गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

साकुरी येथील युवा उद्योजकांची साकुरी ते तिरूपति बालाजी सायकल यात्रा

साकुरी येथील युवा उद्योजकांची साकुरी ते तिरूपति बालाजी सायकल यात्रा

राहता 

साकुरी येथील ट्रेकर ग्रुप व रोहोम पाटील फार्मर्स क्लब च्या युवा उद्योजकानी साकुरी ते तिरुपति बालाजी अशी सायकल यात्रा आजपासून सुरू केली आहे सदरील यात्रा आज पहाटे चार वाजता साकुरी येथून सुरू झाली सदरील सायकल यात्रा पुढील सात दिवसात तिरूपति बालाजी येथे पोहचणार आहे.

या अगोदर या युवा उद्योजकाणी पंढरपूर, कळसुबाई,
अश्या यात्रा सायकल वर केलेल्या आहेत त्यांच्या या यात्रे मध्ये युवा उद्योजक रणजीत शामराव रोहोम, अनिल भागवत राव रोहोम, अनिल रामजी रोहोम, अजित उत्तम रोहोम, अभिषेक अशोक दंडवते, संदीप विजयराव दंडवते, संदीप यामजी रोहोम, राहुल सुधाकर दंडवते, कैलास निवृत्ती रोहोम आदि युवा उद्योजक सहभागी झाले आहेत त्यांच्या या यात्रेसाठी साकुरी ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...