श्री गणेश विद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संपन्न
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेत दिनांक 24/08/2024 शनिवार रोजी सकाळी गुरुकुल उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन याचे महत्त्व समजावे म्हणून शारदा विद्या मंदिर राहाता येथील तज्ञ अध्यापक श्री जोशी बी एस सर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करायचे असेल तर *आत्मविश्वास, त्यागीवृत्ती,कठीण परिश्रम* या त्रिसुत्रीच्या जोरावर यश मिळवता येते असे सांगून शालेय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांचे महत्व सांगितले.कठिण प्रश्न सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्या सांगितले.
सुरुवातीला गुरुकुल विभाग प्रमुख श्री कैलास भोये सर यांनी विद्यालयातील गुरुकुल उपक्रमांतर्गत चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी शालेय स्पर्धा परीक्षा या मुलांना आपल्या भविष्यातील ध्येय सिद्धीकडे घेऊन जाण्यासाठी मदत करतात असे सांगून या मिळालेल्या संधीचे मुलांनी सोने केले पाहिजे असे समजावले.
या उपक्रमाचे स्कूल कमिटीचे जेष्ठ सदस्य श्री रावसाहेब पांडुरंग गाढवे, श्री अण्णासाहेब कोते, श्री दादासाहेब गाढवे, श्री जयाभाऊ कालेशेठ,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष व गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री अनिल काका गाढवे पाटील,संदिप गाढवे,मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी उपक्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले. शेवटी श्रीमती वराडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा