल बॅग व मिष्टान्न भोजन मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व सेवकांनी प्रयत्न केले

शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

सापडलेले कानातील सोन्याचे झुबे परत देऊन महिला सुरक्षा रक्षक श्रीमती कल्पना दळवीयांनी साई दरबारी जपली माणुसकी..

सापडलेले कानातील सोन्याचे झुबे परत देऊन महिला सुरक्षा रक्षक श्रीमती  कल्पना दळवी
यांनी साई दरबारी जपली माणुसकी..





शिर्डी.राजेंद्र दूनबळे 

दिनांक 15/8/2024 रोजी मंदिर महाद्वार महिला सुरक्षा रक्षक श्रीमती  कल्पना दळवी यांना समाधी मंदिर गाभारा मध्ये एक नग सोन्याचे कानातील झुबा वजन-२.७०० ग्रॅम ( किंमत - 19440/- )सापडले ते त्यांनी संरक्षण ऑफिसमध्ये जमा केले. तदनंतर साईभक्त यांनी संरक्षण ऑफिस ला येऊन दागिना हरविल्याची तक्रार केली असता, ओळख पटवून वरील किमतीचा सोन्याचा दागिना भक्तांना परत केला. नमूद महिला या कंत्राटी कर्मचारी म्हणून संस्थान मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या महिन्याच्या पगाराचे बरोबरीचे किमतीचे सोन्याचा दागिना त्यांनी कुठलाही मोह न ठेवता  परत केले. प्रामाणिक महिला कर्मचारी यांचे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी श्री गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवले यांनी अभिनंदन केले.

उद्योजक दिपक निकम यांची रुग्णाला ६० हजाराची मदत

उद्योजक दिपक निकम यांची रुग्णाला ६० हजाराची मदत





शिर्डी प्रतिनिधी 

शिर्डीचे हॉटेल व्यावसायिक व उद्योजक 
व एम डी एब्बिगेल रिजेंसी प्रा लि: युनिट ऑफ गोराडीयाज , शिर्डी चे संचालक दिपक निकम यांनी  श्री साईबाबांच्या शिकवणी  प्रमाणे आरोग्य सेवा करत  लासगाव तालुक्यातील  पाचोरा येथील  नितीन गुलाबसिंग पाटील या रुग्णाला    ६० हजार रुपयांची मदत करत त्यांनी सामजिक भान जपत मदतीचा हाथ पुढे केला आहे. नितीन पाटील हे ८ ते १० दिवसांपासून दुर्धर आजाराने  होवून ब्रेन हैमरेजने त्रस्त झाले होते . यावेळी त्यांची घराची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्याने त्यांचे परिवाराला खर्च करणे शक्य नव्हते. यावेळी काही गावकऱ्यांनी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक दिपक निकम यांना संपर्क केला असता तत्काळ विचारणा करून सदर पेशंटचे नातेवाईकांना पेशंटचा खर्च म्हणून ६० हजार रुपयांची मदत करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे एकीकडे समाजात माणुसकी विरळ होत असताना निकम यांनी समाजासमोर हा एक मदतीचा आणि एकमेकांना सहकार्याचा पायंडा जणू त्यांनी पाडला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही त्यानी या अगोदर देखील सामाजिक सांस्कृतिक अनाथ वयोवृद्ध निराधार साईभक्त गरजवंतांना अडचणीच्या काळात मदत करून सामाजिक दातृत्व निभावलेले आहे.

78वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा

78वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा 

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही. पी. एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालया मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन दिमाखात साजरा करण्यात आला. 
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रशालेचे प्राचार्य श्री. उदय महिंद्रकर यांनी भुषवले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नियामक मंडळ सदस्य तथा शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई टेलर, श्री. राजेश मेहता उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वज पूजन करून करण्यात आली. ध्वजारोहण प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती क्षमा देशपांडे आणि ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सुरेखा परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांना स्काऊट आणि गाईड बँड पथकाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलन आणि मानवंदनाची तयारी स्काऊट आणि गाईड प्रमुख श्री. संजय पालवे, श्रीमती वैशाली तारू, श्री. ज्ञानेश्वर बुरांडे, श्री. भीमराव राऊत आणि श्री. वैभव सूर्यवंशी यांनी केली. फलक लेखन आणि सजावट कला शिक्षक श्री. महेश चोणगे, श्री. विक्रम शिंदे यांनी केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर गीते, समूहगीते, वैयक्तिक गीते सादर करण्यात आली. श्री. शिवकुमार दहिफळे, श्री. चंद्रकांत जोशी, संस्कृती विभाग प्रमुख श्री. धनंजय काळे, श्री. योगेश कोठावदे आणि श्रीमती वंदना कोळेकर, श्रीमती रेवती बोके, श्रीमती स्नेहलता कांबळे श्रीमती स्वाती व्हरांबळे यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली.

उपस्थित मान्यवरांमधून शाळा समिती अध्यक्ष श्री. भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई टेलर, प्राचार्य उदय महिंद्रकर, श्रीमती क्षमा देशपांडे आणि श्रीमती सुरेखा परदेशी यांनी आपले मनोगत सादर केले. त्यांचे मनोगता मधून त्यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा, आरोग्य, स्वच्छता आणि मातापित्यांचा आदर ठेवण्याचे आवाहन केले. तसेच शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आणि संचलनातील विद्यार्थ्यांचे विशेष करून कौतुक केले.

कार्यक्रमा दरम्यान मंचावर उपप्राचार्य श्री. आदिनाथ दहिफळे, पर्यवेक्षक श्री. विजय रसाळ, श्री. श्रीनिवास गजेंद्रगडकर, शिक्षक प्रतिनिधी श्री. ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी श्रीमती संजीवनी आंबेकर, ज्येष्ठ लिपिक श्री. कुंडलिक आंबेकर, श्री. चंद्रकांत भगत, श्रीमती सविता सिंग, श्रीमती शैलजा लोखंडे, श्रीमती सूर्यवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी आदिवासी शाळेतील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी स्टेज आणि माईक व्यवस्था श्री. मुकुंद जगताप आणि सहकार्यानी उत्तम केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रेवती बोके, श्रीमती वैशाली तारू यांनी केले. कार्यक्रमाची सांगता श्री. धनंजय काळे यांच्या वंदेमातरम गीताने झाली.

पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार ' गोरक्ष नेहे पाटील यांनप्रदान

' पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार ' गोरक्ष नेहे पाटील यांनप्रदान



शिर्डी 

महामहिम राज्यपाल यांच्या वतीने देण्यात येणारा 'विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार' संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील गोरक्ष नेहे पाटील यांना देऊन गौरविण्यात आले.
   अहमदनगर जिल्हा मुख्यालय येथे संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्या चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या वतीने राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास व्यवसाय मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे प्रमुख उपस्थिती  पोलीस पाटील गोरक्ष रामनाथ नेहे यांना पोलीस पाटील म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन विशेष उल्लेखनीय सेवा पोलीस पाटील राज्यपाल पुरस्काराने गौरविण्यात आले.
        यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिका आयुक्त यशवंत डांगे, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, गृह उपअधीक्षक हरीश खेडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे, सामान्य प्रशासन विभागाचे तहसीलदार शरद घोरपडे तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
        गोरक्ष नेहे यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या सेवाकाळात गावामध्ये लोककल्याणकारी राज्य व सामाजिक न्यायाची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शासनाच्या अनेक योजना गावपातळीवर लोकांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे पोहचवून त्यांची अंमलबजावणी केली आहे. ई पीक पाहणी प्रकल्प गावात यशस्वी केला, महसूल व कृषी विभागाच्या अनेक जनकल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली. पाणी फाउंडेशन  लोकचळवळीच्या माध्यमातून जलसंधारणचे मोठे काम उभे केले, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, ग्रामविकास याचबरोबर गावात कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्यासाठी कार्य केले. कोविड च्या काळात गाव सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. पोलीस पाटील म्हणून करत असलेल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही अत्यंत प्रभावी कार्य करत आहेत.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

शिशुविहार माध्यमिक शाळा औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे पर्यावरण पूरक "बाप्पा माझा मातीचा" कार्यशाळा संपन्न

शिशुविहार माध्यमिक शाळा औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथे पर्यावरण पूरक "बाप्पा माझा मातीचा" कार्यशाळा संपन्न 




छत्रपती संभाजीनगर: येथील महिला मंडळ संचालित शिशुविहार माध्यमिक शाळा औरंगपुरा येथे दि. १७ रोजी पर्यावरण पूरक "बाप्पा माझा मातीचा" कार्यशाळा संपन्न झाली.  या कार्यशाळेत एकूण ८८ गणपती तयार करण्यात आले. या कार्यशाळेचे वैशिष्ट्ये म्हणजे दरवर्षीप्रमाणे शाडू माती पासून गणपती न बनवता साध्या बागेतील मातीपासून गणपती बनवण्यात आले. 
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ज्योती टाकळकर ,पर्यवेक्षिका माधवी जंगले, राष्ट्रीय हरित सेना प्रमुख मनीषा आदमने, सुरेखा जोनवाल आदींनी मेहनत घेतली. कार्यशाळेसाठी दीपशिखा फाउंडेशन च्या मनिषा चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

सप्ताह स्थळी स्वच्छता व वृक्षारोपण रुपी सेवा....

सप्ताह स्थळी स्वच्छता व वृक्षारोपण रुपी सेवा....




राहाता येथील साईयोग फाउंडेशन द्वारे सालाबादप्रमाणे पंचाळे तालुका सिन्नर येथे सुरू असलेले योगीराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज १७७ वा अखंड हरिनाम सप्ताह स्थळी शुक्रवारी पहाटे स्वच्छता अभियान व वृक्षारोपण करून सेवा देण्यात आली.सहा वर्षापूर्वी शिर्डी येथे साईबाबा जन्मशताब्दी निमित्त झालेल्या हरिनाम सप्ताह च्या वेळीही पंधरा दिवस रोज सकाळी एक तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले.पंचाळे येथे सप्ताह परिसरातील प्लास्टिक व कचरा गोळा करून समोरील परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.त्यानंतर तेथेच पाणी साठवण तलावाच्या शेजारी स्थानिक रहिवाशांच्या हस्ते पिंपळाचे वृक्षारोपण करण्यात आले.संवर्धनाची  संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतल्यामुळे साईयोग फाउंडेशन द्वारे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.तसेच साईयोग फाऊंडेशनच्या या आगळ्या वेगळ्या प्रकारे केलेल्या सेवेबद्दल चर्चा करत तेथील भक्तांनी प्रशंसा करत धन्यवाद दिले.
याप्रसंगी साई योग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य व सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.जेष्ठ सदस्य दिपक दंडवते यांनीही या सेवेतून एक वेगळी ऊर्जा मिळत असल्याचे नमूद केले.शेवटी अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले. 
याप्रसंगी साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.बापूसाहेब पानगव्हाणे,ॲड गोरख दंडवते, ॲड दत्तात्रेय धनवटे,दशरथ तुपे,भाऊसाहेब बनकर,मनोज पिपाडा,विलास वाळेकर,मोहन तांबे,संदीप डांगे,प्रकाश पुंड,संजय बाबर,दिपक दंडवते,बबलू फटांगरे,संजय वाघमारे,रवींद्र धस,विठ्ठल निर्मळ,शिवाजी पोटे,बाळासाहेब तारगे,प्रविण वाकचौरे,दत्तात्रय सूर्यवंशी आदी साई योग फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.

श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप

श्री गणेश विद्यालय गणेशनगर या शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप 






गणेशनगर =

श्री गणेश विद्यालय गणेशनगर या विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शक्ती योगा ग्रुप मलेशिया व साई महिमा ग्रुप शिर्डी यांचे वतीने शाळेला स्कूल बॅग व स्नेह भोजन देण्यात आले . दोन्ही ग्रुप चे स्कूल  कमेटीचे चेअरमन रावसाहेब पांडुरंग गाढवे, दादासाहेब गाढवे , अण्णा पाटील कोते व ग्रामस्थ व स्कूल कमिटीचे सदस्य व जयाभाऊ काले या सर्वांनी उपस्थित राहून दोन्ही ग्रुप चे अभिनंदन केले

गुरुवार, १५ ऑगस्ट, २०२४

कानबाई' उत्सवातून घडले खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन - केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन

कानबाई' उत्सवातून घडले खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन - केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे प्रतिपादन




 जात, पात, धर्म बाजूला ठेवून हा उत्सव साजरा खान्देशात पिढ्यानपिढ्यापासून हा उत्सव सुरु आह. सासू सुनेला, आई आपल्या मुलीला या उत्सवाबद्दल सांगत परंपरा पुढे नेण्याचा सल्ला देत असून, 'कानबाई' उत्सवातून खान्देशच्या सांस्कृती-परंपरेचे दर्शन घडत असते. वडीलधाऱ्यांकडून मिळालेला हा वारसा पुढे नेण्याचे काम पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीत सूरू असल्याचा एक खान्देशी म्हणून अभिमान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले.
खान्देश कानबाई माता उत्सव समिती, पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने खान्देशातील संस्कृती, परंपरा आणि धार्मिक सण पुढील पिढयांसाठी प्रेरणा आणि वारसा अखंडीत ठेवण्यासाठी दोन दिवसीय खान्देश दैवत माय कानबाई माता उत्सवाचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयोजन करण्यात आले होते. रविवारी सायंकाळी ६ वाजता आहेर गार्डन येथे महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमावेळी खान्देशवासीय समाज
बांधवांकडून केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री
रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई
वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी, खासदार
श्रीरंग आप्पा बारणे, भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप,
आमदार उमा खापरे, विजय शेठ जगताप, कार्यक्रमाचे
संयोजक माजी सत्तारुढ पक्षनेता नामदेव ढाके,
प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, मिलींद चौधरी, हेमंत झोपे, काळूराम बारणे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सूरेश भोईर, अभिषेक बारणे, सागर आंगोळकर, हर्षल ढोरे, शारदाताई सोनवणे, राजू दूर्गे, शेखर चिंचवडे, ऍड. गोरक्षनाथ झोळ, अनिल चौधरी, मोहन पटेल, डॉ. प्रशांत पाटील, अजय गुजर, प्रदीप पाटील, महेंद्र पाटील, मधुकर पगार, अरविंद सैंदाणे, नानाभाऊ माळी, भागवत झोपे, मधुकर पगार, विकास वारके, प्रकाश लोहार, अशोक वानखेडे, नरेंद्र च-हाटे, सरलाताई चौधरी, किरण चौधरी, उज्ज्वल चौधरी, डॉ. विजय पाटील, राजू भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

एकरूखे येथे ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांच्या किर्तनाने साई चरित्र पारायणाची सांगता

एकरूखे येथे ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांच्या किर्तनाने साई चरित्र पारायणाची सांगता




एकरुखे येथिल सात दिवसीय साई चरित्र पारायण सोहळ्याची सांगता वरद विनायक सेवाधाम लोणी संस्थानचे ह.भ.प उध्दव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली यावेळी पारायणार्थीं व ग्रंथाची गावातुन ढोल ताश्याच्या गजरात व फटाक्यांच्या आतिशबाजीत मिरवणुक काढण्यात आली होती यावेळी मा.खा.डॉ.सुजयदादा विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली, काल्याच्या किर्तनात उध्दव महारांजानी बोलतांना सांगितले की ज्ञानेश्वर माऊलींपासुन आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच साधु संतानी समानतेची जपवणुक करण्याची शिकवण दिली आहे, साई बाबांनी श्रद्धा सबुरी आणि सबका मलिक एकचा मुलमंत्र दिला, आपण सामाजिक राजकीय व धार्मिक किंवा अन्य कोणत्याही क्षेञात काम करतांना सर्व जाती धर्मातील घटक एकच आसुन कोणीही लहान मोठा असा भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन वाटचाल केल्यास परमेश्वर प्राप्तीचा आनंद मिळाल्या शिवाय राहणार नाही,  त्याच बरोबर पारायणार्थींनी देखिल पारायणाचे सात दिवस मनोभावे वाचन केले त्यांना देखिल साईंची नक्कीच चांगली अनुभूती मिळेल असे सांगितले. तर यावेळी सुजयदादा विखे पाटील यांनी बोलतांना सांगितले की आज एकरुखे येथे काल्याच्या किर्तनाने साई चरित्र पारायणाची सांगाता आसल्याने एकरुखेसह परिसरात जोरदार पाऊस पडुन ओढे नाले भरभरुन वाहावेत अशी माता वज्रेश्वरी व साई चरणी प्रार्थना करतो असे म्हणाले, सात दिवसाच्या महाप्रसादासाठी ललित मुनावत, विलास सातव अजय बिलबिले, योगेश सापिके, आकाश कार्ले, जगन्नाथ सोनवणे, संदीप आग्रे या मान्यवरांनी अन्नदान केले, पारायणच्या उत्कृष्ट नियोजनासाठी जितुभाऊ मित्र मंडळ व सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी सरपंच जितेंद्र गाढवे, उपसरपंच जगन्नाथ सोनवणे, जालिंदर गाढवे, गोरक मोटे, विलास सातव, हर्षल सातव मिनिनाथ आग्रे, शिवाजी भवर, उमेश आग्रे, गोरक बोर्डे, देवेंद्र भवर, नवनाथ शेळके, शंकर कुऱ्हाडे, रवींद्र गायधने, अमोल तागड, कृष्णा जाधव, डॉ.संतोष भवर, बाळासाहेब सापिके, गोरख खिलारी, भाऊसाहेब गाढवे, बाबासाहेब महाराज गाढवे आदी ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते,

विधानसभा निवडणुकी च्या अनुषंगाने शिवसेनेची शिर्डी येथे आढावा बैठक संपन्न

 विधानसभा निवडणुकी च्या अनुषंगाने शिवसेनेची शिर्डी येथे आढावा बैठक संपन्न



विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर जिल्ह्याचे बैठक घेताना  शिवसेना नेते व माझी केंद्रीय मंत्री  मा. खासदार श्री अरविंदजी सावंत साहेब शिर्डी येथे आले असता त्यांची शासकिय विश्रामगृह शिर्डी येथे भेट घेतली, व शिर्डी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक घेतली यावेळी त्यांचा सत्कार केला. यावेळी आमचे मार्गदर्शक जिल्हाप्रमुख रावसाहेब नाना, खेवरे व राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी शिवसेना शिर्डी शहर संघटक अमोल गायके तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे शिर्डी समन्वयक सुनील परदेशी उपशहर प्रमुख अमोल खापटे उपशहर प्रमुख गोरख गोरख वाकचौरे व तालुका संघटक स्वाती परदेशी तथा सर्व सहकारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त राहाता न्यायालयात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान..



स्वातंत्र्यदिनानिमित्त राहाता न्यायालयात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान..

राहता=

सालाबाद प्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने साईयोग फाउंडेशन,राहाता तालुका न्याय विधी समिती व राहाता बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राहाता न्यायालयाचे सर्व न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली राहाता न्यायालय परिसरात बुधवारी सकाळी स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.स्वयंस्पुर्तीने सर्व न्यायमूर्तींनी स्वतः हातात झाडू घेवून स्वच्छ्ता अभियानात सहभाग नोंदविला.संपूर्ण परिसरतील अनावश्यक गवत काढून कचरा गोळा करून परिसर स्वच्छ झाडून स्वच्छ करण्यात आला.त्यानंतर न्यायमूर्तींच्या हस्ते कैलासपती वृक्षाचे रोपण करण्यात आले.
राहाता न्यायालयाचे जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधिश वाय.एच.अमेटा,दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती आदिती नागोरी,न्यायमूर्ती एस.व्हि.खैरे,न्यायमूर्ती ए.एस्.देशपांडे,न्यायमूर्ती ए.ए.कुलकर्णी,न्यायमूर्ती एस.एस.मुलाणी तसेच राहाता वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.शाम डांगे, माजी उपाध्यक्ष ॲड दत्तात्रय धनवटे,ॲड अनिल गमे यांचा साईयोग फाउंडेशन द्वारे फेटा बांधून साईशाल व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.तसेच साईयोग फाउंडेशन द्वारे न्यायालय परिसरात आजपर्यंत केलेल्या प्रत्येक कार्यात न्यायमूर्तींच्या सहकार्याचा उल्लेख केला.जिल्हा न्यायमूर्ती-१ वाय.एच.अमेटा यांनी साईयोग फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत सर्वांचे आभार मानले.साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रगीताने अभियानाचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी राजूभाई पठाण,भरत दवंगे,ॲड गोरख दंडवते,माजी सैनिक भानुदास गाडेकर,भाऊसाहेब बनकर,विठ्ठल निर्मळ,मनोज पिपाडा,संजय बाबर,मोहन तांबे,संजय वाघमारे,दिपक दंडवते,संदीप डांगे,राजेंद्र बांगर,रवींद्र धस,बबलू फटांगरे,सिताराम बावके,व्यंकटेश अहिरे,रामहरी डांगे,सुभाष डांगे,अंकुश गांधी,प्रकाश बेंद्रे,शिवाजी पोटे,नारायण गाडेकर,नामदेव गवते,परमेश चव्हाण,देविदास नागरे,रंगनाथ सदाफळ आदी साईयोग फाउंडेशन,गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व न्यायालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

क्रीडा संस्कृती रंगभरण स्पीच अशा विविध स्पर्धा

क्रीडा संस्कृती रंगभरण स्पीच अशा विविध स्पर्धा


 

श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा  संस्थेचा वर्धापन दिन व संस्थेचे संस्थापक आदरणीय कै. काशिनाथ पाथरूट गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2024 रोजी संस्थेची शाखा बाभूळगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी संस्थां अंतर्गत  क्रीडा सांस्कृतिक रंगभरण स्पीच अशा विविध स्पर्धा पार पडल्या यावेळी . श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय श्री देवीचा माळ या शाळेने वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व  गुणवंत कर्मचारी म्हणून श्री ज्ञानदेव विठ्ठल गुरमे कला शिक्षक यांना पुरस्कार देण्यात आला . यावेळी शाळेने 16 गोल्ड मेडल  मिळवून सर्वसाधारण विजेतेपद फटकावले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे सहकारी कर्मचाऱ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सुशीला पाथरूट मॅडम. संस्थेचे सचिव मा. चित्रसेन पाथरूट सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागनाथ पाथरूट सर व विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रय काळे सर या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांची विशेष कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.....श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ मंगळवेढा  संस्थेचा वर्धापन दिन व संस्थेचे संस्थापक आदरणीय कै. काशिनाथ पाथरूट गुरु

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

साईसेवा मतिमंद विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान

साईसेवा मतिमंद विद्यालयात नशा मुक्त भारत अभियान





शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)

      आज दिनांक १२ ऑगस्ट २०२४ रोजी साईसेवा निवासी मतिमंद मुला मुलींची शाळा शिर्डी व साईसेवा टिचर ट्रेनिंग सेंटर शिर्डी येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२४ या निमित्ताने नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रम घेण्यात आला.
     या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयात नशा मुक्त भारत प्रतिज्ञा (शपथ) घेण्यात आली. व शिर्डी शहरात विद्यालय व ट्रेनिंग सेंटरच्या वतीने नशा मुक्त भारत अभियान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. साईसेवा टिचर ट्रेडिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून नशा मुक्त भारत अभियान पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. तसेच विद्यालयात रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.       
        हा कार्यक्रम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा घुले  मॅडम व मानसोपचार तज्ञ श्रीमती हेमलता पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाने तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला.

रविवार, ११ ऑगस्ट, २०२४

केंद्र राज्य शावसनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - बबनराव शेळके

केंद्र  राज्य शावसनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - बबनराव शेळके 





शिर्डी 

 डीबीटीसी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 -2025 साठी शासनाने नेनो खत,व नेनो युरिया साठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन फॉर्म भरण्यास सांगितली होते अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नॅनो युरिया व नेनो डीएपी खतासाठी ऑनलाईन  फॉर्म भरले होते चिचोंडी पाटील आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मोफत नॅनो डीएपी खत व  नेनो युरिया खत मिळाले, या खतांचे वाटप भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बबनराव शेळके आणि कृषी अधिकारी पवार साहेब यांच्या हस्ते सर्व शेतकऱ्यांना वरील खाते मोफत देण्यात आली यावेळी बबनराव शेळके यांनी  शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शंभर टक्के योजनांचा लाभ  घ्यावा असे आवाहन करण्यात आले. शासन सदैव आपल्या पाठीशी आहे आणि शंभर टक्के आपल्याला मदत करणार आहे असेही शेळके यांनी यावेळी म्हटले आहे  यावेळी शासनाचे शेतकऱ्यांनी  आभार मानले , यावेळी आबासाहेब वाडेकर ,संभाजी खडके, संतोष शेळके, राजेंद्र तनपुरे, विष्णू भद्रे ,विष्णू दाताळ ,प्रकाश तनपुरे, संतोष कोकाटे ,शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...