राहाता सह्याद्री क्लबचे कार्य उत्तमच :- ला. गिरीश मालपाणी.
अवघ्या सहा महिन्यात स्थापन झालेला लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री याने अनेक चांगल्या सामाजिक ऍक्टिव्हिटी केल्या आहेत. मागील वर्षी सहा महिन्यातच 18 अँक्टिव्हीटी तर या वर्षीच्या दोन महिन्यातच 22 नावीन्यपूर्ण ॲक्टिव्हिटी या क्लबने केल्या आहेत. त्यामुळे राहाता सह्याद्री लायन्स क्लब हा उत्तमच कार्य करत असल्याचे मत माजी प्रांतपाल तथा मालपाणी ग्रुपचे विश्वस्त ला. गिरीश मालपाणी यांनी म्हटले आहे. ते लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पदग्रहण अधिकारी म्हणून बोलत होते. क्लबच्या सर्व सदस्यांना त्यांनी शपथ दिली व जगभर लायन्स क्लब करीत असलेल्या सेवाकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड हे होते. तर मान्यवरांमध्ये शपथप्रदान अधिकारी म्हणून डिस्ट्रिक्ट ॲडीशनल कॅबिनेट ट्रेझरर ला. सुधीरजी डागा, अतिथीमध्ये ग्रामसेवकांचे नेते तथा ढाकणे शैक्षणिक संकुलाचे संस्थापक श्री. एकनाथराव ढाकणे, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ऑफिसर आय टी ला. धनंजय धुमाळ, झोन चेअरपर्सन ला. सुमित भट्टड हे होते.
प्रास्तविकमध्ये प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड म्हणाले की ला. विनोद गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली राहाता सह्याद्री क्लब सुरू झाला. जनतेच्या गरजा ओळखून सेवा देण्याच्या उपक्रम या क्लबने हाती घेतला. यामध्ये महिलांच्या गर्भाशय पिशवीचा कॅन्सर वाढू नये म्हणून केवळ जास्त पैशाअभावी उपचार न घेणाऱ्या महिलांसाठी शिबिरात मोफत गर्भाशय पिशवीचे शस्त्रक्रिया केली तर इतर वेळी अत्यंत अल्पदरात शस्त्रक्रिया कानडे हॉस्पिटल येथे केशवसुत फाऊंडेशन व लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे वतीने घेण्यात येत आहे. जनतेचा ही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. साथीच्या काळात प्रतिकार शक्ती कमी होवू नये म्हणून मतिमंद मुलांना फळे वाटप, वेगवेगळे आरोग्य शिबिराचे आयोजन, मुलांना स्कूल बॅग वाटप, वृक्षारोपण व इतर कार्यक्रम राबविले.
क्लब लीडरशिप चेअरमन डॉ. दत्ता कानडे, ला. महेश गाडेकर ला. ज्ञानेश्वर नळे, ला. विजय बनकर ,ला. मिलिंद कडलग, ऍड. ला. सुधीर बोठे, ला. सिराज शेख, ला. सत्यम सदाफळ, ला. मिनिनाथ तेलोरे, ला. बापू गायकवाड, यांनी पाहुण्यांचा सन्मान केला. संस्थापक ला. विनोद गाडेकर यांनी क्लबच्या आर्थिक अहवालाबरोबरच क्लब करत असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची माहिती दिली. तर सेक्रेटरी ला. सागर रोकडे यांनी अहवालाचे वाचन केले. ला. सुधीर डागा यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली व क्लब करत असलेल्या कामाची स्तुती केली. श्री. एकनाथराव ढाकणे, डी . सी. ला. धनंजय धुमाळ व झोन चेअरमन ला. सुमित भट्टड यांनी क्लबच्या कामाचे कौतुक करून शुभेछ्या दिल्या. कु. आरोही बोठे हिने प्रतिज्ञा दिली.
प्रवरा कम्युनिटी रेडिओच्या एच आर ला. गायत्री म्हस्के यांच्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन झाले
या सोहळ्यास शिर्डी क्लबचे प्रेसिडेंट ला. महेश वैद्य, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष श्री. खंडेराव कडलग, उद्योजक श्री. सुनील निकम,उद्योजक श्री. अनिल देसाई, श्री. सुधाकर वाघ, श्री. वेणूनाथ शेलार, ला. केतन कुंभकर्ण, ला.सुनील काळोखे, ला. सौ.रोहिणी गाडेकर ला. सौ. राजश्री फंड ला. सौ. राजश्री रोकडे , मनीषा धाडगे, सुवर्णा बोठे, छाया नळे, प्रतीक्षा शेलार, संगीता शेलार हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा