बुधवार, १४ ऑगस्ट, २०२४

स्वातंत्र्यदिनानिमित्त राहाता न्यायालयात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान..



स्वातंत्र्यदिनानिमित्त राहाता न्यायालयात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान..

राहता=

सालाबाद प्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने साईयोग फाउंडेशन,राहाता तालुका न्याय विधी समिती व राहाता बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राहाता न्यायालयाचे सर्व न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली राहाता न्यायालय परिसरात बुधवारी सकाळी स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले.स्वयंस्पुर्तीने सर्व न्यायमूर्तींनी स्वतः हातात झाडू घेवून स्वच्छ्ता अभियानात सहभाग नोंदविला.संपूर्ण परिसरतील अनावश्यक गवत काढून कचरा गोळा करून परिसर स्वच्छ झाडून स्वच्छ करण्यात आला.त्यानंतर न्यायमूर्तींच्या हस्ते कैलासपती वृक्षाचे रोपण करण्यात आले.
राहाता न्यायालयाचे जिल्हा न्यायाधिश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधिश वाय.एच.अमेटा,दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती आदिती नागोरी,न्यायमूर्ती एस.व्हि.खैरे,न्यायमूर्ती ए.एस्.देशपांडे,न्यायमूर्ती ए.ए.कुलकर्णी,न्यायमूर्ती एस.एस.मुलाणी तसेच राहाता वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.शाम डांगे, माजी उपाध्यक्ष ॲड दत्तात्रय धनवटे,ॲड अनिल गमे यांचा साईयोग फाउंडेशन द्वारे फेटा बांधून साईशाल व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.
साईयोग फाऊंडेशनचे जेष्ठ सदस्य सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.तसेच साईयोग फाउंडेशन द्वारे न्यायालय परिसरात आजपर्यंत केलेल्या प्रत्येक कार्यात न्यायमूर्तींच्या सहकार्याचा उल्लेख केला.जिल्हा न्यायमूर्ती-१ वाय.एच.अमेटा यांनी साईयोग फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत सर्वांचे आभार मानले.साईयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रगीताने अभियानाचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी राजूभाई पठाण,भरत दवंगे,ॲड गोरख दंडवते,माजी सैनिक भानुदास गाडेकर,भाऊसाहेब बनकर,विठ्ठल निर्मळ,मनोज पिपाडा,संजय बाबर,मोहन तांबे,संजय वाघमारे,दिपक दंडवते,संदीप डांगे,राजेंद्र बांगर,रवींद्र धस,बबलू फटांगरे,सिताराम बावके,व्यंकटेश अहिरे,रामहरी डांगे,सुभाष डांगे,अंकुश गांधी,प्रकाश बेंद्रे,शिवाजी पोटे,नारायण गाडेकर,नामदेव गवते,परमेश चव्हाण,देविदास नागरे,रंगनाथ सदाफळ आदी साईयोग फाउंडेशन,गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व न्यायालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...